Monday, November 16, 2020

एक सुखद अनुभव...

एक सुखद अनुभव...

१५ नोव्हेंबर २०२०

सकाळी सहा वाजता सायकलिंगसाठी घराबाहेर पडलो. 
स्वप्नाने विचारले, 'आज कुठे दौरा'.
म्हणालो, 'माहीत नाही'.

 काहीच ठरवलं नव्हतं, कुठे जायचं, कोणाला भेटायचं. दिवाळीचा दिवस मोठा, नाही आनंदाला तोटा. हा आनंद परमप्रिय व्यक्ती बरोबर व्यतीत करावा हीच मनीची इच्छा होती. 

एक विचार चमकला आणि निघालो देवनारकडे. माझे परममित्र, पितृतुल्य, ट्रेकिंगचे गुरू श्री मधुकर गीते (वय वर्ष ८०) यांच्या घरी पोहोचलो. दाराची बेल वाजवली. डोळे चोळतच गीतेंनी दरवाजा उघडला. आश्चर्यचकित झाले गीते. माझा अवतार पाहून, सायकलिंग करत आलोय, हे त्यांनी ताडले. 

मला बसवून दहा मिनिटात फ्रेश होऊन आले. आता सुरू झाली गप्पांची मैफिल. २२ नोव्हेंबर पासून मुंबई - मंगलोर सायकल वारी करतोय, म्हणूनच आजच्या दिपावलीच्या दिवशी तुमचे आशिर्वाद घेण्यासाठी आलोय !!!  खूप आनंदित झाले गीते.

*प्रदूषण मुक्त भारत* ही संकल्पना घेऊन मुंबई - मंगलोर सायकलिंग करतोय, हे ऐकून गीते एकदम खुश झाले, भरभरून आशीर्वाद दिले. 


मला आवडणारे एक आदर्श व्यक्तिमत्व. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन खच्चून भरला आहे त्याच्याकडे. 

या वयात सुद्धा स्वतःची कामे स्वतः करणारे, ऋषीतुल्य जीवन जगणारे गीते माझे आदर्श आहेत. सकाळी अचानकपणे त्यांना भेटण्याचा विचार आला आणि  तडीस नेला याचा मला मनोमन आनंद झाला होता.

 व्हाट्स अँप, इन्स्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा देण्यापेक्षा, वडीलधाऱ्यांना प्रत्यक्ष भेटणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे किती आनंददायी असते याची प्रचिती आणि प्रतीती आजच्या दीपावलीच्या मोठ्या दिवशी आली.


मंगल हो सायकलिंग !!! 

सतीश जाधव
मुक्त पाखरे ...

14 comments:

  1. छान !!
    स्वप्निल नागरे

    ReplyDelete
  2. प्रदुषण मुक्त भारत ही संकल्पना फार आवडली . अशीच मुक्त पांखरा सारखी झेप होत रहा

    ReplyDelete
  3. फारच छान व सुंदर वर्णन!! मला फार आवडले असेच लिखाण चालू ठेवा.

    ReplyDelete
  4. ग्रेट भेट सर

    ReplyDelete
  5. यशोधन टूर्स चे संचालक श्री प्रकाशभाऊ मोलक यांचे अभिप्राय..

    नर्मदे हर बाबाजी......

    सर्व ब्लॉग वाचला........

    सायकलिंग हा आपला छंद आहे.....
    आपण सायकलवेडे आहात......

    हे एव्हाना आमच्याही लक्षात आले आहे........

    परंतु या निमित्ताने त्यात आपण सामाजिक भान कायम ठेवलं आहे....

    मग त्यात जुन्या मित्र परिवाराच्या भेटी असतील किंवा आताची ही मंगलोर वारी असेल.....

    आम्हाला तुमचा अभिमान वाटतो...

    परिक्रमा आपण एकत्र केली आहे...

    कन्याकुमारी भीमाशंकर तसेच कोकणातील आपल्या सायकल ब्लॉग चे मी वाचन केले आहे.......

    आपल्या हरहुन्नरी स्वभावास सादर वंदन.......

    आपल्या हसऱ्या चेहऱ्याचं नेहमीच कौतुक वाटतं.......

    मय्या कृपेने आपले सर्व सायकल मनोरथ पूर्ण होवोत अशा सदिच्छा.....

    🌷🙏

    ReplyDelete
  6. मित्र सखाराम कुडतरकरचे अभिप्राय

    तुझा १५ नोव्हेंबर चा लेख वाचला.एका जेष्ठ गुरुच्या भेटी मुळे तू किती सुखावला होतास हे जाणवले.अशा वडीलधाऱ्यांचे आशिर्वाद तुझ्या उमेदीला बळ देतील.२२ तारखेला सुरू होणाऱ्या तुझ्या प्रवासाला मनोमन शुभेच्छा.👍🏻🌷

    ReplyDelete
  7. *प्रदूषण मुक्त भारत* ही संकल्पना घेऊन मुंबई - मंगलोर सायकलिंग करणाऱ्या व आमच्यासाठी सायकलींग मघ्ये स्फुर्तीदाता बनलेल्या परममित्राला लाख लाख शुभेच्छा !

    ReplyDelete
  8. *प्रदूषण मुक्त भारत* ही संकल्पना घेऊन मुंबई - मंगलोर सायकलिंग करणाऱ्या व आमच्यासाठी सायकलींग मघ्ये स्फुर्तीदाता बनलेल्या परममित्राला लाख लाख शुभेच्छा !
    संजय कोळवणकर.

    ReplyDelete
  9. प्रेम करावे सतीशनेच ,निर्व्याज 🌹🌹🌹🙏

    ReplyDelete
  10. नमस्कार,

    "खरा तो एकची धर्म
    जगाला प्रेम अर्पावे।।"

    खरा तू मनमौजी,
    खरा तू जोशीला,
    खरा तू हर्षिला,
    खरा तू उत्साही,
    खरा तू भ्रमंती बहाद्दर.

    खरच ते तुझ्याकडून
    काय काय ध्यावे?

    शलाम शाबजी ।।

    Keep it up sir.

    लगें रहों ।।
    हम आपके साथ है।।

    तुमचे परममित्र, पितृतुल्य, ट्रेकिंगचे गुरू यांना आमचाही नमस्कार

    ...... लक्ष्मण

    ReplyDelete
  11. नमस्कार,

    "खरा तो एकची धर्म
    जगाला प्रेम अर्पावे।।"

    खरा तू मनमौजी,
    खरा तू जोशीला,
    खरा तू हर्षिला,
    खरा तू उत्साही,
    खरा तू भ्रमंती बहाद्दर.

    खरच ते तुझ्याकडून
    काय काय ध्यावे?

    शलाम शाबजी ।।

    Keep it up sir.

    लगें रहों ।।
    हम आपके साथ है।।

    तुमचे परममित्र, पितृतुल्य, ट्रेकिंगचे गुरू यांना आमचाही नमस्कार

    ...... लक्ष्मण

    ReplyDelete
  12. मस्तच आहे. पप्पांना नमस्कार सुंदर लिखाण केले आहे. झकास.

    ReplyDelete