Sunday, July 2, 2023

पावसातील...थरारक दिंडीगड सायकल राईड...

पावसातील...थरारक दिंडीगड सायकल राईड...

दिंडीगडचा दोन किमीचा अवघड घाट... एका दमात कुठेही न थांबता चढणे.. हाच निग्रह मनाशी करून आजची राईड आयोजित केली होती... 

दिंडीगडचा रस्ता अतिशय छोटा आणि समोरून गाडी आली तर सायकल वरून उतरणे अपरिहार्य होते... त्यात रात्री मित्राचा फोन आला... दिंडीगडचा रस्ता खूप खराब आहे... जागोजागी तुटलेला आहे... त्यामुळे स्वतःला दिलेले चलेंज आणखी खडतर झाले होते... 

मुंबई वरून पन्नास किमी राईड करून दिंडी गड पायथ्याला पोहोचलो... वड पारंबी खेळताना लटपटलो होतो...

सोबत अकरा सायकालिस्ट मित्र...  तगडे गडी आणि नव्या दमाचे होते... सर्वांना  रस्त्याची कल्पना दिली आणि सांगितले आता प्रत्येकाला स्वतःचा इंड्युरंस तपासता येईल... 

घाट सुरु झाला आणि प्रत्येक जण जोर लावून घाटावर चढण्याचा प्रयत्न करू लागला... आज शारीरिक ताकदी बरोबर मानसिक ताकदीचा कस लागणार होता... आणि झालेही तसेच... कुठेतरी मानसिक निग्रह कमी पडला... काही जणांचे पुढचे चाक वर उचलल्यामुळे थांबत होते... काही जणांची दमछाक झाली होती... आणि सर्वजण मागे पडले... 

सायकलच्या हॅण्डलवर टूल बॅग आणि स्पीकर लावला असल्यामुळे सखीचे पुढचे चाक उचलले गेले नाही...  शेवटी असलेला एकांडा शिलेदार कासवाच्या गतीने कुठेही न थांबता पुढे जात होता... दोन तीव्र अवघड वळणावर सखी लटपटली... पण जोरात ओरडून तिला सावध केले... प्रचंड दमछाक झाली होती... पण दुर्दम्य आत्मविश्वास होता... संपूर्ण लक्ष पुढील चाकावर केंद्रित करून गियर एक x एक वर ठेऊन सुध्दा झिकझाक सायकलिंग सुरू होते... 

एखादं कार्य  जेव्हा मन लाऊन आणि निग्रहाने करतो... तेव्हा ब्रम्हांडातील सर्व दृश्य-अदृश्य शक्ती त्या कार्याच्या सफलतेसाठी सक्रिय होतात...याची प्रचिती आली...

टॉपला असणाऱ्या  दिंडीगड महादेव मंदिराच्या  पायरीला सखीच्या चाकाचा स्पर्श झाला... आणि सखी विसावली...

वरून पाऊस आणि अंगातून घामाच्या धारांनी अंग थबथबले होते... गडाच्या पायरीवरच आडवा झालो... खडतर निग्रहाने... अतिशय खराब आणि छोटेखानी रस्ता असताना सुद्धा...  तो दोन किमीचा अवघड आणि खडतर घाट कुठेही न थांबता चढून जाण्याचे बळ पांडुरंगानेच दिले होते... 

महादेवी मंदिराजवळ असलेल्या धबधब्यात घुसलो... आणि राईडचे सार्थक झाल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होता...

प्रत्येकाने प्रचंड एन्जॉय केली होती आजची दिंडीगड राईड... पावसाळी डोंगराळ राईडसाठी MTB सायकलच का हवी याची कल्पना सर्वांना आली...

भर पावसातील 102 किमीची थरारक दिंडीगड राईड... आज सकाळी 3.45 वाजता सुरू झाली होती आणि सायंकाळी 4 वाजता पूर्ण झाली... 

हिमालय सायकलिंगच्या तयारीची ही पहिली पायरी होती... 

मंगल हो...!!!

सतीश जाधव

9 comments:

  1. Great to meet and ride with you , Awesome day with you

    ReplyDelete
  2. खूपच छान....
    आपली ऊर्जा ,चिकाटी पाहून मलाही स्फूर्ती मिळते.....
    - मनोज

    ReplyDelete
  3. सर तुमच्या बरोबर सायकलिंग करताना आमचे अहोभाग्य की अजूनही जे बाळकडू चे धडे मिळतात ते नक्कीच पुढील सायकलिंग राईडला आम्हाला उपयोगी पडतील. धन्यवाद

    ReplyDelete
  4. मी तर हा प्लॅन मिस केला,
    पण पुढच्या प्लॅन मध्ये मी नक्कीच असेन,
    आपले सायकलिंग प्लॅन खरच अप्रतिम असतात,
    त्यामुळे आम्हा नवीन सायक्लिस्टला
    खूप प्रेरणा व प्रोत्साहन मिळते.

    गुरुपौर्णिमेच्या आपणास खूप खूप शुभेच्छा सर.

    ReplyDelete
  5. 🙏🙏🙏 सर...आपल्या सर्व लढवय्यांना माझा सलाम🙏🙏🙏

    ReplyDelete
  6. खूप छान वर्णन आणि photos..! आपले Cycling चे थरारक अनुभव प्रेरणादायी आहेत..!

    ReplyDelete
  7. 🚴‍♂️🚴‍♂️खूपच छान वर्णन केले, सर 🙏🙏घुमान वरीत आपल्या सोबत सायकलिंग करण्याचे भाग्य लाभले🙏🙏

    ReplyDelete