मुंबईच्या वरिष्ठ तरुण सायकलवीरांनी केली काश्मीर ते कन्याकुमारी सायकल वारी... आणि दिला 'प्रदूषणमुक्त भारत' चा संदेश....
पाच सेवानिवृत्त मुंबईकरांनी 'प्रदूषणमुक्त भारत' चा संदेश देत काश्मीर ते कन्याकुमारी असा ४,१९८ किमीचा सायकल प्रवास सागरी महामार्गावरून पूर्ण केला.
प्रदूषण कमी करण्याच्या संदेशासोबत सुदृढ आरोग्य राखणे आणि वयस्कांमध्ये सक्रिय जीवनशैलीबद्दल जागरूकता पसरवणे देखील होता.
वरिष्ठ सायकलिस्ट सतीश जाधव (६७) यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र जैन (५६), मनोज चौगुले (६२), जयंती गाला (५५) आणि मंगल भानुशाली (६४)... हे टूरिंग सायकलिंगच्या आवडीमुळे देशाच्या उत्तर टोकापासून दक्षिण टोकापर्यंतच्या स्वप्नातील सायकलिंग सफर पूर्ण करण्यासाठी एकत्र आले होते.
संघप्रमुख सतीश जाधव यांनी जुलै २०२४ मध्ये जगातील सर्वात उंच मोटरेबल रस्ता उमलींगला पास सायकलने पादाक्रांत केला होता... तसेच त्यांच्या नावावर सायकलिंगचे दोन जागतिक विक्रम आहेत... संपूर्ण भारतात ७६,००० किमी सायकल सफर करणाऱ्या जाधव यांचा १०० वर्षापर्यंत सायकलिंग करण्याचा निर्धार आहे...
या वरिष्ठ तरुण सायकलवीरांनी १६ जानेवारी रोजी श्रीनगरच्या लाल चौकातून आपला प्रवास सुरू केला
पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी... प्रदूषण मुक्त भारताचा संदेश देत... जम्मू, पंजाब, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ मार्गे काश्मिर ते कन्याकुमारी हा ४१९८ किमीचा प्रवास ३९ दिवसात पूर्ण केला...
तसेच कोणत्याही सहाय्यक वाहनाशिवाय आणि सर्व सामान सायकलवर घेऊन दररोज १०० किमी पेक्षा जास्त अंतर कापले आणि शेवटचा २३० किमीचा टप्पा २२ तासांत पूर्ण केला.
डिझेल पेट्रोल वाहनांच्या अतोनात वापरामुळे प्रदूषणाची होणारी प्रचंड वाढ थांबविण्यासाठी... आम्हाला लोकांमध्ये जागरूकता पसरवायची होती...
सैनिक किंवा पोलिस प्रसंगी प्राणाची आहुती देऊन देशसेवा करतात... तसेच निवृत्ती नंतर देशसेवा करण्यासाठीच सायकलिंगने भारत भ्रमंती हा मार्ग आम्ही निवडला...
सायकलिंगमुळे केवळ प्रदूषण कमी होईलच असे नाही तर व्यक्तीच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होईल. त्यासाठीच प्रत्येकाने सायकलिंगकडे वळणे महत्त्वाचे आहे. तसेच सर्वांना सक्रिय जीवनशैली स्वीकारण्यास प्रेरित करणे हा आमचा उद्देश होता," असे जाधव म्हणाले.
संपूर्ण मार्गावर विविध शाळा आणि महाविद्यालये आणि पोलिस स्टेशन मध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पर्यावरण संबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी या चमूने व्याख्याने दिली.
एका शहरातून दुसऱ्या शहरात पॅडलिंग करत असताना, विविध समुदाय आणि सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या सायकल वारीला हिरवा झेंडा दाखवला.
वाटेत अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि संरक्षण दलातील माजी कर्मचाऱ्यांनी आमचे स्वागत केले आणि आम्हाला अनेक प्रकारे मदत केली. विशेषतः काश्मीरमध्ये, आम्हाला एस्कॉर्ट वाहने देण्यात आली होती... तसेच आमच्यासाठी रस्ता मोकळा केला होता त्यामुळे आम्ही या प्रदेशातून सुरक्षितपणे प्रवास केला... जितेंद्र जैन म्हणाले
आम्ही काश्मिरच्या बर्फवृष्टीतून तसेच केरळच्या कडक उन्हातून सायकलिंग केली, एकंदरीत सायकल वारीचा हा अनुभव अविस्मरणीय होता... असे जाधव म्हणाले.
या सायकल वारीसाठी ठाण्याच्या आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन, घोडबंदर सायकल क्लब आणि समर्पयामि सायकल्स तसेच मुंबईच्या पेडल वॉरियर्स या सायकल संघटनांचे विशेष सहकार्य लाभले.
खूपच छान 👌👍🚴🚴🚴🚴🚴
ReplyDeleteदेश बदल रहा है, बुजुर्ग युवा बन रहे है
# धर हॅंडल 🚲 मार पायडल 🚴😃
प्रेरणादायी 🙏
ReplyDeleteWow!! Very inspiring!!!!
ReplyDelete