Friday, June 16, 2023

जागतिक दर्जाची सायकल रेसिंग स्पर्धा... काश्मीर ते कन्याकुमारी

जागतिक दर्जाची सायकल रेसिंग स्पर्धा...
 काश्मीर ते कन्याकुमारी

काश्मीर ते कन्याकुमारी हे 3651  किमी अंतर सहा दिवस तेवीस तास आणि 39 मिनिटात पार करून जागतिक विक्रम  प्रस्थापित करणारे डॉ अमित समर्थ यांची आज भेट झाली... 

मोनिलच्या वांद्रे येथील बाईकइंडिया या सायकल शॉपी मध्ये असलेल्या टॉक शो मध्ये...

दररोज साधारण 550 किमी अंतर पार करत... दिवस-रात्रभरात फक्त एक तास झोप घेत ही सायकल रेस विक्रमी वेळात पूर्ण करून डॉ अमित यांनी  जागतिक सायकल क्षेत्रात भारताला मानाचे स्थान मिळवून दिले आहे... 

 "रेस  अँक्रॉस अमेरिका" या सायकल रेसिंग स्पर्धेत भाग घेण्यासाठी एका सायकलिस्टला पन्नास लाख रुपये खर्च येतो... तर ह्या भारतीय स्पर्धेसाठी एका स्पर्धकाला पाच लाख रुपये खर्च आला... 

या स्पर्धेत एकूण बारा स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यातील एक स्पर्धक साठ वयाचा होता... एक स्पर्धक सिंगल गियर सायकलिस्ट होता.. तर तीन स्पर्धक अपंग होते...  सर्वांनी नियोजित वेळेआधी यशस्वीरीत्या ही स्पर्धा पूर्ण केली...

या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन अतिशय देखणे आणि नियोजनबद्ध होते... तसेच अमेरिकन स्पर्धेच्या तोडीसतोड होते... भारतीयांनी भारतीयांसाठी  भारताच्या भूमिवर आयोजित केलेली  स्पर्धा होती... ही प्रचंड अभिमानाची बाब आहे... 

BRM / SR / LRM / RAAM इत्यादी परदेशातील सायकल स्पर्धांना पर्याय म्हणून ही स्पर्धा अतिशय उपयुक्त असून भारतीय तरुणांना आणि रेसिंग सायकलिस्टना नवनवीन जागतिक विक्रम पादाक्रांत करण्याची एक सुसंधी उपलब्ध झाली आहे भारत भूमिवर... 

डॉ. अमितच्या मार्गदर्शनाखाली पुढील स्पर्धा नोव्हेंबर 2024 मध्ये असणार आहे... साठीच्या पुढील तसेच MTB रायडर्स सुद्धा या स्पर्धेत भाग घेऊ शकतात...

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी डॉ अमित समर्थ (मोबाईल नंबर 8956433351) यांचे मार्गदर्शन सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे...

तर सुरू करा तयारी... आणि मेक इन इंडियाच्या प्रयत्नांना हातभार लावा...

 मंगल हो

सतीश जाधव 

8 comments:

  1. दिलीप वरकडApril 19, 2023 at 12:51 PM

    खुप छान लिहीले आहे सतीश सर

    ReplyDelete
  2. Very descriptive and informative article Satish sir

    ReplyDelete
  3. सर या स्पर्धेत एक स्पर्धक सिंगल स्पीड आणि तीन स्पर्धक अपंग होते

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद... ब्लॉग मध्ये सुधारणा केली आहे

      Delete
  4. छान उपक्रम कवतुकांस्पद 💐👌

    ReplyDelete
  5. अरविंद निकुंभApril 19, 2023 at 6:58 PM

    खूप अभिमानास्पद, कौतुकास्पद

    ReplyDelete
  6. खरं च खुप खुप छान आणि संपूर्ण सटिक वर्णन केले आहे सतीश सर.

    ReplyDelete
  7. Excellent..! What an achievement

    ReplyDelete