मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि मेडिक्लेम एक दुष्टचक्र...
कॉम्प्युटरवरच्या प्रतिमा जरा भुरकट दिसायला लागल्या तेव्हा लक्षात आले... चष्म्याचा नंबर वाढला आहे... म्हणून लालबागच्या प्रसिद्ध मारू रुग्णालयात डोळे तपासायला गेलो...
डोळ्यात औषध टाकून डोळे तपासले... तेव्हा डॉक्टर म्हणाले मोतीबिंदू झाले आहे... शस्त्रक्रिया करून मोतीबिंदू काढावे लागेल.... लगेच त्यांनी रक्ताचे रिपोर्ट ECG, XRay इत्यादी टेस्ट करायला सांगितल्या... तसेच इंपोर्टेड लेन्स बसवायची असेल तर 35000 रुपये खर्च सांगितला... सर्व रिपोर्ट आणि ऑपरेशन इत्यादीचा खर्च मिळून एकूण साठ हजार रुपये लागतील असे सांगितले...
मेडिक्लेम काढलेल्या SBI general insurance कंपनी कडे चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले... मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी कॅशलेस फॅसिलिटी नाही... ऑपरेशन झाल्यावर पैसे परत मिळतील...
याच शस्त्रक्रियेसाठी हिंदुजा रुग्णालयात चौकशी केल्यावर माहिती मिळाली... लेन्स साठी 75 हजार रुपये तसेच सर्व टेस्ट आणि ऑपरेशन मिळून दिड लाख रुपये खर्च येईल...
फेब्रुवारी महिन्यात काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारी असल्यामुळे डॉक्टर ना विचारले मार्च महिन्यात ऑपरेशन केले तर चालेल काय... त्यांनी होकार दिला...
टॅक्स प्लॅनर मित्र महेंद्रला सांगितले... मेडिक्लेम फेब्रुवारी अखेरीस संपतोय तो रिनिव्ह करावा लागेल... कन्याकुमारी सायकल टुरवर असताना sbi जनरल इन्शुरन्स कडून मेसेज आला... अगोदरचा रु 10500 प्रीमियमचा मेडिक्लेम आता इलिट मेडिक्लेम मध्ये परावर्तित करावा लागेल आणि त्याचा प्रीमियम 93000 रुपये आहे... हे समजल्यावर महेंद्रला सांगितले... सध्याचा मेडिकल दुसऱ्या कंपनीत पोर्ट कर... परतू ती सोय सुद्धा sbi जनरल इन्शुरन्सने ठेवली नव्हती... त्यामुळे सतत पाच वर्ष सुरू असलेलेला मेडिक्लेम मार्च महिन्यात बंद झाला...
वयाच्या पासष्टी नंतर कोणत्याही कंपनीचा नवीन मेडिक्लेम घ्यायचा तर सर्व टेस्ट कराव्या लागणार होत्या तसेच प्रीमियम सुद्धा पन्नास हजारापेक्षा जास्त होता... तेसेच कोणत्याही मेडिक्लेम मध्ये 100 टक्के पैसे कधीच मिळत नाहीत... याचा अनुभव घेतला होता... नवीन मेडिक्लेम काढल्यावर मोतीबिंदू ऑपरेशन करण्यासाठी एक वर्ष थांबावे लागणार होते... त्यामुळे मेडिक्लेमचा नाद सोडून दिला.. आणि स्वतःच्या पैशांनी मोतीबिंदू ऑपरेशन करायचे नक्की केले...
मुंबई महापालिकेच्या sogo संगीत मैफिलीमुळे नायर रुग्णालयात सध्या कार्यरत असलेल्या सिस्टर प्रिया आणि साक्षी यांची मैत्री झाली होती... त्यांनी सांगितले नायर मध्ये डॉ नयना पोतदार यांच्या युनिटच्या opd मध्ये डोळे तपासा... म्हणजे सेकंड ओपिनियन पण होईल आणि ऑपरेशन आवश्यक असेल तर अतिशय कमी खर्चात होईल... (खाजगी रुग्णालयात आवश्यक नसताना सुद्धा ऑपरेशन केली जातात आणि मेडिक्लेम द्वारे पैसे उकळले जातात... अशी बरीच प्रकरणे झाली आहेत...)
स्वतः माजी महापालिका कर्मचारी असल्यामुळे रिपोर्ट किंवा ऑपरेशन यासाठी काही खर्च येणार नव्हता...
आठवड्यापूर्वी डॉ नयना पोतदार यांच्या opd मध्ये औषध घालून डोळे तपासले... जवळ जवळ सात आठ वेळा वेगवेगळ्या मशीन खाली दोन्ही डोळे तपासण्यात आले... पुन्हा औषध घालून सुद्धा तपासणी झाली... डॉ दिप, डॉ शिवानी, डॉ श्रुती, डॉ माधव या सर्वांनी डोळे तपासल्यावर मुख्य डॉ अनुजा यांनी डोळ्याची पाहणी केली... आणि मोतीबिंदू फर्स्ट स्टेज मध्ये आहे... याचे निदान झाले... डॉक्टर म्हणाले नंबर थोडा वाढला आहे... त्यामुळे नवा चष्मा घेऊन सहा महिने ऑपरेशन पुढे ढकलू शकता... सायकलचे इव्हेंट सतत चालत असल्यामुळे कुटुंबियांच्या सहमतीने ताबडतोब ऑपरेशन करायचे नक्की केले...
डॉक्टरांनी XRay, ECG, रक्ताचे वेगवेगळे रिपोर्ट, HIV, BP, मधुमेह इत्यादीचे रिपोर्ट आणायला सांगितले... नायर रुग्णालयातील सिस्टर्स गायिका प्रिया आणि साक्षी मुळे सर्व रिपोर्ट्स दोन दिवसात मिळाले... तेही कोणताही खर्च न होता...
दोन दिवसांनी पुन्हा OPD मध्ये डॉक्टर अनुजा यांना दाखविले तर त्यांनी सांगितले पुढच्या आठवड्यात ऑपरेशनची तारीख नक्की करूया... पुन्हा येथे प्रिया आणि साक्षी यांची ओळख उपयोगाला आली... त्यामुळे दुसऱ्या दिवशीच ऑपरेशन करायचे नक्की झाले...
डॉक्टरांनी सांगितले इंपोर्टेड लेन्स बाहेरून विकत घ्यावी लागते... या लेन्स साठी सात हजार रुपये खर्च येईल... तसेच ऑपरेशनच्यावेळी लागणारी काही इंजेक्शन आणि औषधे बाहेरून आणावी लागतील... ताबडतोब होकार दिला...
रात्री रुग्णालयात भरती झालो... दर दोन तासांनी डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉप्स देण्यात आले... हाताच्या पंजाला स्काल्प व्हेन लावण्यात आली... रात्री अलर्जीचे इंजेक्शन देण्यात आले... नायर रुग्णालयात सायंकाळी सात वाजता अतिशय सात्विक जेवण आणि रात्री आठ वाजता पेलाभर दूध मिळाले...
दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजल्यापासून दर अर्ध्या तासांनी डोळ्यात टाकण्यासाठी ड्रॉप देण्यात आले... चार नंबर वार्डची स्वच्छता वाखाणण्या सारखी होती... रात्री दहा वाजता वॉर्ड मध्ये झाडलोट आणि मॉपिंग करण्यात आले... त्यामुळे निवांत झोप झाली...
सकाळी पाच वाजता नावाची अनाउन्समेंट झाली... डॉक्टरांनी पुन्हा BP पल्स रेट आणि मशीन वर डायबिटीज चेक केले... थिएटरचे पांढरे ढगळ कपडे देण्यात आले... कमरेला बांधायला सॅनिटरी पॅड देण्यात आला... तोंडाला आणि डोक्याला मास्क, तसेच थिएटर मध्ये जाताना चप्पल काढण्यावर पायात घालायचे प्लास्टिक मोजे देण्यात आले...
संघवी इंटरप्रायसेस कंपनीचा माणूस लेन्स घेऊन थिएटर बाहेर उभा होता... लेन्सचा बॉक्स हातात घेऊन त्यावर असणारी लेन्सची किंमत पहिली... त्यावर 17109 रुपये किंमत होती... आणि त्याचे नायर रुग्णालयाच्या नावाने 6935 रुपयाचे बिल होते... पैसे देऊन लेन्स ताब्यात घेतली...
मारु रुग्णालयात 35000 रुपये, हिंदुजा मध्ये 75000 रुपये आणि नायर मध्ये फक्त 6935 रुपये किंमत... या लेन्सच्या किमतीचे गौडबंगाल पाहून डोळे पांढरे व्हायची वेळ आली...
ऑपरेशन थिएटर मध्ये सुद्धा ओळखीमुळे पहिला नंबर होता... डॉ श्रुतीने डाव्या डोळ्याला भूल दिली... पाच मिनिटात डोळा सुन्न झाला... तेव्हढ्या वेळात डॉक्टरांनी माझ्या काश्मिर ते कन्याकुमारी सायकलिंग बद्दल माहिती विचारली... डोके न हलवता डॉक्टरांबरोबर बोलण्याची परवानगी होती..
लेझर सर्जरी सुरू झाल्यावर कानात... डोळा कापण्याचा टरर् टरर् आवाज येत होता... सर्जरी सुरू असताना ऑपरेशन थिएटर मध्ये मधुर भक्ती संगीत चालू होते... माझ्या सायकलिंग बद्दल सुद्धा चर्चा सुरू होती... पेशंट एकदम रिलॅक्स असावा... त्याला कोणताही ताण येऊ नये म्हणूनच सर्व काळजी घेण्यात आली होती...
दहा मिनिटात ऑपरेशन पूर्ण झाले... मोतीबिंदू काढलेल्या डाव्या डोळ्याला पट्टी लावून रिकव्हरी रूम मध्ये पाच मिनिटे बसविण्यात आले... डॉ अनुजा यांना विचारले... काढलेला मोतीबिंदू पाहायला मिळेल काय... डॉक्टर हसल्या आणि म्हणाल्या आता ऑपरेशन लेझरद्वारे डोळ्याला सूक्ष्म छिद्र पडून केले जाते... त्यामुळे मोतीबिंदू बर्स्ट करून बारीक चुरा करून बाहेर काढला जातो... आणि त्या जागेवर नवी लेन्स बसविली जाते... ती लेन्स त्या सूक्ष्म छिद्रातून आत सरकवली जाते... मग डोळ्याच्या रेटिना मध्ये ती छत्री सारखी उघडते... त्यामुळे तिला डोळ्याच्या योग्य जागेवर बसण्यास थोडा वेळ लागतो... म्हणूनच ऑपरेशन नंतर दर दोन तासांनी डोळ्यात ड्रॉप टाकणे आणि डोळ्यात धूर, धुळ जाऊ नये किंवा ताण येऊ नये याची काळजी घ्यावी लागते...
डॉ अनुजाने दिलेली माहिती खूपच उपयुक्त होती...
संध्याकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला... तसेच सर्जरी लवकर बरी व्हावी यासाठी पाच प्रकारच्या गोळ्या आणि ड्रॉप देण्यात आले...
दर दोन दिवसांनी फॉलो अप साठी बोलावण्यात आले... या ऑपरेशन कार्यक्रमात बायको स्वप्नाची साथ सुरुवातीपासून शेवट पर्यंत होती...
मोतीबिंदू ऑपरेशन आणि बाहेरून आणावे लागणारे औषध गोळ्या यांचा एकूण खर्च आला 7840 रुपये आला होता...
मित्रांनो... आता सांगा मेडिक्लेमच्या नावाखाली खाजगी रुग्णालये किती लूटपाट करत आहेत... असलेला मेडिक्लेम पास झाला तरी पंचवीस टक्के रक्कम रुग्णाला भरावी लागते.... सरकारी रुग्णालयात प्रत्येक ठिकाणी रांग लावावी लागते... तुमच्याकडे वेळ आणि संयम असेल तर खरोखर सरकारी रुग्णालयातील अतिशय चांगली सेवा आपण मिळवू शकतो...
खाजगी रुग्णालयातील रुग्णाच्या पैशाची लुटपाट, ऑपरेशनचे दुष्टचक्र आणि मेडिक्लेमचे मायाजाल पहिले की मन विषण्ण होते....
ठरवले आहे... आता दरमहा पाच हजार रुपये मेडिकलसाठी SIP करायची आणि सरकारी रुग्णालयात... ट्रीटमेंट किंवा ऑपरेशन साठी आपलेच पैसे खर्च करायचे...
सतीश जाधव
सायकलिस्ट
7977690693
जय श्रीराम
ReplyDeleteThank you Sir for sharing your experience. Prayers for your speedy recovery.
ReplyDeleteRegards, Kunal Dhotre
ReplyDeleteYour story is very true.Most of the pvt drs. practice ìn same way.
ReplyDeleteखुप छान. कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी साठी गेल्यानंतर तेथे मेडिक्लेम आहे का, याबद्दल विचारणा केली जाते. यातच त्यांचा हेतू स्पष्ट होतो.
ReplyDeleteThank you for your informative Blog,Satish Sir.👍👍🙏
ReplyDeleteमेडिक्लेमच्या नावाखाली रुग्णांना लुटलं जाते.
ReplyDeleteसतिश मेडिकलेम चे पैसे घेताना हे लोक एवढी घाई करतात आपल्याला वाटतं की मोठी आपत्ती येईल आपण FD मोडून ८०/९० हजारांची रक्कम भरतो मग डोळ्याच ॲापरेशन सारखं निमित्त निघाल की डॅाकटर सांगतो तुम्ही कुठली लेन्स टाकणार त्यावर ॲापरेशन ची कॅासट आहे ३५ पासून १.५० लाख पर्यंत आहे तुम्ही सांगा मग त्या वेळी तुम्ही मेडीकलेम वालयाला फोन करता तो सांगतो तुम्हाला ५० हजार पर्यंत पैसे पास होतील वरचे तुम्ही भरा आता मेडिकलेम जर ४ लाख पर्यंत असेल तर मग हे ५० हजार का पा होतात हा प्रश्न तुम्हाला नाही का पडणार
ReplyDeleteतुम्ही ऑपरेशन सरकारी रुग्णालयात करण्याचा निर्णय फार चांगला घेतला, त्यामुळे सर्व मित्र-मैत्रिणींना या खाजगी हॉस्पिटल लुटीचा व पैशांचा अपव्यय कसा वाचवता येतो, याचं सविस्तर वर्णन तुम्ही कथन केला आहे.
ReplyDeleteसतिश प्रथम तुला मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा !
ReplyDelete'मोतिबिंदू शस्त्रक्रिया आणि मेडिक्लेमचे दुष्टचक्र' हा तुझा अनुभव अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आणि सविस्तर रित्या सादर केलास त्याबद्दल तुला खूप धन्यवाद. आपल्या सरकारी रुग्णालयातील इतक्या छान उपचाराचा तुला लाभ घेता आला आणि तोही वाजवीपेक्षा कमी दरात, तुला आपुलकीने सहकार्य करणाऱ्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे आभार ! मला खात्री वाटते की हा तुझा अनुभव वाचून आमच्या सारख्यांचे डोळे नक्कीच उघडतील.
धन्यवाद !🙏
मित्राचे अभिप्राय...
ReplyDeleteअगदी खरे आहे, फक्त संयम आणि थोडीबहुत ओळख असले पाहिजे, दूर राहणाऱ्यांना प्रवास झेपलं पाहिजे वयस्कर असलेल्यांना
खरं आहे,
ReplyDeleteवैद्यकीय क्षेत्रात भयंकर लूट सुरू असून शासन चुपचाप आहे.
आपला अनुभव कायम लक्षात ठेऊन शासकीय यंत्रणेवरचा विश्वास आपण वाढवला आहे.
Take care & Get well soon Bhau
ReplyDeleteमित्र प्रवीण देशपांडे याचा अभिप्राय...
ReplyDeleteखाजगी रुग्णालयात खूप लूट होते. तुमच्या इन्शुरन्स मधून जास्तीत जास्त रक्कम काढण्याचा प्रयत्न होतो.
म्हणून शक्यतो ते टाळले तर आपलाच फायदा आहे.
मुंबईतील सरकारी रुग्णालय खूप चांगली आणि डॉक्टर्स पण चांगले कौशल्य असलेले आहेत. फक्त तिथे एडमिनिस्ट्रेटीव्ह सिस्टीम मधील माणसे ओळखीचे असतील तर काम लवकर होते.
आणि तुम्हाला तो प्रश्नच नाही. त्यात तूमच्या मनमिळावू स्वभावामुळे सर्वांना आपलेसे करू शकता.
त्यामुळे खाजगी रुग्णालयात शक्यतो जावू नका.
तुमच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना.
लवकरच बरे व्हा व जोडीने सायकलींग करू या.
🚴🚴🚴🚴
मित्र श्रीपाद चे अभिप्राय...
ReplyDeleteEye Opner for Many , I 💯 prefer Govt hospitals because the facilities they have in Mumbai is good , You have touched a volatile Topic Sir , Great Satish Sir
मित्र बाळकृष्ण चे अभिप्राय...
ReplyDeleteमेडिक्लेम रुग्णांना लुटतात सोबतीला डाॅक्टरही सामिल असतात.
आपण लवकर बरे व्हा सतिश सर.
मंगेश सरांचे अभिप्राय...
ReplyDeleteखूपच उपयुक्त माहिती तपशीलवार दिली आहे. धन्यवाद
मित्र रवींद्र चे अभिप्राय...
ReplyDeleteडॅा. नयना पोतदार डोळ्यांच्या खूप हुशार डॉक्टर आहेत. आमच्या ॲाफीसमधे त्या येत असत. लवकर बरा हो💐💐💐
मित्र प्रभाकरचे अभिप्राय...
ReplyDeleteअगदी खरे आहे, फक्त संयम आणि थोडीबहुत ओळख असले पाहिजे, दूर राहणाऱ्यांना प्रवास झेपलं पाहिजे वयस्कर असलेल्यांना
eye opner to all Satish ji. Thank you for sharing.
ReplyDelete