Friday, February 18, 2022

अफलातून अनुभूती.... १८ फेब्रुवारी २०२२

*अफलातून अनुभूती*
१८ फेब्रुवारी २०२२

आज मुंबई वरून शिवनेरी सायकल वारीसाठी जुन्नर मार्गे ओझरला पोहोचलो.

अहमदनगरच्या सौरभ घायतडक या मरीन इंजिनिअर सायकलिस्टची भेट झाली...ओझरच्या विघ्नहर गणपती बाप्पाच्या मंदिरात... 


सौरभ टुरिंग सायकलिंग करतोय... सुट्टीच्या दिवसात... त्याने ठरवलंय सायकलिंग करताना पोटापाण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गरजा  माधुकरी मागून पूर्ण करायच्या... ... "माझ्या खिशात पैसे नाहीत... मला भूक लागली आहे.. त्यासाठी कोणतेही काम करायची तयारी आहे"... हेच सौरभचे बोलणे...

रात्री राहण्यासाठी सुद्धा मंदिर, धर्मशाळा, यात्री निवास किंवा एखाद्या सद्गृहस्थाच्या घरी आसरा शोधायचा... 

खिशात एकही पैसा न ठेवता... समाजात याचक म्हणून वावरणे आणि आपल्या गरजा भागवत सायकलिंग करणे...  तसेच याचना केल्यावर समोरील व्यक्ती कसा रिऍक्ट होईल... ती परिस्थिती हाताळणे... या साठी मनात परिव्राजकाची धारणा निर्माण करण्याचे प्रचंड आत्मिक बळ अंगी बाणवावे लागते... 

विशेष म्हणजे त्याला आलेले अनुभव अचंबित करणारे आहेत... त्याने सहृद समाज मनाचा कानोसा घेतला आहे... अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्ती कडून मिळालेला प्रतिसाद खूपच आनंददायी होता...  या अनुभवामुळे जीवनात उंच भरारी घेण्यासाठी त्याचे  पंख खूप बळकट असतील आणि त्याच वेळी त्याचे पाय जमिनीवर असतील...

जेमतेम बावीस वर्षाच्या सौरभ कडून जीवन जगण्याच्या कलेचा एक नवीन आविष्कार अनुभवायला / शिकायला मिळाला होता...

ट्रॅव्हल विदाऊट मनी अँड लिव्ह लाईफ लाईक अ किंग ( Travel without Money and Leave Life like a King)  हाच तो concept आहे.

अशा प्रकारे सफर करणे ही एक अफलातून अनुभूती आहे... आणि सौरभ त्याचा लाभ घेतोय....

मंगल हो ! ! !

सतीश जाधव
मुक्त पाखरे....

7 comments:

  1. कौतुकास्पद आहे आणि तुझी नजरही हिरेपारखी आहे

    ReplyDelete
  2. खूपच छान सौरभ आणि सतीश जाधव तुमचे आभार दिलेल्या
    प्रोसत्साहनाबद्दल

    ReplyDelete
  3. खुपच छान सौरभ अभिनंदन

    ReplyDelete
  4. खूपच छान सौरभ

    ReplyDelete
  5. अतिशय प्रेरणादायी 👍
    आणि खुप छान लिहिले आहे 👌👌

    ReplyDelete
  6. मित्र काशिनाथ चे अभिप्राय

    व्वा… खुप छान. सौरभ सारखी तरूण मुलं निसंग होवून स्वतःला समाजाशी जोडू पहातात व समाजही दातृत्व विसरलेलला नाही हे फार विलोभनीय 🙏😊🙏
    सबका मंगल हो👏

    ReplyDelete