Sunday, December 27, 2020

नर्मदे हर!!! नर्मदा सायकल वारी...

नर्मदे हर!!! नर्मदा सायकल वारी...

२६.१२.२०२०


दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर परमेश्वर सुद्धा प्रत्येक व्यक्तीच्या रूपाने मदत करतो याची प्रचिती आली...

पंधरा दिवसांपूर्वीच, सायकलने नर्मदा परिक्रमा  करायची अशी आंतरिक इच्छा झाली. हे यशोधन नर्मदा परिक्रमा गृपवर लिहिले होते. 


 जर कोणाला सायकलने नर्मदा परिक्रमा करायची इच्छा  असेल तर त्याच्या बरोबर यायला तयार आहे,  ही पोष्ट यशोधनचे सर्वेसर्वा प्रकाशभाऊंनी नर्मदा परिक्रमेच्या सर्व पन्नास गृपवर  टाकली होती.

तीन दिवसापूर्वी २३ डिसेंबरला माझे मित्र रामेश्वर भगत यांच्याबरोबर सायकल राईड करत असताना, रामेश्वर  म्हणाला,   'माझा मित्र संजय सावंत २६ डिसेंबरला सायकलने नर्मदा परिक्रमा करण्यासाठी निघतोय'...

मनात वीज चमकली...

नर्मदा मातेचं बोलावणं आलं आहे...

आता थांबणे नाही...

२३ डिसेंबरला संध्याकाळी संजयला फोन केला...

बोलणे झाले... सायकल परिक्रमेचा सर्व कार्यक्रम समजावून घेतला... संजयने केलेली सर्व तयारी व्यवस्थित ऐकून घेतली...

रात्री सर्व गोष्टींचा विचार केला... पत्नीशी बोललो... आणि मनोमन नर्मदा परिक्रमेला जायची मनाने तयारी केली...

२४ आणि २५  डिसेंबर या दोन  दिवसात..

सायकल सर्व्हिसिंग... नवीन टायर टाकणे... संजयने बनविला तसा... "नर्मदा परिक्रमा"  प्रिंट केलेला टीशर्ट बनविणे... सायकलला लावायचा छोटा बोर्ड... रेल्वे बुकिंग... सायकल डिसमेंटल करून बॅगेत भरणे आणि पुनः असेंबल करणे... पॅनियर बॅग दुरुस्त करणे... पॉवर बँक खरेदी करणे... या सर्व गोष्टी करायच्या होत्या...

अहो आश्चर्यम...,  दोन दिवसात सर्व तयारी झाली होती...

मेट्रो जवळील ग्लॅलेक्सी स्पोर्ट्सच्या हर्षदने पांढरा टीशर्ट तर दिलाच, त्याच बरोबर त्यावर नर्मदा परिक्रमा नाव सुद्धा प्रिंट करून दिले.  दुकानातील त्याचा सहकारी प्रमोदने अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन सायंकाळपर्यंत माझा टीशर्ट नावासह तयार करून ठेवला होता. हर्षदने माझा सर्व कार्यक्रम ऐकल्यावर, प्रेमाने कानटोपी प्रेझेंट दिली. तीचा वापर नर्मदा परिक्रमेत करण्याची विनंती केली.

रोमन प्रिंटरकडे अर्ध्या तासात सायकलला लावायचा छोटा बोर्ड तयार झाला. हरिओम रमेशला टायपिंग येत नव्हते. तेव्हा ते करून दिल्यावर आवश्यक रंगसंगती निवडून आर्टवर्क बनविले. रंगीत प्रिंट घेऊन त्याला डबल लॅमिनेशन केले.

संपूर्ण प्रिन्सेस स्ट्रीट फिरलो... एका दुकानात सायकलचे २७.५ साईझचे टायर मिळाले. घरी आणून सायकलचे जुने टायर काढून नवीन बसविले.. सायकल सर्व्हिस करून टकाटक केली.

रेल्वे बुकिंग सुद्धा उपलब्ध होते... किंबहुना संजयच्या बोगीतच सीट मिळाली... २४ डिसेंबरच्या रात्री संजयने विचारले 'Any Updates', त्याला बनविलेला बॅनर आणि टीशर्टचा फोटो पाठवला. क्षणभरात 'मस्त' ही प्रतिक्रीया संजय कडून मिळाली.

संजयच्या सायकलसाठी स्पोकची सुद्धा व्यवस्था झाली. नर्मदा सायकल वारीचा कार्यक्रम आणि सामानाची लिष्ट मिळाली. त्यावर संजय बरोबर चर्चा केली. सायकल सफारीच्या मागील अनुभवावरून कमीत कमी आणि आवश्यक समानसह ही नर्मदा परिक्रमा करायची होती. त्याची संपूर्ण जुळवाजुळव केली...

२६ डिसेंबरला दुपारीच विजय मदतीला आला. संपूर्ण सायकल खोलून नवीन घेतलेल्या दोन बॅगामध्ये सायकल व्यवस्थित पॅक केली. नर्मदा वारीची सर्व तयारी पूर्ण झाली होती...


आता अवंतिका एक्सप्रेस गाडीत बसलो आहे... सायकलची नवीन बनविलेली बॅग सुद्धा सीटखाली व्यवस्थित फिट झाली आहे...

मनातील दुर्दम्य इच्छाशक्ती... मातेने घातलेली साद... दोन दिवसात प्रत्येक व्यक्तीने केलेली मदत... मित्रांनी दिलेली साथ... कुटुंबाचा सकारात्मक सपोर्ट... याचीच परिणीती... म्हणजे माझी नर्मदा सफर आजपासून सुरू झाली आहे...

नर्मदे हर !!!

सतीश जाधव
स्वच्छंदी पाखरे...

7 comments:

  1. नमस्कार सर,
    त्रीवार अभिनंदन आणि भरपुर शुभेच्छा !!!!!
    मनातील दुर्दम्य इच्छाशक्ती... मातेने घातलेली साद आणि त्यासाठी तुम्ही 'मनापासून केलेला प्रयत्न' हा सुध्दा तेव्हदाच महत्वाचा आहे.
    'प्रयत्नांती परमेश्वर' असेही म्हणतात ते खरे आहे.

    आपल्या पुढील परिक्रमेची ही पूर्वतयारी आहे असे मी समजतो.

    पुनश्च भरपूर शुभेच्छा आणि नर्मदा मातेला साष्टांग नमस्कार !!!!
    .... लक्ष्मण

    ReplyDelete
  2. नमस्कार सर,
    त्रीवार अभिनंदन आणि भरपुर शुभेच्छा !!!!!
    मनातील दुर्दम्य इच्छाशक्ती... मातेने घातलेली साद आणि त्यासाठी तुम्ही 'मनापासून केलेला प्रयत्न' हा सुध्दा तेव्हदाच महत्वाचा आहे.
    'प्रयत्नांती परमेश्वर' असेही म्हणतात ते खरे आहे.

    आपल्या पुढील परिक्रमेची ही पूर्वतयारी आहे असे मी समजतो.

    पुनश्च भरपूर शुभेच्छा आणि नर्मदा मातेला साष्टांग नमस्कार !!!!
    .... लक्ष्मण

    ReplyDelete
  3. नमस्कार सर,
    त्रीवार अभिनंदन आणि भरपुर शुभेच्छा !!!!!
    मनातील दुर्दम्य इच्छाशक्ती... मातेने घातलेली साद आणि त्यासाठी तुम्ही 'मनापासून केलेला प्रयत्न' हा सुध्दा तेव्हदाच महत्वाचा आहे.
    'प्रयत्नांती परमेश्वर' असेही म्हणतात ते खरे आहे.

    आपल्या पुढील परिक्रमेची ही पूर्वतयारी आहे असे मी समजतो.

    पुनश्च भरपूर शुभेच्छा आणि नर्मदा मातेला साष्टांग नमस्कार !!!!
    .... लक्ष्मण

    ReplyDelete
  4. खरंय! दुर्दम्य इच्छाशक्ती आसेल तर मार्ग सापडतोच! आपल्या सायकल नर्मदा परिक्रमेला खूप खूप शुभेच्छा! , प्रणाम!

    ReplyDelete
  5. आपला हा उपक्रम खूपच उत्साहपूर्ण व धाडसी आहे. अर्थात मैया चे बोलावणे व साथ आहेच. आपल्या परिक्रमेत माझ्या आपणास खूप खूप शुभेच्छा.

    ReplyDelete
  6. आपला हा उपकर्म खूपच धाडसी आहे आपल्या परिक्रमा खूप खूप शुभेच्छा नर्मदे हर
    हर हर हर

    ReplyDelete
  7. अभिनंदन आणि भरपुर शुभेच्छा ! नर्मदे हर!





    ReplyDelete