Saturday, January 15, 2022

ग्रेट भेट... सायकल प्रेमी रमाकांत महाडिक.... दि. १५ जानेवारी २०२२

ग्रेट भेट... सायकल प्रेमी रमाकांत महाडिक...

दि. १५ जानेवारी २०२२

सकाळी रमाकांतचा फोन आला, "आज दादरच्या  स्वातंत्रवीर सावकार राष्ट्रीय स्मारकाला भेट देतोय"
खूप आनंद झाला... रमाकांत माझा सायकलिस्ट मित्र आणि सोलो रायडर... संपूर्ण भारत भ्रमंती करणारा... स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशाच्या सैनिकांना ७५०० किमी ची राईड समर्पित करणार आहे...
 

तसेच या राईड दरम्यान २६ फेब्रुवारीला स्वातंत्रवीर सावरकरांच्या पुण्यतिथी निमित्ताने अंदमानच्या सेल्युलर जेलला भेट देणार आहे. 

२ जानेवारीला रमाकांतने गुजरात मधील कोटेश्वर येथून सायकल राईड सुरू केली.  दररोज १५० किमी सायकलिंग  करत आतापर्यंत २००० किमीचा टप्पा पार केला आहे.  रमाकांतने आज १५ जानेवारी रोजी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली... 

येथे रमाकांतचा सन्मान सोहळा पार पडला... सावरकर स्मारकाचे मुख्य अधिकारी श्री संजय चेंदवणकर यांनी माझी जन्मठेप हा ग्रंथ  भेट दिला.


जय महाराष्ट्र या टीव्ही चॅनलने त्यांची मुलाखत घेतली... परममित्र विजय कांबळे सुद्धा या सोहळ्याला उपस्थित होता...

आज रमाकांतचा मुक्काम कळवा येथे आहे... सोमवार १७ जानेवारी पासून त्याची सायकल सफर कोकणातील सागरी महामार्गाने कन्याकुमारी पर्यंत जाईल... स्वामी विवेकानंद स्मारकाला भेट देऊन... रामेश्वर, चेन्नई, भुवनेश्वर करून कलकत्त्याला प्रयाण करणार आहे... 

कलकत्त्या वरून विमानाने अंदमानला जाऊन सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्रवीर सावरकरांना २६ फेब्रुवरीला त्यांच्या पुण्यतिथि निमित्त मानवंदना देणार आहे... अंदमान मध्ये ४०० किमी सायकल राईड करून साडेसात हजार किमीचा टप्पा गाठून भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पण करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना ही राईड समर्पित करणार आहे...

वयाच्या ६८ व्या वर्षी एकूण ६८ हजार किमी सायकलिंग पूर्ण करण्याचा रमाकांतचा निर्धार आहे...

रमाकांतच्या या अतुलनीय पराक्रम पूर्तीसाठी आम्हा सर्व समर्पयामि सायकलिस्ट तर्फे आभाळा एव्हढ्या शुभेच्छा...

सोमवार दि १७ जानेवारीला रमाकांत कळवा येथून सकाळी कन्याकुमारीकडे प्रस्थान करणार आहे... त्याला दिलेली सायकल साथ आपल्यासाठी प्रेरणादायी असेल...

रमाकांतच्या या अतिशय प्रेरक अशा सायकल सफरीत त्याची "ग्रेट भेट"  जीवनाची नवी दिशा दाखवून गेली...

       भारत माता की जय...

सतीश जाधव
मुक्त पाखरे...

रमाकांत महाडिक
9167201915

17 comments:

  1. रमाकांत सरांच्या सायकल सफरी अशा अचाटच असतात, खरंच!

    ReplyDelete
  2. परममित्र काशिनाथ जाधव याचे अभिप्राय...

    जेथे शब्द स्तब्ध होतात आणि ऊर एका विलक्षण भावनेने भरून येतो... अशा निश्चयाचा महामेरू रमाकांत सरांना नम्र वंदन आणि मणभर शुभेच्छा...

    ReplyDelete
  3. रमा, तूला आपल्या केंद्र वाले मित्र वृंद ग्रुप कुर्ला (तुझे सर्व बाल सव॔गडी) तर्फे तूझ्या या भन्नाट सोलो सायकल भ्रमण साठी लाख लाख शुभेच्छा.

    ReplyDelete
  4. Exilent work sir ji.......
    Congratulations 🎉🎉👏

    ReplyDelete
  5. खरतर ही दोन ग्रेट सायकलिस्ट ची भेट आहे .
    तुम्ही आदर्श आहात आमच्यासाठी 🙏🙏🙏

    ReplyDelete
  6. Great �� work Mahadik kaka...very inspiring to all of us. Take care.Salute to you. ��

    ReplyDelete
  7. Wel done Ramakant Great,keep it up and All d Best👍

    ReplyDelete
  8. रमाभाई यांचा प्रवास अवर्णनीय आहे. स्फुर्तीदायक, प्रेरणादायी व प्रशंसनीय आहे. सॅल्युट रमाभाई.

    ReplyDelete
  9. केवळ अप्रतिम सायकल वारी,ह्या अचाट उपक्रमाला अनेक अनेक शुभेच्छा!अतिशय अभिमानास्पद!जय हिंद!जय महाराष्ट्र!!
    स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सर्व थोर स्वतंत्रता सेनानींना मानाचा सलाम👏🏾

    ReplyDelete
  10. All the best for the expedition ,Salute to your courage and strength ,Role Model for us , Great Sir

    ReplyDelete
  11. रमा, तुझ्या कौतुकासाठी शब्दकोश अपुरा आहे. तुझ्या धाडसाला आणि जिद्दीला सलाम.तुझ्यासाठी फक्त एव्हढेच म्हणेन "दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर आमुचे जुळती" आम्हाला तुझ्यासारखा मित्र आहे याचा आम्हाला अभिमान आहे

    ReplyDelete
  12. सतीश सर,रमाकांत सर तुम्ही आदर्श आहात आमच्यासाठी तुम्हा दोघांनाही वंदन,तुम्हा दोघांनाही तुमच्या सायकल प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  13. सर्वांचे आभार

    ReplyDelete