Sunday, October 2, 2022

सायकल वरुन भारत भ्रमंतीला निघालेला अवलिया... दि. ०२.१०.२०२२

सायकल वरुन भारत भ्रमंतीला निघालेला अवलिया ... 
 दि.  ०२.१०.२०२२

बुलढाणा जिल्ह्यातील माझा परममित्र श्री संजय मयुरे (वय ६८ वर्ष) यांनी आज महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून  २० हजार किमी ची सायकल राईड मुंबईतील गेट वे ऑफ़ इंडिया येथून सुरू केली...

ते दररोज १०० किमी अंतर पार करणार आहेत...

 मुंबई पासून कोकणमार्गे कन्याकुमारी पुढे चेन्नई आणि कलकत्ता पर्यत त्याची सायकलवारी समुद्र किनाऱ्याने होणार आहे... पुढे आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, मीझोराम, नागालँड, त्रिपुरा, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात मार्गे परत मुंबईला येणार आहेत.

 प्रदूषण मुक्त पर्यावरणाचा संदेश  संपूर्ण भारतभर देणार आहेत... तसेच त्यांची ही सायकल वारी देशाच्या शूरवीर जवानांना समर्पित आहे...

कुटुंबीयांची विशेष करून सौ मयुरे वहिनींची भरभक्कम साथ असल्यामुळेच संजय सायकलने परदेशवाऱ्या तसेच भारत भ्रमंती करू शकला आहे... "जी ले अपनी जिंदगी" हाच संदेश  मयुरे वहिनी देत आहेत...
या प्रसंगी माननीय श्री बजरंग बनसोडे साहेब (NIA पोलीस आयुक्त) यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले... 

माणसाच्या मनात आंतरिक सकारात्मक ऊर्जा असेल तर तो कोणत्याही वयात काहीही करू शकतो... त्याचेच मयुरे काका हे उदाहरण आहे. मयुरे काकांची २० हजार किमी भारतभूमीची सायकलवारी सर्वांसाठी आदर्श असेल.. यात प्रदूषणमुक्ती तसेच फिट इंडियाचा संदेश आहे... "काका तुम्ही असेच इतिहास रचत जावेत... त्या पाऊलखुणावर चालवण्याची ऊर्जा आम्हाला सतत मिळत राहील" ... 

माननीय बजरंग बनसोडे साहेब (NIA पोलीस आयुक्त) यांनी श्री संजय मयुरे यांच्या भारतभूमीच्या सायकल वारीला हिरवा झेंडा दाखविला... 

या कार्यक्रमाला बुलढाणा रॉयल रायडर्सचे सायकल प्रेमी  तसेच संजयचा मित्रपरिवार आणि कुटुंबिय आवर्जून उपस्थित होते. 


रिगल चित्रपट गृहा समोर असलेल्या लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मारकाला  संजयने अभिवादन केले... 

मुंबईतून सुरू केलेल्या या सायकल वारीला समरपयामी सायकल परिवारातर्फे श्री लक्ष्मण नवले यांनी शुभेच्छा दिल्या. 

आजची संजयची ग्रेटभेट अतिशय स्फूर्तिदायी होती... 

सतीश जाधव...
मुक्त पाखरे... 

11 comments:

  1. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गजानन माऊली , हॅपी जर्नी, सर्व देव देवतांच्या कृपेने आपला प्रवास सुखकर होईल.

    ReplyDelete
  2. हार्दिक शुभेच्छासह अभिनंदन......

    ReplyDelete
  3. हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  4. संजयजी हार्दिक शुभेच्छा .
    सतीशजी नेहमी प्रमाणे भन्नाट लेखन

    ReplyDelete
  5. संजय जी नमस्ते कराडला कधी किती वाजता येणार आहे खालील नंबर वर फोन करावा
    8087224436

    ReplyDelete
  6. संजय जी नमस्ते कराडला कधी व किती वाजता येणार आहे खालील नंबर ला फोन करावे 8087224436

    ReplyDelete
  7. Best wishes for every moment, be safe and enjoy the Ride👍💐

    ReplyDelete
  8. हार्दिक शुभेच्छा संजयजी

    ReplyDelete
  9. Because of you we come to know
    My vikramveer namaskar
    My best wishes to Sanjay
    Rajesh

    ReplyDelete
  10. ॲाल द बेस्ट 👍🌹

    ReplyDelete
  11. श्री काकांना भगवंत अतिशय उर्जित ऊर्जा मिळो आणि त्यांचं पूर्णब्रह्मण पूर्ण हो अशी भगवंता चरणी प्रार्थना

    ReplyDelete