छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि चांदिवली सहयोग सोसायटीत शिवज्योत स्वीकारण्याचा मान... दि १९ फेब्रुवारी २०२६*
आज शिवजयंती प्रित्यर्थ परममित्र स्वप्नील दौंड यांच्या संकल्पनेतून साकारलेली सायन किल्ला ते पवई ह्या छत्रपती शिवाजी महाराज सायकल राईड मध्ये भाग घेण्याची संधी मिळाली...तरुणाईला निसर्गाकडे नेणे तसेच छत्रपतींचा इतिहास अवगत करणे आणि फिटनेसची आवड निर्माण करणे... स्वप्नीलच्या या शुद्ध प्रयोजनामुळेच या राईड मध्ये भाग घेण्याचे ठरविले...
सायन किल्ल्यावर शिव मशालीचे प्रज्वलन झाले तेव्हा छत्रपतींचा जयघोष करण्यात आला...
सकाळच्या आल्हाददायक वाऱ्यात पेडल मारताना प्रत्येक सायकलस्वाराच्या मनात एकच ऊर्जा धावत होती ... छत्रपतींची प्रेरणा...
पवई येथील सहयोग सोसायटीमध्ये सर्व सायकलिस्टचे जोरदार स्वागत करण्यात आले...
येथे सुप्रसिद्ध कौन्सिलर डॉ अंजलीताई अरुण पारकर यांची भेट झाली... अंजली ताई समाजासाठी करत असलेल्या कार्यामुळे अतिशय प्रभावित झालो... त्या Remedial Therapist आणि Counsellor म्हणून कार्यरत आहेत..
शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही... तर प्रत्येक मुलाची क्षमता ओळखून ती उजळवण्याचे त्यांचे समर्पित कार्य सतत सुरू आहे... विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि भावनिक विकासासाठी कार्यरत असलेली त्यांची सेवा समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे...
शिकण्यात अडचणी येणाऱ्या मुलांसाठी योग्य मार्गदर्शन, आत्मविश्वास वाढवणारे समुपदेशन आणि विशेष शिक्षणाची प्रभावी साथ हेच त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे...
अंजलीताईंच्या साथीने चांदिवलीतील सहयोग सोसायटीच्या प्रांगणात शिव प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून छत्रपतींच्या प्रतिमेला हार घालण्यात आला...
तसेच शिवज्योत स्वीकारण्याचा सन्मान लाभला… तो स्वराज्याच्या विचारांना स्पर्श करण्याचा दिव्य अनुभव होता... ज्या भूमीतून स्वराज्याची ज्योत प्रज्वलित झाली, त्या तेजस्वी परंपरेची ही अखंड मशाल… शौर्य, दूरदृष्टी आणि जनकल्याण यांचे जिवंत प्रतीक... त्यामुळेच मनाचा निर्धार अधिक भक्कम झाला...
छत्रपतींच्या तेजस्वी विचारांची ही मशाल हातात घेताना जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली...
स्वराज्य, शौर्य आणि संस्कार यांचे प्रतीक असलेली ही मशाल प्रत्येक हृदयात स्वाभिमान प्रज्वलित करत राहो... रस्ता कितीही लांब असो, उद्दिष्ट कितीही कठीण असो... स्वराज्याची प्रेरणा सोबत असेल तर प्रत्येक वाट विजयाकडेच जाते...
या राईड निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमातील... छत्रपतींची आग्र्याहून सुटका या इतिहासाची माहिती सर्वांना दिली... आणि छत्रपतींना आग्र्यात नजरकैदेत ठेवलेल्या मीनाबाजार कोठी या वास्तूवर मोठे संग्रहालय निर्माण होतय या बद्दल सांगितले... केंद्र सरकारने १७ ऑगस्ट हा दिवस शिव चातुर्य दिन म्हणून जाहीर केला आहे...
स्वप्नीलने पितळी पाण्याची बाटली भेट म्हणून दिली... विशेष म्हणजे त्या बाटलीवर छापलेली महाराजांची प्रतिमा पाहताच छाती अभिमानाने भरून आली.
सहयोग सोसायटीतील सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार.
आजची पन्नास किमी राईड करून महाराजांना मानाचा मुजरा...
जय शिवराय...
सतीश जाधव सायकलिस्ट
7977690693
Very nice sir. U r a Inspiretion to all youth.
ReplyDelete