Monday, July 4, 2022

आदी कैलास ॐ पर्वत सायकल वारी.... दि. २२ आणि २३ जून २०२२

आदी कैलास ॐ पर्वत सायकल वारी
दि. २२ आणि २३  जून २०२२

 काल समर्पयामी शॉपीला सदिच्छा भेट दिली... सायकल डॉक्टर हिरेनला "सखीची" तब्बेत दाखविली... दोन स्पोक घट्ट केल्यावर सखी एकदम टणटणीत असल्याचे प्रमाणपत्र मिळाले... सखी तयार झाली... आदी कैलास आणि  ॐ पर्वत सायकल वारी साठी... 

आज कारने जावई राजूने बांद्रा टर्मिनसला सोडले... गरीबरथ गाडीला लगेज डबा नव्हता... पार्सल ऑफिसला सखीला जमा केले असते तर दोन दिवसांनी दिल्लीला ताब्यात मिळाली असती. हे सखीला मान्य नव्हते... म्हणुन सखी (सायकल) डिसमेंटल केली आणि डब्यात कोच खाली ठेवण्याची तयारी केली. 

 गाडीवर लक्ष्मण आणि अतुल शुभेच्छा द्यायला आले होते... मोठे काम लक्ष्मणने केले होते. सायकल बांधायला नायलॉन टॅग आणले... सोबत ड्रायफ्रूट सुद्धा घेऊन आला... कोच पर्यंत सखी लक्ष्मणच्या ताब्यात दिली... अतुल लस्सी घेऊन आला होता... प्रोटिन्सचा भोक्ता होता अतुल... दिल्लीस्थित लक्ष्मणचा मित्र दुर्गेश  निजामुद्दीन स्टेशनवर मदत करायला येईल हे लक्ष्मणने सांगितले. स्वप्नाने दिलेले मेथी पनीर ठेपले, कोल्हापूरी ठेचा आणि अतुलची लस्सी यांनी रात्रीच्या जेवणात बहार आणली... 
सकाळी दहा वाजता गाडी निजामुद्दीन स्टेशनवर पोहोचली आणि दुर्गेश त्याच्या दोन सहकार्‍यांना घेऊन डब्यात हजर झाला.


सामानाचे काम बरेच हलके झाले. स्टेशन बाहेर दुर्गेशने बेल फळाचा ज्युस पाजला आणि जुनी दिल्ली स्टेशन पर्यंत ऑटो करून दिली. त्याच्यासह फोटो काढून आभार मानले... मनोमन लक्ष्मणला सुद्धा धन्यवाद दिले.
जुनी दिल्ली स्टेशनवर पोहोचताच हमाल करून रेस्ट रुम गाठली... दुपारी चारच्या संपर्क क्रांती एक्सप्रेसचे तिकीट कन्फर्म नव्हते म्हणुन रात्री साडेदहाच्या राणीखेत एक्स्प्रेसचे कन्फर्म तिकीट काढले होते. दुपारच्या गाडीचे तिकीट कन्फर्म झाले. हे सिटींग तिकीट असल्याने दोन डब्यांच्या शंटिंगमध्ये खोललेली सायकल लॉक केली.


काठगोदाम ऐवजी हलद्वानीला उतरायचे नक्की केले. कारण येथूनच धारचूलासाठी सकाळी पाच वाजताची बस पकडायची होती. रात्री साडेदहा वाजता हलद्वानीला उतरून ऑटो पकडली. ऑटोवाल्याने टीप दिली... त्यामुळे रात्री बारा वाजता दैनिक जागरण प्रेसची जीप मिळाली... वर्तमानपत्रावर सायकल बांधली.

 सकाळी साडेसहा वाजता पिठोरागडला आलो. येथे धारचुलासाठी जीप बदलली. या जीपमध्ये सामान आणि पॅसेंजर भरे पर्यंत आठ वाजले... अकरा वाजता धारचुलाला पोहोचलो. बाजूला बसलेल्या नरेंद्र दानूची ओळख झाली होती . त्याने सायकलसह सामान उतरवायला मदत केली.  त्याचा भाऊ लक्ष्मणचे हॉटेल धारचुलाला आहे. लक्ष्मणने मेडिकल सर्टिफिकेट आणि परमीटसाठी मदत केली.  धारचुलाला पोहोचल्या दिवशीच आदी कैलास आणि ॐ पर्वत सायकलवारीची कागदपत्रे तयार झाली होती.
 
हॉटेल यू टर्न मध्ये स्वच्छ रुम मिळाला. जवळपास दोन दिवस सतत प्रवास झाला होता.. मस्त आंघोळ करून सायकल असेंबल केली


आणि धारचुलाचा  फेरफटका मारला. येथे नेट असल्यामुळे सर्वांना फोन केले. फोटो शेअर केले. कुमाऊ विकास निगम मध्ये पुढच्या प्रवासात नेट नाही ही माहिती मिळाली. हे व्हॉटस् अँपने सर्वांना कळविले. उद्या पासूनच सायकल वारी सुरू करणार होतो. 

आदी कैलास आणि ॐ पर्वत सायकल वारी एकट्याने आणि कोणत्याही संपर्काशिवाय करणार याची चिंता सर्वांना वाटू लागली होती... 

सोबत विशाल निसर्ग होता आणि पार्वतीपती कैलास महादेवाने साद घातली होती...

त्यामुळेच ही अवघड वारी पूर्ण होणार... 

किंबहुना देवाधिदेव महादेव पूर्ण करवून घेणार याची मनोमन खात्री होती... 

ॐ नमः शिवाय... 

सतीश जाधव
मुक्त पाखरे... 

10 comments:

  1. मित्र पवार याचे अभिप्रायह
    सुंदर,
    आपण केलेले प्रवास वर्णन अप्रतिम, जणू सगळा पटच डोळ्यासमोर उलगडत होता. आपल्या प्रवासात आपण कधीच एकटे नसतो. नकळतपणे आपल्याला इतरांचीही काहीना काही निमित्ताने मदतच होत असते जेणेकरून आपला अवघड प्रवासही सुखकर होऊन जातो.
    अगणित शुभेच्छा आणि अभिनंदन.
    👏👏👏👏💐💐💐💐

    ReplyDelete
  2. मित्र महादेव पाटील चे अभिप्राय

    खुपच छान वर्णन आपण प्रवासात एकटं असल्याचं जाणवत असतं पण कोणी ना कोणी देव रूपात आपल्याला भेटत असतो आणि त्यात आपल्या मनाची तयारी असली की देव आपल्या कडून करून घेतो हर हर महादेव

    ReplyDelete
  3. Really u r great sir. Ya shivay dusre shabd nahit majhyakade. Tumchya pudhil expedition la shubbhechha

    ReplyDelete
  4. डॉ मयूराचे अभिप्राय

    Ohh so very Great 👍
    Excellent achievement!!!
    Hats off to you Satish Sir! 💐💐✨✨

    ReplyDelete
  5. So inspirational ........unlimited adventure

    ReplyDelete
  6. अभिनंदन सर

    ReplyDelete
  7. तुझे कौतुक करावे तेवढे थोडे.तुझ्या सहवासामुळे एक कळालेकी मनोनिग्रह जर उच्च असेल तर व वेड असेल तर वाळुतून तेल पण गळते हे तू सिध्द केलेस🌹🙏

    ReplyDelete
  8. राजेश

    ReplyDelete
  9. हे सार तुझा उदंड आत्मविश्वास, निश्चयी मनान सुखरूप पार पडेल आणि मागून येणार्याना मार्गदशरकही…

    ReplyDelete