Monday, December 12, 2022

एक छोटीशी चूक... बेतू शकते जिवावर...

एक छोटीशी चूक...  बेतू शकते जिवावर... 

खरतर असे प्रसंग घडू नये म्हणून प्रत्येक सायकलिस्ट  खबरदारी घेत असतो...  परंतू अनवधानाने किंवा चुकीने... ती गोष्ट घडली... की मग त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसतो...

कालच १०० किमी ग्लोबल पगोडा सायकल राईड दरम्यान हा प्रसंग घडला... परंतू सायकलिंगचे सर्व सेफ्टी मेजर परिधान केले असल्यामुळे थोडक्यात बचावलो...

सकाळी अंबरीष गुरव, तुषार रेडकर आणि विजय कांबळे सोबत सेना भवन कडून सायकल राईड सुरू झाली...

दहिसर चेक नाक्यावर रघुनाथ घडशी भेटला...  घोडबंदर लुप मारण्याचे ठरविले होते...  


पण सकाळी अकरा  वाजता अंधेरीच्या सोसायटी मध्ये असणारी मीटिंग गाठणे सुद्धा आवश्यक होते... म्हणून मीरा भायंदर नाक्यावरून उत्तन मार्गे ग्लोबल पगोडा राईड करण्याचे ठरले...

बरोबर सकाळी पावणे नऊ वाजता ग्लोबल पगोडा येथे पोहोचलो... वाटेत महेश दाभोळकर आणि इतर सायकलिस्ट मित्रांची भेट झाली...

पगोडाचे बाहेरूनच दर्शन घेऊन मनोरीकडे कूच केले...  मनोरी मार्वे मढ आयलंड वर्सोवा करून अंधेरीला जायचे नक्की केले..

डोळ्याच्या नजरेत मनोरी बीच दिसू लागला... आणि मनोरीला केलेल्या धम्माल मस्तीचे जुने दिवस आठवले... मन प्रफुल्लित झाले... हवेत तरंगत समुद्र न्याहाळू लागले... त्या आनंदाच्या भरात तो लांबवर दिसणारा मनोरी  बीच सोबत सायकलिंग करत असलेल्या विजयला उजवा हात समुद्राकडे करून दाखवत होतो...

क्षणार्धात काय झाले कळलेच नाही... समोरच्या  स्पिड ब्रेकर वरुन सायकल धाडकन जमिनीवर कोसळली... पाय आणि खांदा सायकल खाली आला... डोके कचकन जमिनीवर आदळले... हात रस्त्यावर घसपटले... ट्रॅक पँट फाटली... 

भानावर यायला मिनिट भर लागले... तेव्हा लक्षात आले समोर पांढरे पट्टे न मारलेला स्पिड ब्रेकर दिसलाच नाही... सायकल हॅन्डल वरुन क्षणभर सोडलेला हात... जिवावर बेतणारा होता... परंतु डोक्यात चांगल्या प्रतीचे हेल्मेट... हातात ग्लोव्हज असल्यामुळे डोक्याला कोणतीही हेड इंज्युरी झाली नाही आणि पंजा सोलपटला नाही... पण गुढग्याच्या खाली पायाला बरेच खरचटले होते... खांदा दुखावला होता... तरी बरं... मागून कोणतेही मोठे वाहन नव्हते...

तुषारने पाणी दिले तर विजयने पुरणपोळी खायला दिली... जमिनीवर एव्हढ्या जोरात आपटलो होतो की उजवा पाय आणि खांदा बधिर झाला होता... तुषार आणि रघुनाथ थोडेसे घाबरलेले वाटले... पण विजय एकदम खंबीर होता... वाकडे झालेले हॅन्डल विजयने सरळ केले... चाक सुद्धा थोडे व्होबल झाले होते... ते पुढच्या सायकल दुकानात ठीकठाक करून राईड पूर्ण करण्याचे ठरविले...

पेडलींग सुरू केल्यावर लक्षात आले पाय आणि खांदा व्यवस्थित काम करतोय... कुठेही मेजर ईंज्युरी नाही... मार्वेला रघुनाथला टाटा केला तर वर्सोवा मेट्रो स्टेशन कडे विजय आणि तुषारला बाय बाय करून अंधेरी सोसायटीत मीटिंग अटेंड केली..

पेडलिंग करत मुंबईत आलो... लोअर परळला सायकल शॉपी मध्ये खुप गर्दी असल्यामुळे सखीला उद्या ठिकठाक करण्याचे ठरविले... रात्री शाळकरी मित्र नागेश सोपारकर याने वाशीला विष्णु दास भावे  नाट्यगृहात ठेवलेल्या ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमात सहभागी झालो...

तेथे स्टेज वर डान्स पण केला...

 त्यामुळे खात्री झाली... सकाळी झालेला अपघात फारसा गंभीर नाही... कोठेही फ्रॅक्चर नाही... अपघात हा अपघातानेच होतो... पण  बचावलो ते निव्वळ  सेफ्टी मेजर मुळेच... डोक्यात चांगल्या प्रतीचे हेल्मेट आणि हातात ग्लोव्हज नसते तर... कालच  हॉस्पिटल मध्ये बेशुद्धावस्थेत पोहोचलो असतो... पण तसे न घडल्यानेच १०० किमी राईड पुर्ण झाली होती... 

मित्रांनो... सर्वांना एकच सांगणे आहे... सायकल वरुन  हात एका क्षणांसाठी सोडल्यामुळे काय घडू शकते... याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे... म्हणूनच सर्व सेफ्टी मेजरसह सावधपणे सायकल चालवा... आणि मस्त एंजॉय करा... 

आज सखीची काळजी घ्यायची आहे तसेच पायाला आणि खांद्याला आराम द्यायचा आहे... 

मंगल हो... 


सतीश जाधव... 
मुक्त पाखरे 

22 comments:

  1. मामा जास्त लागले नाही ना काळजी घ्या

    ReplyDelete
  2. काळजी घ्या जास्त लागले नाही हे बरंच झालं पण तरीही थोडा आराम करा.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद नमिता.. आज फक्त चाक दुरुस्त करून आणले... बाकी आराम आहे... सर्वांनी काळजी घ्यावी या साठीच हा ब्लॉग आहे...

      Delete
  3. Satish Sir, please take care

    ReplyDelete
  4. असें विचित्र अपघात अचानकच होतात.. आणि तुम्ही निष्काळजी तर अजिबात नाहीत.. यावरून एकच गोष्ट शिकायची कीं क्षणभराही गाफिल राहणे महागात पडू शकते.. फ़ार इजा न होता तुम्ही सुखरूप राहिलात ही आनंदाची गोष्ट आहे.. यापुढे जास्त काळजी घ्यालच..

    ReplyDelete
  5. अरुणा धन्यवाद... खर आहे तुझ म्हणनं... क्षणभरासाठी केलेला गाफीलपणा सुद्धा अतिशय कष्टदायक होऊ शकतो...

    ReplyDelete
  6. Eye opner n learning experience notes forwarded for rest of d fellow cyclists...it's gud u didn't had major injury take care sir...

    ReplyDelete
  7. माझा सुधा असाच अपघात झाला होता हायड्रोलिक ब्रेक पट्कन ब्रेकिंग झाली होती आणि सामान्यतः भारतीय सायकलचा मागील टायरचा ब्रेक डाव्या हाताच्या बाजूला असतो ​​पण मी GIANT Bicycle (अमेरिकन) सायकल घेटली होती आणि तिचा डाव्या हाताच्या बाजूचा ब्रेक हा समोरच्या टायरचा ब्रेक मारला जातो. उजवीकडे वळण्यासाठी उजव्या हाताने मी सिग्नल देत होतो आणि डाव्या हाताकडचा ब्रेक मारताच मी कोलांटी उडी मारली होती (summersault) कारण हायड्रॉलिक ब्रेक चा अंदाज आला नाही त्यावेळेस हा सर्व प्रकार कल्याण शिल फाटा वळणवर झाला अपघात होताना सुदैवाने पाठून गाडी येत नव्हती आणि मी वाचलो हेल्मेट अस्ल्या मुळे डोक्याला दुखापत झाली नाही
    हाताला पंजाला थोड खरचटलं होतं फक्त्त 1 महिना लागला रिकव्हरी कारायला माग थेव्हा पासुन ठरवलं सेफ्टी फर्स्ट. माझा सुधा असाच अपघात झाला होता हायड्रोलिक ब्रेक पट्कन ब्रेकिंग झाली होती आनी सामान्यतः भारतीय सायकलचा मागील टायरचा ब्रेक डाव्या हाताच्या बाजूला असतो ​​पण मी GIANT Bicycle (अमेरिकन) सायकल घेटली होती आणि तिचा डाव्या हाताच्या बाजूचा ब्रेक हा समोरच्या टायरचा ब्रेक मारला जातो. उजवीकडे वळण्यासाठी उजव्या हाताने मी सिग्नल देत होतो आणि डाव्या हाताकडचा ब्रेक मारताच मी कोलांटी उडी खाल्ली (sumersault) मारली होती कारण हायड्रॉलिक ब्रेक चा अंदाज आला नाही त्यावेळेस हा सर्व प्रकार कल्याण शिल फाटा वळणवर झाला अपघात होताना सुदैवाने पाठून गाडी येत नव्हती आणि मी वाचलो हेल्मेट असल्या मुळे डोक्याला दुखापत झाली नाही
    हाताला पंजाला थोडा खरचटलं होतं फक्त्त 1 महिना लागला रिकव्हरी कारायला माग थेव्हा पासुन ठरवलं सेफ्टी फर्स्ट आणि नवीन सायकलीएस्ट ला विनंती आहे कि सायकल घेताना मागचा आणि पुढचा ब्रेक कुठल्या बाजूला आहे चेक करून घ्या अमेरिकन किंवा इतर सायकल असेल तर दुकानदार कडून बदल करून घ्या मी माझा बदलून घेतला आहे थोडा खर्च होईल पण जीव वाचेल.

    ReplyDelete
    Replies
    1. खरं आहे अनावधानाने अपघात होतात... आणि ट्राफिक असलेल्या रस्त्यावर खूप काळजी घ्यावी लागते... सायकलिंग करताना मोबाईल वर बोलणे फोटो विडिओ शुट करणे सुद्धा धोकादायक ठरते...

      Delete
  8. 💐🙏😊 नमस्कार सर.

    होय, सायकल चालविताना काळजीपूर्वक व सगळीकडे लक्षपूर्वक असणे फार आवश्यक आहे. तसेच खड्डे किंवा स्पीड ब्रेकर असल्यास हॅन्डलवरची दोन्ही हातांची पकड ही फार मजबूत असणे गरजेचे आहे. आणि स्पीड ब्रेकर रंगविलेला नसेल तर तो पटकन लक्षात येत नाही आणि मग असे प्रकार घडतात.
    देवाचे आभार, थोडक्यात निभावले.
    🙏🙏

    माझ्या बाबतीत सुद्धा घणसोलीला असेच झाले होते, स्पीड ब्रेकर दिसला नव्हता. वेग अतिशय कमी असल्यामुळे काही फारसा त्रास झाला नव्हता.

    तरी काळजीपूर्वक असणे आवश्यक आहे.
    🙏🙏

    ReplyDelete
    Replies
    1. लक्ष्मण... सायकलिंग करताना सतत काळजी घेणे अगत्याचे आहे... त्यामुळे असे प्रसंग टाळता येतील

      Delete
  9. सतीश काळजी घे God bless you.👍proud of you💐💐

    ReplyDelete
    Replies
    1. होय नक्कीच... आयुष्यभर सायकल चालवायची आहे... त्यामुळेच खूप सावधान असणे आवश्यक आहे.

      Delete