Wednesday, March 11, 2026

श्री. बजरंग बनसोडे (म.पो.से.), पोलिस उप आयुक्त... एक ग्रेट भेट... दि. १० मार्च२०२६

श्री. बजरंग बनसोडे (म.पो.से.), पोलिस उप आयुक्त, गुन्हे प्रतिबंधक शाखा, मुंबई... संवेदनशीलता, निसर्गप्रेम आणि माणुसकीची आस असणारे आणि जपणारे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व... आज त्यांच्या सहवासात अनुभवलेले क्षण माझ्यासाठी एक संस्मरणीय ठेवा झाला आहे...


बुलढाण्याचे सायकलिस्ट परममित्र संजय मयुरे यांच्या भारत परिक्रमा आरंभ समारंभात बनसोडे साहेबांची प्रथम भेट झाली होती... त्या कार्यक्रमात संजयची मयुरेची घेतलेली मुलाखत आज बनसोडे साहेबांच्या मार्फत मिळाली आणि तोच धागा पकडून भेटीसाठी वेळ मागितली... दुपारी तीन वाजताची वेळ मिळाली... या भेटीसाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि सायकल मित्र सुवर्णा अडसुळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले...


भेट होताच साहेबांचा पहिला प्रश्न होता... “ओळखलं काय?” त्यावर सहज उमटलेले उत्तर होते... खेळाडूंना वेळ देणाऱ्या आणि प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्याला बरे कोण विसरेल?

पहिल्याच भेटीत प्रेम, आत्मीयता आणि जिव्हाळ्याची ओढ अनुभवायला मिळाली...

केबिनमधील अभ्यागतांच्या कोचावर आदरपूर्वक बसवले गेले. फक्कड चहाच्या सोबतीने गप्पांची रंगलेली मैफल मनात घर करून गेली...

टुरिंग सायकलिंगमधील विविध उपक्रम, शिव चातुर्य दिनाच्या निमित्ताने राबविण्यात आलेली गरुडझेप सायकल मोहीम, आणि खऱ्या इतिहासाची ओळख सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न याविषयी तसेच दोन वेळा पार पडलेल्या विश्वविक्रमी काश्मीर ते कन्याकुमारी सायकल मोहिमेबद्दल बोलणे साहेब अतिशय एकाग्रतेने ऐकत होते...

संवादाच्या ओघात त्यांनीही अशी मोहीम करण्याची इच्छा व्यक्त केली. अशा मोहिमेसाठी योग्य वेळ काढता येईल, फक्त या व्यग्र जबाबदाऱ्यांमधून किमान तीस दिवसांची सुट्टी घ्यावी लागेल.. असा मनमोकळा संवाद रंगला...

साहेबांच्या केबिनमध्ये असलेली विविध झाडे, इनडोअर रोपटी आणि हिरवाई पाहून त्यांच्या निसर्गप्रेमाची आवड लक्षात आली... त्या अनुषंगाने बोलताना गावाकडे तब्बल दहा एकर क्षेत्रात विविध झाडे लावल्याचे त्यांनी सांगितले...

फळझाडे, फुलझाडे आणि पक्षी प्राण्यांसाठी जपलेले ते छोटेसे निसर्गविश्व... निरपेक्ष प्रेमाचा अनुभव देणारे आहे... आणि एक वेगळ्या भावविश्वात नेणारे आहे... हे त्यांच्या बोलण्यातून लक्षात आले...

गाय वासरू, हरण, कुत्रा, मांजर, खार, ससा, राजहंस, पोपट, कबुतर तसेच विविध पक्षी… अशा अनेक प्राण्यांशी जुळलेला त्यांचा जिव्हाळा ऐकताना मन भारावून गेले...

एखादा आजारी कोंबडा औषधोपचाराने बरा करणे, दोन्ही डोळ्यांनी अंध असलेली मांजर केवळ आवाजावरून आपला मार्ग शोधत जगणे, आजारी घुबड किंवा कबुतरांना आधार देऊन पुन्हा निसर्गात सोडणे... या प्रत्येक गोष्टीतून त्यांच्या मनातील करुणा आणि मायेची ओल पक्षी प्राणी प्रेम अतिशय भावले...

निरपेक्ष प्रेमाची खरी भाषा प्राणी पक्षी शिकवतात, हे त्यांच्या अनुभवातून प्रकर्षाने जाणवले...

या संवादात आणखी एक गोष्ट विशेष लक्षात आली... मंत्रालयातून आणि पोलिस विभागातून वरिष्ठांचे फोन सतत येत होते... त्यांना हवी असलेली माहिती देताना... आपल्या प्रत्येक सहकाऱ्याशी, कर्मचाऱ्याशी बोलताना त्यांच्या आवाजात प्रेम, संयम आणि आदर जाणवत होता...

पद मोठे असले तरी माणुसकी अधिक मोठी असते... सरांच्या व्यक्तिमत्त्वाची ही आगळी वेगळी ओळख मनात त्यांच्या बद्दल एक आदरच स्थान निर्माण करून गेली...

फिटनेस जपणारे, धावणारे, पोहणारे, सायकल चालवणारे, मोटारसायकलने भ्रमंती करणारे, मित्र जोडणारे, निसर्ग प्राणी पक्ष्यांवर नितांत प्रेम करणारे आणि माणसांबद्दल आत्मियता जपणारे असे हे व्यक्तिमत्त्व भेटले... हीच आजची खरी “ग्रेट भेट” होती...

अशा संवेदनशील, प्रेरणादायी आणि मनाने अतिशय श्रीमंत असलेल्या अधिकाऱ्यांची भेट जीवनाला नवी ऊर्जा देऊन गेली...


सतीश कुसुम विष्णू जाधव
सायकलिस्ट
7977690693


3 comments:

  1. सर खूप सुंदर. असे वाटतच न्हवते की तुम्ही आणि DCP sir पहिल्यांदा भेटत आहात. तुमचा गप्पा इतक्या रंगल्या होत्या की तुम्हाला पूर्ण दिवस पण कमी पडला असता. मला असे वाटत होते की ' One great person is meeting another great person' . DCP सुरांचा मुक्या पशु व पक्षांबद्दल चे प्रेम पाहून त्यांच्यातल्या खऱ्या माणसाचे दर्शन झाले. तुमचा मुळे DCP sir एवढे मोकळ्या मनाने बोलले. त्यांचा इच्छा देखील व्यक्त केल्या. Hats off to both of you🫡

    ReplyDelete
  2. सर खूप सुंदर. सायकलस्वारांची एक चांगली भेट.

    ReplyDelete
  3. बनसोडे साहेबाचे अभिप्राय...

    Jadhav kaka
    Manpurvak dhanywad.
    👏🏻

    ReplyDelete