Saturday, April 26, 2025

अलिबाग राईड आणि आदरतिथ्य ८.०२.२५

अलिबाग राईड आणि आदरातिथ्य... रवी, रिद्धी आणि राम जोशी... दि.. ०८.०२.२५

रिद्धीला अनाहुत पत्र...

तुझी आणि रवीची... माझे सर्व सायकलिस्ट मित्र तोडभरून तारीफ करत होते... 

रवी काल रात्री... राम जोशींना घेऊन कार्ले खिंडीत आला... आणि आमचा सन्मान केला... 

तसेच तुझ्यामुळे आमची राहण्याची अतिशय फर्मास व्यवस्था झाली...

मुंबई ते अलिबाग अशी जवळपास 142 किमी सायकलिंग केल्यामुळे आम्ही दमलेलो होतो... अशा वेळी तुम्ही दोघांनी केलेली सर्व सोय आणि बडदास्त आमच्यासाठी संजीवनी होती...

आणि भोजन सुद्धा अतिशय अप्रतिम होते... पनीर बिर्याणी आणि गुलाबजाम खाल्ल्यावर तृप्तीची निवांत झोप झाली... सकाळी ताजेतवाने होऊन आज  95 किमी राईड सुद्धा झाली... 

तू तर घरी पाहुणे आले असताना सुद्धा आवर्जून आम्हाला भेटायला आली होतीस... 

रवी तर सकाळी आमच्या सोबत रेवदंड्या पर्यंत राईड पण करायला आला होता...

एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ... या तुकाराम महाराजांच्या उक्ती प्रमाणे... जीवनातील छोटे छोटे आनंद आपण एकमेकांना देतो तेव्हा जीवन अतिशय सुकर होते... आणि एक सामाजिक काम केल्याचा आनंद मिळतो...

हा आदरभाव आणि प्रेम हेच जीवनाचे चिरंतन मूल्य आहे...

यालाच म्हणतात आदरातिथ्य... 

तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि अनंत आशीर्वाद... 

जय श्री राम... 


सतीश जाधव सायकलीस्ट 

 7977690693


1 comment:

  1. खूप खूप धन्यवाद! आपले आदरातिथ्य करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली हे आमच्यासाठी खूप मोठे भाग्याचे गोष्ट आहे! आपल्या आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू देत

    ReplyDelete