Tuesday, September 19, 2023

जपणूक छंदाची

जपणूक छंदाची

आजच्या काळात प्रत्येकाचं जीवन इतकं धकाधकीचं आणि धावपळीच झालंय की कधी कधी श्वास  घ्यायला ही उसंत नाही असे वाटते... परंतु आपल्या जीवनात असलेले छंद कसोशीने जपले... तसेच छंद जोपासण्यासाठी नवनवीन ठिकाणी भ्रमंती केली की नव्या तजेल्याने... ऊर्जेने आपण नेहमीच्या जीवनात परतू शकतो..


असच काहीसं जाणवलं ज्योतिबा दख्खन हील मॅरेथॉनमध्ये.... नियमित सायकलिंग करणे हा माझा छंद... परंतु नवनीत आणि निलेश या सायकलिस्ट मित्रांच्या मॅरेथॉन प्रेमाने मला धावण्यासाठी उद्युक्त केले... 

 आज पहाटेलाच कारने ज्योतिबा डोंगराकडे निघालो... घाट सुरु झाला आणि धुक्याच्या लाटा अंगावर येऊ लागल्या... गाडीच्या लाईटच्या प्रकाशात पुढील पाच फुटावराचे पण दिसत नव्हते...सकाळचं झुंजुमुंजू झालं होत... पण कुंद वातावरणामुळे पहाटेच्या उजेडाचे कवडसे सुद्धा घुरकट झाले होते...

उजाडलं...  अन् ज्योतिबाच्या पायथ्याचा प्रदेश झाडाझुडपातूनी शेतांनी भरलेला असल्यामुळे मोर शिंपी, बुलबुल, खंड्या यांचा किलबिलाट कानावर पडत  होता... सुखद गारवा आणि पावसाच्या शिडकाव्यासह जागोजागी वाहणारे ओहळ... हिच तर निसर्गाची नयनरम्य देणगी होती...

PWD मैदानात पोहोचलो. तेथे मॅरेथॉनची जोरदार तयारी सुरू होती. थोड्याच वेळात वॉर्मअप झुंबा सुरू झाला...  झुंबावर डान्स करणे... म्हणजे संपूर्ण बॉडी रिलॅक्स करणे होते...

प्रथम २१ आणि १५ किमी  मॅरेथॉन सुरू झाली... त्याच्या पाठोपाठ पंधरा मिनिटांनी ५ आणि १०  किमी मॅरेथॉन सुरू झाली... दाट धुक्यात धावणे... एक पर्वणी होती... त्या कुंद वातावरणात ज्योतिबाचा डोंगर अडीच किमी खाली उतरत निघालो... सोबत नवनीत आणि निलेश होता... 

सुरुवातीलाच नवनीतने आघाडी घेतली... पाठोपाठ निलेश सुद्धा पुढे गेला... खूप वर्षांनी उतारावर धावत असल्यामुळे गुढग्यावर  प्रेशर येत होते म्हणून पुढच्या चौड्यावर भार देऊन धावत होतो... थोड्याच वेळात रिदम मिळाला... आणि पळण्याचा वेग वाढला... हळूच निलेशला ओव्हरटेक केलं... अडीच किमी वळणावर निलेशने मला गाठलं... तेथे केळ आणि पाणी घेतलं... 

आता चढाकडे धावणे सुरू झाले... बऱ्यापैकी उजाडले होते... त्यामुळे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या माणसांची वर्दळ तसेच  गाड्यांची रहदारी वाढली होती... चढावर धावण्याचा वेग बऱ्यापैकी कमी झाला होता... परंतु एका रिदमने  धावल्यामुळे दम लागत नव्हता...  बरोबर सव्वा तासात पाच किमी धावणे पूर्ण झाले होते...


पाठोपाठ निलेश ही आला... नवनीतने तर एका तासाच्या आतच मॅरेथॉन पूर्ण केली होती...

मेडल मिळाले... सोबत उपिट सह कांदापोहे आणि चहाची न्याहरी मिळाली... फोटो सेशन पाठोपाठ रिलॅक्ससाठी झुम्बा सुरू झाला...  पंधरा वीस मिनिटे अक्षरश: नाचलो...  झुंबा प्रकार एकदम भावला...  

या मॅरेथॉनचे गोड फलित म्हणजे... सातारा, इंदापूर, सांगलीच्या धावपटूंच्या ओळखी होणे... विशेष म्हणजे त्यातील बरेच धावपटू सायकलिस्ट पण होते... सायकल सोबत क्रॉस ट्रेनिंग म्हणून सुरू केलेले मॅरेथॉन धावणे अगणित आनंददायी होते... एक नवा अध्याय सुरू झाला आहे... मित्रांच्या संगतीने...

मंगल हो... !!!


7 comments:

  1. Navneet Bhiva WorlikarSeptember 19, 2023 at 5:03 PM

    खुप छान लेख....

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी lively experience. निसर्गाच अदभुत लेण तुम्ही अनुभवलत. अस भाग्य फार थोड्या लोकांना लाभते. आणि ते तुंम्हाला लाभल हे तुमच प्रारब्ध आहे.

      Delete
  2. Very very nice 👍👍👍

    ReplyDelete
  3. Superb , now cycling and running together you can do it

    ReplyDelete
  4. परम मित्र नवनीत याचे अभिप्राय

    माणसाचा प्रत्येक छंद हा त्याला नेहमीच ऊर्जा देत असतो. म्हणूनच प्रत्येक माणसाने छंदाची जपणुक केली पाहिजे. माणसाचा प्रत्येक नवा छंद हा त्याच्यातील प्रेरनेणे जन्माला येतो आणि त्याला जगण्याची नवीन उमेद प्राप्त करून देतो.

    तुम्ही असेच नवीन नवीन छंद जोपासुन जीवन सत्कारणी लावा! धन्य तुमची ऊर्जा, धन्य तुमची प्रेरणा आणि धन्य ते तुम्ही!

    ReplyDelete
  5. परममित्र निलेश याचे अभिप्राय

    Awesome👍👏😊 Satish Sir.

    Khupcah chaan.

    Nicely explain.

    ReplyDelete
  6. शुभ सकाळ. खूप दिवसांनी एक छान लेख वाचायला मिळाला.......

    ReplyDelete