Thursday, December 8, 2022

४२ हजार किमी सायकलिंग आणि १११ वे रक्तदान...

४२ हजार किमी सायकलिंग आणि  १११ वे रक्तदान...
दि. ८ डिसेंबर २०२२

पंढरपुर ते पंजाब (घुमान) ही सायकल वारी नुकतीच पुर्ण झाली होती... संत शिरोमणी श्री एकनाथ महाराज यांनी समता, शांतता आणि बंधुता हा मानव कल्याणाचा  विश्वसंदेश घेऊन भागवत धर्माच्या प्रचारासाठी संपूर्ण भारत भ्रमंती केली होती... त्यांच्या पदकमलाने पावन झालेल्या मार्गावरूनच सदरची सायकल वारी संपन्न झाली... 

याच सायकल वारीच्या अनुषंगाने ४२ हजार किमीचा सायकलिंग टप्पा लीलया पार झाला होता.. महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सायकलिस्ट तसेच पालखी सोहळ्याचे सदस्य, पत्रकार, भजनी मंडळातील वारकरी, भागवत धर्म प्रसारक समिती, पालखी सोहळा पत्रकार संघ आणि नामदेव समाजोन्नती परिषद असे जवळपास दीडशे वारकरी कायमचे मित्र झाले आहेत...


 पांडुरंगाच्या कृपेने सायकलिस्ट मंडळींची सेवा करण्याची सुद्धा संधी मिळाली... त्यासाठी या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक श्री सूर्यकांत भिसे गुरुजी यांचा शतशः ऋणी आहे...

याची पुढील आवृत्ती म्हणजे.... महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहासष्टव्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त सुरक्षा रक्षक दल (पाणी खाते) यांनी आज भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते... या रक्तदान शिबिरात मुख्य अतिथी म्हणुन उपस्थित राहण्याची संधी माझे गायक मित्र श्री गणेश हेटगे यांच्यामुळे मिळाली... 

विशेष म्हणजे प्रमुख सुरक्षा अधिकारी श्री अजित तावडे साहेब यांनी  आतापर्यंत केलेल्या रक्तदान कामगिरी बद्दल माझा सन्मान केला.
 

तर विभागीय सुरक्षा अधिकारी श्री सुशील बडेकर यांच्या समवेत मला १११ वे रक्तदान करण्याचा योग लाभला...
 

तेथील सर्व कर्मचारी वृंदाबरोबर रक्तदानाच्या माहितीसाठी सुसंवाद करण्याची संधी मिळाली...

आता मला सांगा...  सुख म्हणजे नक्की काय असत... आपल जीवन इतरांच्या कामी यावे... यातच परम सुखाची परिसीमा आहे... हाच संदेश महामानव बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जीवनकार्यातून मिळतो...

या दोन्ही थोर व्यक्तिमत्वांना ४२ हजार किमी सायकलिंग आणि  १११ वे रक्तदान सादर समर्पण...

मंगल हो...

सतीश जाधव...
मुक्त पाखरे... 

10 comments:

  1. आदरणीय सतीश जाधव

    आपल्या सायकल भ्रमंतीला सलाम

    ✌️ राम कृण हरी✌️

    ReplyDelete
  2. ✌️रा✌️म✌️कृ✌️ष्ण ✌️ह✌️री✌️

    ReplyDelete
  3. Awesome,
    111 वेळा रक्तदान
    आणि 66 वर्ष वयोमान
    आणि 42000km प्रदुषण मुक्त सायकल प्रवास
    हा पण एक जागतिक पातळीवर विचार करण्यासाखी घटना असून कदाचित हा पण एक जागतिक विक्रम प्रस्थापित होऊ शकतो असे मत आहे.
    आपणास खूप खूप शुभेच्छा..........
    मंगल हो !

    ReplyDelete
  4. व्यक्ती अतिशय मुक्त छंद ज्याप्रमाणे पाण्याचे महत्व त्याप्रमाणेच रक्ताचे महत्त्व अशा गोड व्यक्तिमत्त्वाने 111 वेळा रक्तदान केलं विशेष म्हणजे सायकल हे जीव की प्राण व त्या अंतर्गत 42 हजार किलोमीटर सायकल चालवणे फार कौतुकास्पद आपल्या या कार्याचा गौरव करावा तेवढा फार कमी समाजाचे आपण देणे लागतो ते आपण कोणत्याही पद्धतीने द्यावी ही संकल्पना अतिशय सुरेख आणि छान

    ReplyDelete
  5. सर हा एक योगायोग म्हणावा लागेल. तुमचे आणि माझे नाव सेम आहे. मी तुमचा नावकरी सतिश जाधव..... आज तुम्हाला प्रत्यक्ष भेटून आणि मंच्यावर तुमच्या कार्याबद्दल दोन शब्द बोलून खुप छान वाटले. सर ह्या तुमच्या उल्लेखानिय कामगिरीची इतिहासात सदैव नोंद राहील.....!

    ReplyDelete