Tuesday, May 23, 2023

नवनीत एक्सप्रेस

नवनीत एक्सप्रेस

सकाळी पाच वाजता घरून राईड सुरू झाली... पहाटेच्या कुंद वातावरणात भराभर मुलुंडपर्यंत जाऊन परत यायचे होते... आज साथीला होता ताज्या दमाचा गडी नवनीत वरळीकर... बरोब्बर सव्वा पाच वाजता दादर सर्कल जवळ त्याची भेट झाली... आणि मग सुरू झाली... भन्नाट रायडिंग...


कोटीच्या कोटी उड्डाणे... झेपावे उत्तरेकडे... या मारुती स्तोत्रातील उक्ती प्रमाणे... नवनीतच्या अंगात वारा संचारला होता... शक्यतो फ्लाय ओव्हर टाळत जोरदार आणि जोमदार राईड सुरू झाली... हवेतील आद्रतेमुळे शेवटाचे दोन फ्लाय ओव्हर चढताना अंगातून घाम टपटपू लागला...  पण उतरताना वार्‍याच्या झुळका भरपाई करून द्यायच्या... घाम गारवा देत देत सुकतो आहे... हे कळत होतं...

तासाभरात मुलुंड गाठले... नेहमीच्या पॉइंट वरील बेंच काढून टाकल्या मुळे... फुटपाथवर फतकल मारली... घरापासून पंचवीस किमी राईड झाली होती... ती सुद्धा तेवीस किमी वेगाने...

नवनीत आज प्रचंड जोशात होता... म्हणाला "निघूया आपण"   पाच मिनिटे विश्रांती घेऊन हायड्रेट होऊन परतीचा प्रवास करणे आवश्यक होते... घामामुळे आणि तोंडातून बाहेर पडणार्‍या वाफेमुळे शरीरात झालेल्या पाण्याची कमतरता भरपूर पाणी पिऊन भरून काढली... सोबत आणलेल्या खजूरांचा नवनीत सोबत आस्वाद घेतला...

"ऐरोली जंक्शन पार करतानाच हेड विंड सुरू झाली... त्यामुळे वेग कमी झाला... अशा वेळी अँरो डायनॅमिक पोझिशन घेऊन... .. हवेचा विरोध कापत वेगात पुढे जाता येते... हेच टेक्निक पंढरपुर वारीत परतीच्या राईड मध्ये अवलंबावे लागणार आहे...

चेंबूर फ्लायओव्हर खालून जाताना... जोरदार हाक ऐकू आली... तशी सायकल वळवली... समोर आयर्न मॅन दिपक निचित ठाकला... नव्या लूक मधील हसतमुख दिपकला पाहिलं आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला... दिपक सोबत मुंबई कन्याकुमारी आणि मुंबई दिल्ली सायकल राईड विक्रमी दिवसात  पूर्ण केली होती...

इतक्यात फ्लाय ओव्हर वरुन आणखी एक आरोळी कानावर पडली... जुना साथीदार ब्रिजेशची भेट झाली... सदाबहार ब्रिजेश बरोबर मनाली लेह राईड केली होती... तसेच नुकतीच हिल्स इन गोवा ही सायकल राईड केली होती... नवीन राईडचे  प्लॅन शेअर झाले... सप्टेंबर महिन्यातील हिमालयन सायकलिंग साठी ब्रिजेशने ताबडतोब होकार दिला... "हिमालयन सायकलिंग हा ब्रिजेशचा वीक पॉईंट आहे" 

 नवनीतची दोन प्रतिभाशाली रायडर बरोबर ओळख झाली... हेच आजच्या ५०  किमी फ्लाइंग राईडचे फलित होते...

मंगल हो !!!

सतीश जाधव 
मुक्त पाखरे... 

6 comments:

  1. mast sir tumcha anubhav khoop chaan aahe, see you soon.

    ReplyDelete
  2. सतीश सर तुमच्या हाती नवनीत नावाचा अनमोल हिरा लागला आहे, त्याला जपुन ठेवा. तसेच आपल्या पुढील सर्व राइड्स "कोटीच्या कोटी उड्डाणे... झेपावे उत्तरेकडे" अश्या प्रकारेच होवोत् हया शुभेच्छा.
    आपला शुभ चिंतक
    यशवंत शिवडीकर

    ReplyDelete
    Replies
    1. थँक्यू दादा....U r motivation is always part of my Life Iam here because of you...

      Delete
  3. सुंदर अनुभव…तितकीच रसाळ, सोपी भाषा…मंगल हो🙏😊🙏

    ReplyDelete
  4. सायकल कोणीही चालवू शकतो परंतु तर्कबध सायकल चालवणे हे बाळकडू सतीश जाधव सरांनी मला पाजले त्यामुळे बरीच ऊर्जा आपण वाचवू शकतो हे शिकलो... सतीश जाधव सर ह्यांचे मनापासून आभार.... आपला ऋणानुबंध नवनीत वरळीकर...

    ReplyDelete
  5. सर आपल्याकडून नेहमीच मला प्रेरणा मिळत आहे सायकलिंग मधील नवनवीन उच्चांक साधणारे आमचे सतीश सर आजही आमच्याबरोबर तेवढेच तरुण आहेत मनाने आणि विचारांनी हा माणूस मोठा आहेच परंतु सायकलिंगचा विचार केला असता किलोमीटरच्या बाबतीत सुद्धा सर्वांच्या पुढे केलेल्या आहेत

    ReplyDelete