मित्रमैफिल जमली… 🌧️☕🐟
दि. १३.०९.२०२५
पुण्याचा परममित्र सतीश टंकसाळे उर्फ बाबा आणि गिरगावचा अनंत दाभोलकर यांची भेट झाली... खूप महिन्यांनी...
सतीश उर्फ बाबा काल प्रतिथयश गायिका शोभा मुदगल ह्यांचा बारिश हा शास्त्रीय उपशास्त्रीय गाण्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी चर्नी रोड येथील रॉयल ऑपेरा हाऊस थिएटर मध्ये आला होता...
आम्हा मित्रांना खास भेटण्यासाठी आज मुंबईत बाबा थांबला होता... सायंकाळी बरोबर पाच वाजता रिगल पॅलेस हॉटेल मधील सूट नंबर ११७ मध्ये अनंत दाभोलकर सह एन्ट्री घेतली...
वेळेचा भोक्ता असणारा बाबा आम्ही पाच मिनिटे लवकर पोहोचल्यामुळे अतिशय खुश झाला होता... कडकडून मिठी.मारली... आज खूप दिवसांनी गळाभेट घेतली होती...
चहाच्या घोटाबरोबर सुरू झाली गप्पांची मैफिल... बाबाला ऐकणे हिच भूमिका आम्ही दोघांनी घेतली होती... जुन्या गोड आठवणी... बाबा भरभर बोलत होता... आम्ही तुडुंब हसत होतो... त्याच्या बालपणीचा ज्योतिष शास्त्रीबाबाचा जोक पुन्हा सांगताना सतीशबाबा जाम खुश झाला होता...
बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती आणि इकडे बाबा गप्पांच्या धूमधडाक्यात जोरदार बरसत होता... बाबांसोबत आम्ही सुद्धा जुन्या आठवणीत हरपून गेलो होतो...
पंचरत्न इमारती शेजारील रिगल हॉटेल मधून बाहेर पडून गिरगाव चर्च शेजारील श्रीराम हॉटेल मध्ये आलो... आता खाण्याबरोबर गप्पांची मैफिल रंगली... बाबाला सोलकढी थंड नको होती म्हणून वेटरने एक आयडिया केली आमच्या फ्रेश लाईम सोडा सोबत... थंड सोलकढी ओव्हन मध्ये ठेऊन गरम केली... बाबा एकदम खुश...
अनंताच्या आवडीचे मासे मिळण्याचे हे हॉटेल होते... उकडलेले चणे, फिश फिंगर, बोंबील आणि मांदेली या सोबत तीनचार चटण्या... नक्की गप्पांनी पोट भरले की मासे खाण्याने भरले ते कळलेच नाही...
चौथा मित्र राजेशला पाठवण्यासाठी माशांचे फोटो काढले... कारण त्याला आम्ही खूप मिस केले होते...
अतिशय खुमासदार जेवणयुक्त स्टार्टर दिल्याबद्दल श्री राम हॉटेल मधील स्टाफला खूप धन्यवाद दिले... आणि बाहेर पडलो... पाऊस सुरूच होता... बाबा म्हणाला आज खूप दिवसांनी दिलखुलास हसलो... आता फार हलकं वाटतं आहे...
तेथून पंचरत्न पानवाल्याकडे आलो... कलकत्ता मसाला पानाचा तोबरा तोंडांत भरला आणि आजच्या मित्र भेट मैफलीची सांगता झाली...
रिगल हॉटेल जवळ बाबाचा निरोप घेताना... पावले जड झाली होती... आता पुढील मैफिल बाबाच्या पुण्याजवळील फार्म हाऊस वर होणार आहे... आणि त्यानंतर राजेशच्या कसारा येथील बंगल्यावर... या वयात मित्र का असावेत याची प्रकर्षाने जाणीव झाली...
सतीश जाधव
7977690693
@@@@@@@
Enjoyed our meeting after a long time. It’s an experience of rejuvenation. Thank you.
ReplyDeleteदोन "S" मित्रांसमवेत बऱ्याच कालावधीनंतर भेट झाली. संध्याकाळ अविस्मरणीय व जुन्या आठवणींना सुखद उजाळा देऊन गेली. असेच भेटत राहू.
ReplyDeleteधन्यवाद.🙏
परम मित्र राजेश चे अभिप्राय....
ReplyDeleteजय श्रीराम
तीन दर्जेदार वेगवेगळ्या चवीचे रसिक,मजाच मजा.
चविष्ट बाबा ,छंदीष्ट सतिश, शिस्तबद्ध अनंत, आनंद म्हणजे हेच.😊💐🙏🚩