Wednesday, December 13, 2023

डबल डेकर हँगिंग ब्रीज आणि रेनबो धबधबा

डबल डेकर हँगिंग ब्रीज आणि रेनबो धबधबा 

आजची सोहरा (चेरापुंजी) ते नॉनग्रियट ही १८ किमीची डाऊन हील आणि नंतर अप हील राईड अतिशय टफ होती... 


डाऊन हील राईड केल्यावर खोल दरीत उतरत साडेतीन  हजार पायऱ्या  उतरून लिव्हिंग रूट डबल डेकर ब्रीजकडे ट्रेक केला... झाडांच्या पारंब्यापासून तयार झालेला ब्रीज निसर्गाचा चमत्कारच होता...

त्यानंतर आणखी अडीच किमी खाली चढउताराच्या पायऱ्या पार करून गेल्यावर... रेनबो वॉटर फॉल पाहिला... नव्हे अनुभवला...

झाडांच्या पारंब्यापासून तयार झालेला पूल... आणि धबधब्याच्या पाण्यात दिसणारे इंद्रधनुष्य हे अनुभवणे एक पर्वणीच होती...

या दोन्ही निसर्गसुंदर गोष्टीं बरोबरच..  दरीत उतरण्याचे ट्रेकिंग करताना...पक्षांचा किलबिलाट... किड्यांचा किर् किर् आवाज... मधमाश्यांचा  गुंजारव...

                    मधमाश्यांच घरट 

पाण्याचा खळखळाट... झाडांचे वेगवेगळे प्रकार ... त्यांची सळसळ...   ऐकून... पाहून... मन एका निर्वात पोकळीत गेले... शांत झाले...

वाटेत भेटणारे कामकरी... टुरिस्टनां चालताना कोठेही अडचण होऊ नये म्हणून... खाली उतरणाऱ्या  रस्त्याची डागडुजी करणारे... आणि वाटेत प्लॅस्टिक  रॅपर्स, बाटल्या उचलणारे गावकरी... रस्ता स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेत होते...

दोन्ही स्पॉट पाहून परतीचा अपहील ट्रेक पूर्ण करून दुपारी अडीच वाजता टॉपला पोहोचलो...  आता खरी कसोटी होती... अठरा किमीची अपहील सायकल राईड करणे... 

सायंकाळी पाच पूर्वी हॉटेल वर पोहोचायचा प्रयत्न होता... आठ किमीचा अवघड घाट चढायलाच अडीच तास लागले... त्या वेळी समोरच्या डोंगरा आड अस्ताला जाणाऱ्या सूर्य देवाच्या  दर्शनाने मन हरखून गेले...

पुढचा सुद्धा सोहारा (चेरापुंजी) पर्यंतचा चढाचाच होता... वाटेतच अंधार पडला आणि थंडी वाढली... एका छोट्या धाब्यावर  थांबून चण्याची भाजी, दोन उकडलेली अंडी खाल्ली... 

लाईट चालू करून शेवटची सात किमी राईड सुरू केली... या संपूर्ण ट्रेल मध्ये शरीराचा आणि मनाचा कस लागला... 

सकाळी पावणे सहा वाजता सुरू केलेली राईड रात्री सहा वाजता पूर्ण झाली होती... हॉटेलवर आल्यावर रूम हिटरने पाय शेकून काढले... 

या खोल दरीच्या सफरीत नेट उपलब्ध नसल्यामुळे कोणालाही फोन करता आला नव्हता... त्यामुळे रात्री सर्वांशी निवांत गप्पा मारल्या... 

आजचे मुख्य आकर्षण  होते...  डबल डेकर रूट हँगिंग ब्रीज आणि रेनबो धबधबा पाहणे...

 निसर्गाच्या अंतरंगात शिरायचे असेल तर... खडतर परिश्रम करून निसर्गा जवळ जाणे आवश्यक ठरते...

आपली मंदिरे सुद्धा डोंगर दऱ्यात वसली आहेत त्याचं कारण पण हेच असावे का...

9 comments:

  1. आपले वर्णन व शब्दांकन अतिशय सुंदर असल्यामुळे असे वाटते आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत धन्यवाद

    ReplyDelete
  2. It's please to meet you

    ReplyDelete
  3. अप्रतीम ✌️

    ReplyDelete
  4. निलेश गुळगुळेDecember 13, 2023 at 8:00 AM

    अतिशय सुंदर वर्णन, सगळे फोटो अप्रतिम.

    ReplyDelete
  5. Very nice place where it is please include us for this kind of ride 🙏 I am glad to ride with you

    ReplyDelete
  6. 👍👌अप्रतिम, सुंदर वर्णन आणि फोटोसुद्धा मस्त

    ReplyDelete
  7. आशा पाटील यांचे अभिप्राय...
    हे वाचताना सर्व फोटो त्यातील सुंदर निसर्ग याने मन हरखून गेले पण ह्याचे दर्शन आमच्या पर्यंत पोहचवणारे तुम्ही सायकल सखीबरोबर हा प्रवास करताय याची जाणीव झाली आणि मनोमन तुम्हाला सलाम ठोकला.

    ReplyDelete
  8. सर खूप छान खूपच छान पोस्ट आहे
    आणि त्याहून छान तुमचा अनुभव आहे तुमचं निसर्गाशी खूप जवळच नात आहे आणि ते तुम्ही खूप छान प्रकारे जपत आहात तुमच्या ट्रॅकिंग सायकलिंग च्या गोष्टी वाचल्या की स्वतः अनुभवल्या सारखं वाटतं कधीतरी तुमच्या सोबत सायकलिंग करायला मिळाल पाहिजे तुमच्या सारखं नाही जमणार पण तुमच्या सोबत जमवता आल पाहिजे

    ReplyDelete