Wednesday, November 24, 2021

लाडकी मुंबई दि. २४ नोव्हेंबर २०२१

लाडकी मुंबई 
दि. २४ नोव्हेंबर २०२१

सकाळीच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स सायकल राईड करण्याचे ठरविले...  पहाटे मेडिटेशन केल्यावर राईड सुरू झाली... वरळी चौपाटी मार्गे सिद्धिविनायक, शिवाजी पार्क करून माहीम मार्गे वांद्रे रेक्लमेशनकडे वळलो...

 हल्ली  "आय लव्ह ...." अशी विभागाची नावे असलेल्या पाट्या जागोजागी दिसतात...  वांद्रे रेक्लमेशन वरील बगिच्यात "लव्ह मुंबई असा बोर्ड दिसला... थोडा वेळ थबकलो... उगवत्या सूर्याच्या लोकेशनवर त्या बोर्डाचे फोटो काढले... पाच मिनिटे तेथे थांबलो.... बरीच मंडळी बगिच्यात फेरफटका मारत होती... काही जॉगिंग करत होती... कोणी समुद्राकडे तोंड करून बसले होते...

खरंच माझे मुंबई वर प्रेम आहे काय ?   विचारांची शृंखला सुरू झाली... ढगाळलेले आकाश... घुरकटलेले वारे...  तेलाच्या तवंगासह समुद्राचे काळे पडलेले पाणी... सुर्यनारायणाचा निस्तेज पडलेला प्रकाश... यात पर्यावरणाचा समतोल कुठेतरी ढळला आहे... असे दिसत होते... याला मीच जबाबदार होतो... 

नुकतीच मुंबई ते दिली सायकल वारी करून आलो होतो... दिल्लीचे धुराने भरलेले... पर्यावरण दूषित  झालेले  वातावरण पाहिल्यावर... माझ्या लाडक्या मुंबईची आठवण झाली होती... दिल्लीच्या इंडिया गेट जवळ पोहोचल्यावर... पन्नास मीटर वरून सुद्धा धुरात काळवंडलेला इंडिया गेट धूसर दिसत होता... दिल्लीतील प्रत्येक चौकात दर दहा मिनिटांनी पाण्याचे फवारे मारण्यात येत होते.... वातावरणात पसरलेला घुसमट करणारा घुर काजळी रूपाने जमिनीवर बसावा म्हणून... 

आज पाहिलेल्या मुंबईत तेच दृश्य दिसले...  मग खरच मुंबईवर माझे प्रेम आहे काय... याला जबाबदार कोण... 

मिनेश कोळी, राजेश कांबळे, लक्ष्मण नवले, विकास चव्हाण, नितीन कुमार, निलेश फाळके, दिपक निचित हे सायकलिस्ट मित्र पर्यावरण प्रेमी आहेत... झाडे लावणे तसेच मोटारसायकल, स्कुटर, कार ऐवजी सायकल सफर करण्यासाठी समस्तजनांना सतत उद्युक्त करीत आहेत.   दिपक, नितीन तर मुलांमध्ये सुद्धा झाडे लावणे तसेच सायकल चळवळ चालवीत आहेत...

 पर्यावरणाचे भान जर आपण राखले नाही तर... पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही... आज जसे पाण्याच्या बाटल्या विकत घेतो.... तसा प्राणवायू विकत घ्यावा लागेल...  

मुंबईवर प्रेम करणारा मुंबईकर ही वेळ मुंबईवर येऊ देणार नाही... 

मुंबईला प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी... आणि पुढील पिढीच्या स्वास्थ्यासाठी चला सहभागी होऊ ... प्रत्यक्ष कार्य करू... निरोगी मुंबईसाठी...

आजची वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स  २४ किमी राईड माझ्या लाडक्या मुंबईला अर्पण...


सतीश जाधव
मुक्त पाखरे...

5 comments:

  1. चांगला उपक्रम 🌹🌹

    ReplyDelete
  2. मित्र मिनेश कोळीचे अभिप्राय...

    फार छान शब्द तुम्ही आजची सद्यपरिस्थिती लोकांसमोर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आपण सर्व पर्यावरणप्रेमी नक्कीच या गोष्टीचा कुठेतरी विचार करून त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करत असतोच पण सध्या गरज आहे ती सामाजिक चळवळीची किंवा समाजाने याच्यामध्ये भागीदारी दाखवण्याची कदाचित ते आपल्याला शक्य झालं तर त्याच्यापेक्षा अजून छान असं काहीच नसेल🙏 खारीचा वाटा समजून आपण त्यामध्ये काहीतरी आपलं सहकार्य किंवा सहभाग दाखवू शकलो तर फारच उत्तम.

    ReplyDelete
  3. मित्र तुषारचे अभिप्राय

    सर खूप सुंदर एक ओळ खूप भावली आज जसे पाण्याच्या बॉटल विकत घेतो तसा प्राणवायू विकत घ्यावा लागेल

    ReplyDelete