दिपोत्सवातील आनंदक्षण...
दि. २१.१०.२०२५
दिपावलीच्या या मंगल दिवशी पुन्हा एकदा नायर हॉस्पिटल मधील मित्र सुनील पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट दिली... ८५ वर्षाचा तरुण सुनील म्हणजे मैत्रीचा अतूट धागा होता...
मनाने तरुण असणाऱ्या या वयस्क मित्राची मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा सोहळा होता... ज्यांना माणसं मनापासून प्यारी असतात, त्यांच्यासोबत गप्पा म्हणजे आनंदाचा उत्सवच...
मृदुभाषी रोहिणी वाहिनींच्या हातचा फराळ म्हणजे खुमासदार मेजवानी होती... सप्तरंगी करंजी, खमंग चकली, मधुर बेसन लाडू आणि खुसखुशीत पोहे चिवडा... गप्पांच्या ओघात सगळं सार हसत खेळत फस्त झालं...
मरणाचे स्मरण असावे... या उक्ती वर दिलखुलास चर्चा झाली...
या चर्चेचं फलीत होतं... दररोज सकाळी उठल्यावर परमेश्वराचे आभार मानावेत... आजचा दिवस पाहण्याचे भाग्य मला दिले म्हणून... यामुळे कोणतेही दूषित कर्म आपल्या हातून होणारच नाही...
सुसंगती सदा घडो; सुजन वाक्य कानी पडो...
कलंक मतीचा झडो; विषय सर्वथा नावडो...
या मोरोपंतांच्या श्लोकाची आठवण झाली...
जीवनात आलेली सुनीलसारखी माणसे आपले पथदर्शक असतात... याची जाणीव झाली...
सुनील म्हणजे खरंच माणसं आवडणारा माणूस... त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि वाहिनींच्या स्वागतातली आपुलकी या सगळ्याने आजचा मोठा दिवस आणि दिपावली अधिक उजळून गेली...
त्यांच्या मनातून येणारे प्रेमाचे मातृतुल्य भाव... बरंच काही सांगत होते... हा आनंदाचा हा क्षण असाच राहू दे...
पाटील कुटुंबियांना पुन्हा भेटायच्या आश्वासनासह त्यांचा निरोप घेतला...
या भेटीने दिपावलीच्या सणाला आनंदच कोंदण लाभलं...
सतीश जाधव
7977690693
No comments:
Post a Comment