Monday, June 1, 2020

पहिला पाऊस 01.06.2020

01.06.2020

पहिला पाऊस

सकाळी साडे पाच वाजता सायकल घेऊन बिल्डिंग खाली उतरलो. पाहतो तर काय... रिमझिम पाऊस सुरू... 

आज पावसात सायकलिंग करता येणार... मनात आनंदाचा पाऊस पडायला लागला. मोबाईल रॅप करून सॅक मध्ये टाकला.

रिमझिम पावसात राईड सुरू झाली. दादर फ्लाय ओव्हरच्या खाली पाणी तुंबले होते. पाण्यात सायकल चालविताना पुढच्या चाकाच्या दोन्ही बाजूने जोरदार तुषार तोंडावर उडत होते. ओलाचिंब झालो आणि आनंदात हरखून गेलो.

कुर्ल्याला आल्यावर अभिजीतला फोन केला. त्याचा फोन बंद होता. आता पाऊस थांबला होता, पण रस्ता ओला होता. त्यामुळे सायकल अतिशय सावधानतेने चालवत होतो.

सात वाजता मुलुंडला पोहोचलो. ढगाळ वातावरणामुळे सकाळचे  सूर्यदर्शन ढगांच्या आडूनच होत होते.
ओलसर रस्त्यामुळे गाड्यांचे लाईट परावर्तित होत होते. हायड्रेशन ब्रेक घेतला. 
टोल नाक्याजवळील मुलुंड फ्लाय ओव्हरला वळसा घेऊन परतीचा प्रवास सुरू झाला.  मिठागरांजवळ  फ्लेमिंगो
  पक्ष्यांचे थवे विहार करत होते. माळे सारखे उडणाऱ्या फ्लेमिंगो मधील शेवटच्या पक्षाने पाण्यातील मासा पकडण्यासाठी डुबकी  मारली. त्या डुबकी बरोबर पाण्यावर उठलेले तरंग, मनात झंकार उठवून गेले.
या  पक्षांचे स्वच्छंदी जीवन पाहिले की वाटते; आपल्याला पंख असते तर गगनाला गवसणी घालणे किती सहज झाले असते.

पहिल्या पावसात एकट्याने राईड करण्यातले सुख काही वेगळेच असते.  मीच माझा राजा असतो आणि सेवक सुद्धा...

सतीश जाधव

2 comments:

  1. पहिल्या पावसातली पहिल राईड. पुढच्या चाकांच्या बाजुने उडणारे तुषार आणी वरुन होणारा सुखद वर्षाव. खरा सायकलिस्ट आणी निसर्गप्रेमीच कल्पना करु शकतो तुमच्या आनंदाची.

    ReplyDelete
  2. क्या बात है संजय....

    खरं आहे तुझं म्हणणं ...

    ReplyDelete