मित्र भेटींसाठी सायकल राईड...
२० एप्रिल २०२५...
सकाळी साडेपाच वाजता घरातून निघालो सायकल राईड करत... हवेत सुखद गारवा होता... एकट असताना सुंदर गाणी सुचतात... आणि ती गुणगुणत सायकलिंग करणे म्हणजे आनंदाचा परमावधी असतो... त्या आनंदाचा आस्वाद घेत रमत गमत सायकलिंग सुरू होती... वाटेतील स्वातंत्रवीर सावरकरांच्या स्मारकाला भेट दिली...
सात वाजता भांडुप मुलुंड पंपिंग स्टेशन हायवे जवळ समीरची भेट झाली... पुढे दोन तास तो साथीने राईड करणार होता...
सर्लीच्या छोट्या कामासोबत... समीरच्या सुद्धा सायकलचे काम सायकल डॉक्टर हिरेनने सफाईदारपणे केले... उपवन येथून राईड करत सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाकडे आलो...
मुलाखत होती... आजपर्यंत झालेल्या इंटेंस टुरिंग सायकलिंग बाबत... ती झाल्यावर समीर ऐरोलीच्या मित्रां समवेत माझी भेट घालून देणार होता... ऐरोली स्पोर्टस कॉम्लेक्सच्या लाउंज मध्ये...
मुलाखत पूर्ण झाली आणि तडक निघालो ऐरोली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये... गंमत झाली... समीर ज्या दोस्तांची भेट घालून देणार होता... ते माझे जुने दोस्त निघाले... डॉ सत्वशील राणे आणि डॉ अरुण औटी ह्यांच्या सोबत सायकल राईड केल्या होत्या... संदीप कोरडे आणि संदीप जाधव तसेच कमलेश भाई क्षणार्धात माझे मित्र झाले...
सुरू झाली गप्पांनी मैफिल... नुकत्याच झालेल्या विश्वविक्रमी काश्मिर ते कन्याकुमारी सायकल वारी बद्दल सर्वांना माहिती दिली...
आतापर्यंत झालेले जागतिक विक्रम... मी केले नाहीत... तर ते परमात्म्याने माझ्याकडून करून घेतले... मी तर निमित्त मात्र होतो... कोणत्याही विक्रमासाठी सायकलिंग केली नाही... टुरिंग सायकलिंग पूर्ण केल्यावर विक्रम झाला आहे हे कळले...
सेव्हन सिस्टर सायकल वारी... नर्मदा सायकल परिक्रमा... आदी कैलास ओम् पर्वत सायकल वारी मुंबई कन्याकुमारी, मुंबई दिल्ली सायकल वारी... मनाली लेह लडाख सायकल वारी... या मध्ये प्रदूषण मुक्त भारत ह्या संकल्पनेचा प्रचार प्रसार केला... याबाबत सर्वांना माहिती दिली...
आतापर्यंत पूर्ण झालेल्या ७८ हजार किमी सायकल वारी मध्ये अनुभवलेल्या गमती जमती... भारतातील जनतेचा मिळालेली उस्फुर्त प्रतिसाद... आलेल्या अडचणी शिकण्याची संधी समजून सोडविण्यासाठी केलेले अथक प्रयत्न... यांचे किस्से सांगताना तीन तास कधी गेले कळलेच नाही...
डॉ औटी आणि डॉ राणे तसेच त्यांच्या मित्रमंडळींनी शाल आणि शिवाई फाऊंडेशनचा पंढरीची वारीचा मोमेंटो देऊन सन्मान केला...
ही डॉक्टर मंडळी पंढरीच्या वारीत करत असलेल्या मोफत वैद्यकीय सेवेची माहिती मिळाली... जनसेवा हीच ईश्वर सेवा... हा भाव दिसला... या जुन्या मित्रांची नव्याने ओळख पटली...
तेथून समीरच्या चष्म्याच्या दुकानात गेलो... सौ ब्रीद यांचा परिचय झाला... आजच्या मित्र भेटीने समीर एकदम भारावून गेला होता... त्याने छानसा फास्ट ट्रॅक बायकिंग गॉगल भेट दिला... समीर ऐरोली वेशीपर्यंत सोडायला सुद्धा आला होता...
सकाळी साडेपाच वाजता सुरू केलेली सायकल वारी दुपारी साडेतीन वाजता पूर्णत्वाला गेली ... आता भर उन्हात सुद्धा सायकल चालविणे... सहज साध्य झाले आहे... झालेली ८५ किमी सायकल वारी आज भेटलेल्या सर्व मित्रांना अर्पण...
२०१६ पासून सुरू झालेल्या सायकल वारीने दिला प्रचंड मित्र परिवार आणि जीवन जगण्याचा नवा दृष्टीकोन...
प्रत्येक क्षणाचा मध चाखायला शिकलो आहे...
भरभरून मिळणारे प्रेम पाहून एकच अवस्था झाली आहे...
अनंत हस्ते कमलावराने देता...
किती घेशील दो कराने...
म्हणूनच या प्रेमाची मुक्त उधळण सुरू आहे... निरपेक्ष मनाने...
सतीश जाधव, सायकलिस्ट
7977690693
Sir thx to you , no words Thx once again.
ReplyDelete