Sunday, November 12, 2023

बडे दिनोमे खुशी का दिन आया...६६ किमी राईड आणि ११३ वे रक्तदान

बडे दिनोमे खुशी का दिन आया...

६६ किमी राईड आणि ११३ वे रक्तदान...

आजचा दिवस खरोखरच खूप खास आहे... आज दिपावली... उटणे लावून अभ्यंग स्नान... लक्ष्मी पूजन... आणि त्याच बरोबर माझा ६६ वा वाढदिवस... आणि लग्नाचा ४५ वा वाढदिवस... यालाच म्हणतात बडे दिनोंमे खुशी का दिन आया...

आजच्या मोठ्या दिवशी काही तरी भव्य दिव्य करायचे ठरविले होते... 

सकाळी चार वाजता उठल्यावर... बायकोने चंदनाचे उटणे लावले... अभ्यंगस्नान झाले... याच दिवशी श्री कृष्णाने नरकासुराचा वध केला होता... त्याच्या वधाचे  प्रतीक म्हणून करीटं फोडलं...

पूजाअर्चना झाल्यावर बायकोला लग्नाच्या ४५ व्या वाढदिवसासाठी शुभेच्छा दिल्या... मला सुद्धा गोड शुभेच्छा मिळाल्या...

आजच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त ६६ किमी सायकलिंग करण्याचा मानस सायकलिस्ट मित्रमंडळींनी सांगितला होता... 


सकाळीच सुरू झाली सायकल वारी... मरीन लाइन्सला पाच लूप मारण्याचे ठरविले होते... शुलू तांबे आणि तुषार रेडकर बिल्डिंग खालीच आले होते... सकाळच्या अतिशय आल्हादायक वातावरणात राईड सुरू झाली... नरिमन पॉइंटला अतुल ओझा, अंबरीश गुरव, नवनीत वरळीकर, ज्योती कोल्हे आणि तुषार वासे भेटायला आले... 

पन्नास किमी राईड झाल्यावर... एअर इंडिया बिल्डिंग शेजारील मनीज् मध्ये खादीची चळवळ सुरू झाली... उपमा चमच्याने कापून वाढदिवस साजरा झाला... ६६ किमी पूर्ण करायचे होते...  तेथून थेट हिंदुजा हॉस्पिटल शेजारील चौपाटीवर आलो... हरहुन्नरी अतुलने स्टायलिस्ट फोटो काढले...

अजून वाढदिवसाचा ज्वर उतरला नव्हता... तुषार रेडकर आणि शुलू दूरदर्शन जवळील केक शॉप मध्ये केक घेऊन वाट पाहत होते... गंमत म्हणजे केकच्या दुकानातच दुसऱ्यांदा वाढदिवस साजरा झाला... 

समुद्रा सारखेच... तरुण मित्रांच्या प्रेमाला भरते आले होते...

शिवडीच्या श्री हिंद स्वराज्य प्रतिष्ठान यांनी रक्तदान शिबिरात येण्याचे आमंत्रण दिले होते... पुन्हा फ्रेश होऊन परेल येथील भावसार सभागृहात दाखल झालो... तेथे मित्र रोहन आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी हार्दिक स्वागत केले... आतापर्यंत केलेल्या सायकलिंग बाबत तसेच रक्तदाना बाबत सभागृहाला माहिती दिली... वाढदिवसाच्या दिवशी रक्तदान ही संकल्पना सर्व तरुणांना खूप आवडली... 

शरीर स्वास्थ्या बरोबर  प्रदूषण मुक्त भारत या संकल्पनेचा प्रचार प्रसार करण्यासाठीच सायकलने भारत भ्रमंती सुरू आहे... तसेच सायकलिंग करा आणि मोबाईल संस्कृती मधून निसर्ग संस्कृती मध्ये या... हा संदेश तरुणांना दिला... 

माझे रक्तदान सुरू असतानाच सायकलिस्ट मित्र अंबरीश गुरव आला आणि त्याने पण रक्तदान केले... चांगली गोष्ट करणे हे सर्वांनाच प्रोत्साहित करते... याचाच परिपाठ अंबरिशने आज घालून दिला होता... 

आजच्या या मोठ्या दिवशी मनाला समाधान आणि आनंद देणाऱ्या गोष्टी हातून घडल्या होत्या... 

कुटुंब, नातलग, मित्रपरिवार आणि हितचिंतक या सर्वांच्या शुभेच्छांचे गाठोडे घेऊनच १६ नोव्हेंबर रोजी सात बहिणींना (नॉर्थ ईस्ट) भेटायला... त्यांच्या सोबत सायकलिंग करायला जातोय... 

ही शुभेच्छांची शिदोरी अनंत काळासाठी पुरणार आहे...


मंगल हो... !!!



4 comments:

  1. Great way to celebrate Satish ji .
    May you celebrate 100 birthday celebration with 100km of ride at that time .God bless u .

    ReplyDelete
  2. ग्रेट सर ! उपमा चमच्याने कापून वाढदिवस साजरा केलात.ही अभिनव कल्पना आवडली.आता याला उपमा नाही वगैरे मी म्हणणार नाही.पण या निमित्ताने पारंपारिक पध्दतीला चकमा दिलात एवढे मात्र नक्की.

    ReplyDelete
  3. व्वा! क्या बात है? आजचा दिवस सोन्या सारखा ' सहासष्टवा वाढदिवस त्यात लग्नाला पंचेचाळीस वर्ष पूर्ण अगदी खरे बडे दिनो मे खुशीका दिन आया माझ्या तर्फे पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete