सुप्रभात मित्रांनो....
या वेळी टू टायरचे तिकीट काढले होते... ते सायकल डिस्मेंटल करून आपल्याच बोगीत घेता येतील काय... हा प्रयोग करण्यासाठी...
लोकमान्य टिळक टर्मिनस पर्यंत सर्व सामानासह सायकल राईड करत पोहोचलो...
तेथून सर्व सायकल थेट प्लॅटफॉर्मवर नेल्या... गाडी सुटायला एक तास अवधी होता... सर्व सायकलचे पेडल आणि दोन्ही चाक काढले...
एक सायकल... काढलेल्या चाकासह सीटच्या खाली ठेवली... दोन सायकल अप्पर बर्थ वर बांधल्या... त्यांची चाके बाजूला असलेल्या बोगी सहाय्यकाच्या केबिन मध्ये ठेवली... जितेंद्र, नवनीत आणि माझी सायकल बोगीत व्यवस्थित ठेवली गेली...
महेंद्र डिस्मेंटल सायकल घेऊन कल्याण येथे चढला... त्याचा साइड अप्पर बर्थ होता... लोअर बर्थच्या खाली त्याची सायकल मस्त बसली... त्यात समान सुद्धा राहिले...
रात्री जितेंद्र बोगी मधील मोकळ्या जागेत निवांत झोपला... त्याआधी विशांतने आणलेली मस्त बंगाली मिठाई फस्त केली...
आपल्याच बोगीतून सायकल घेऊन जाण्याची युक्ती सफल झाली होती...
नवीन प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाला होता...
आज दिवसभराचा प्रवास कोइंबतूर एक्सप्रेस मधून आहे आणि उद्या सकाळी चेन्नई मध्ये पोहोचू...
जय श्री राम...
सतीश जाधव
7977690693
Nice 👍 All the best 🙏
ReplyDeleteMast mast enjoy Nilgiri tours
ReplyDelete