Sunday, May 15, 2022

संसारी सायकल... ११ मे २०२२

संसारी सायकल...  ११ मे २०२२

आज संसारी सायकल दृष्टीस पडली... सायकल वरून व्यवसाय करणारे खूप पाहिले... पण सायकलवर मनापासून प्रेम करून व्यवसायासोबत तिला सजविणारे विराळाच... सायकलवर छोटेखानी घर बनविताना... चेनच्या मडगार्डला रिफ्लेक्टर लावणारा अवलियाच म्हणावा लागेल...

गेली दहा वर्षे हनिफ सायकल वरून व्यवसाय करतोय... सर्व प्रकारची किटक नाशक स्वतः बनवून विक्रीचा व्यवसाय करतोय... जेव्हा तो सायकल चालवतो तेव्हा समोरून फक्त त्याचे डोके दिसते...  आतापर्यंत त्याने जवळपास वीस हजार किमी प्रवास केला आहे... व्यवसाय आणि सायकलने भारत भ्रमंती याची मस्त सांगड घातली आहे हनिफने...

 संसारी सायकलला त्याने कलात्मक पद्धतीने सजविले आहे. प्रत्येक वस्तू नीटनेटक्या पद्धतीने मांडली  आहे. घराला त्रास देणारे ढेकुण, झुरळ मुंगी मारण्याचे औषध विकणाऱ्या हनिफने सायकल वरच आपले घर बनविले आहे. 
 
ठेंगणा, ठुसका आणि हसरा हनिफ आणि त्याची संसारी सायकल... प्रथम दर्शनीच मनात भरली...


सतीश जाधव
मुक्त पाखरे...
 

3 comments:

  1. सायकल हे खरोखर आपले घरातील सदस्या सारखे आहे.कधीही जाताना कुरकुर नाही.

    ReplyDelete
  2. ही आहे भारतीय सांस्कृतिक श्रीमंती. हनिफचा सारा संसार म्हणजे त्याची ती सायकल… ती त्याच्या पोटाला भाकर, डोक्यावर छप्पर आणि ल्यायला कपडा अस सारंच देते. या जगात त्याच शरीर आणि त्याची सखी ती सायकल तेवढच त्याच …तेवढ्या भांडवलावर तो समाज सेवा करतो तेही सतत हसत मुखानं…हे परमेश्वर हनिफचा सदा रक्षण कर बाबा…असच त्याला हसतमुख असू दे…
    🙏😊🙏

    ReplyDelete
  3. छान पेस्ट कंट्रोल ची सायकल 😊🚴‍♀️🚴‍♀️🚴‍♀️🚴‍♀️

    ReplyDelete