Monday, May 9, 2022

आजचा तरुण... दि. ०९.०५.२०२२

आजचा तरुण... दि. ०९.०५.२०२२

आज सकाळी एका तरुणांचा पुतळा पाहिला...

 अतिशय अप टू डेट कपडे... हातात खचाखच भरलेली बॅग... मनगटावर विदेशी घड्याळ... कमरेला भारी पट्टा आणि पायात उंची बूट... 
 
परंतु चेहरा चिंताक्रांत, गालफाड बसलेली आणि दिवस रात्र कामाच्या कचाट्यात सापडल्यामुळे जेवणाची शुद्ध नाही... व्यसनाधीनते मध्ये अडकलेला... त्यामुळे पोटाचा आणि छातीच्या काही भागाचा खुळखुळा झालेला...

प्रचंड पैसा कमावण्याच्या नादात... शरीराची झालेली हेळसांड आणि ताणतणावामुळे मनाची मरगळ चेहऱ्यावर प्रकट झालेली... हातातली बॅग पैशाने भरलेली असावी...

या जीवनप्रणालीमुळे सुबत्ता मिळेल पण सौख्य मिळेल काय... पैसा मिळेल पण आपली माणसे मिळतील काय...  खुशमस्करे मिळतील पण जिवाभावाचे मित्र मिळतील काय... भौतिक सुख मिळेल पण मनाची शांतता मिळेल काय... उत्तमोत्तम भोजन मिळेल पण शांत झोप मिळेल काय... 

प्रश्नाचं मोहोळ डोक्यात उठलं... 

याच उत्तर प्रत्येकाने शोधायला हवं...

सतीश जाधव
मुक्त पाखरे...

4 comments:

  1. 😴😴😴????

    ReplyDelete
  2. खरी गोष्ट आहे ...आजच्या धावपळीच्या काळात जीवन जगण्याची कला हरपली आहे.
    - स्वप्निल नागरे

    ReplyDelete
  3. मुळात साध सोप आयुष्य न संपणार्या हव्यासापोटी माणसांनाच मातीमोल केलय. ज्यांना हे जीवन कळाल त्या महामानवांनी या जीवनाच सार सांगून ठेवलय. पण ते समजून घ्यायला कुणापाशी वेळ नाही. भस्मासुरांसारख माणूस स्वःताच स्वःताला संपवायला निघालाय!!! चमक सारी वरवरची, माणूस आतून पोखरलेला…

    ReplyDelete
  4. खरोखर आहे.नुसता पैश्याच्या मागे लागून शरीराची हेळसांड करण्यात काय अर्थ आहे.

    ReplyDelete