रोटरियन नागेश सोपारकर याने रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी नवी मुंबईच्या माध्यमातून बेलापूर येथील भारती विद्यापीठात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात भाग घेण्याचा योग आला...
आमंत्रण मिळाले... तेव्हाच नागेशला सांगितले या कार्यक्रमाला नक्की येणार... शारदाश्रम १९७६ बॅच मधला रघुनंदन श्रोत्रीय याला सुद्धा नागेशने निमंत्रित केले होते...
रक्तदान हेच जीवनदान हे ब्रीद जपणाऱ्या शारदाश्रम शाळेतील दोन माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा रक्तदान उपक्रम आयोजित करण्यात आला होता...
वातावरणात उत्साह, जिव्हाळा आणि सेवाभावाची उर्जा पसरली होती. विशेष म्हणजे शाळकरी मित्र दिनेश नाडकर्णी, मकरंद चव्हाण आणि शरद पाटील यांनी सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहून मैत्रीची पर्वणी अधिक संस्मरणीय केली होती...
कार्यक्रमाच्या प्रारंभी नागेशने परिचय करून देताना सांगितले...
प्रदूषणमुक्त भारताचा संदेश देत संपूर्ण भारत भ्रमंती करणारा प्रेरणादायी सायकलिस्ट सतीश जाधव यांने नुकतीच काश्मीर ते कन्याकुमारी सायकल मोहीम विक्रमी वेळात पूर्ण केली आहे... तसेच आतापर्यंत ११३ वेळा रक्तदान केले आहे... ८० हजार किमी सायकलिंग करणारा सतीश हा माझा शाळेतील मित्र आहे हे अभिमानाने सांगितले...
तसेच दुसरा शाळकरी मित्र श्री. रघुनंदन श्रोत्रीय याने १०३ वेळा रक्तदान केले आहे.. तसेच ७५ हजार किलो कचरा कंपोस्टमध्ये रूपांतरित करून पर्यावरण संवर्धनात अमूल्य योगदान दिले आहे... विविध NGO सोबत काम करून आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात रघुनंदनने नवा आदर्श निर्माण केला आहे...
विशेष म्हणजे हा कार्यक्रम आयोजित करणारा रोटरी क्लब ऑफ स्पोर्ट सिटी नवी मुंबईचा सक्रीय सदस्य नागेश सोपारकर, प्रेरणादायी सायकलिस्ट सतीश जाधव आणि पर्यावरण योद्धा रघुनंदन श्रोत्रीय... हे तिघेही शारदाश्रम विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी आहेत... याची उपस्थितांना माहिती दिली...
या कार्यक्रमाचा आणखी एक ऊर्जा देणारी उपस्थिती होती पुण्याचा उमेश कणकवलीकर याची... आपल्या ६० व्या वाढदिवसानिमित्त १२५ व्या वेळी रक्तदान करणार होता उमेश... मोटीवेशनल स्पीकर म्हणून कॉर्पोरेट जगतात ज्याची दखल घेतली जाते असा उमेश या उपक्रमाचा उत्सव मूर्ती होता...
शारदाश्रमच्या माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे हा उपक्रम अधिक भावपूर्ण झाला... या उर्जायुक्त वातावरणात मला ११४ व्यांदा रक्तदान करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली... मित्रांच्या सहवासात रक्तदान करण्याचा आनंद म्हणजे खरी पर्वणीच होती... रोटरी क्लब ऑफ क्लीन सिटी नवी मुंबई तर्फे शाल श्रीफळ आणि मोमेंटो देऊन सन्मान करण्यात आला...
नवी मुंबई रोटरी क्लबने माझा सहकुटुंब सन्मान केला... हे रक्तदानाचे सर्वश्रेष्ठ दान शक्य झाले ते माझ्या पत्नीमुळेच... तिच्या पाठिंब्यामुळेच मी ११४ वेळा रक्तदान करू शकलो... याची प्रांजळ कबुली दिली...
रघुनंदन आणि उमेश सारख्या प्रेरणादायी व्यक्तींना भेटल्यामुळे रक्तदानाच्या क्षेत्रात आणखी कार्य करण्याची ऊर्जा मिळाली... विशेष करून तरुणांनी नियमित रक्तदान करावे म्हणून भारती विद्यापीठातील तरुणांना आवाहन केले... नियमित रक्तदान करा आणि आरोग्यदायी भारत घडवा...
आजचा दिवस... रक्तदान कार्यक्रमासोबत... मैत्री, समाजसेवा आणि पर्यावरण जाणीव या सगळ्या मूल्यांचा एकत्रित उत्सव होता...
रक्तदानातून प्रचंड ऊर्जा... मित्र भेटीतून जुन्या सुखद आठवणी आणि समाजसेवेतून अपरिमित आनंद या भावनांचा आज त्रिवेणी संगम झाला होता...
सतीश जाधव
7977690693
अभिनंदन सतिश, असाच मित्र मंडळी सोबत आनंददायी व आरोग्यदायी रहा, याच तुला शुभेच्छा...💐
ReplyDeleteधन्यवाद दोस्ता...
DeleteCongratulations👏
ReplyDelete👍
ReplyDeleteतुम्हा दोघांचे हार्दिक अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. आयुष्य कसे जगावे हे तुमच्याकडूनच शिकलं पाहिजे. देव तुम्हाला शतायुष देवो हीच सदिच्छा.
ReplyDeleteधन्यवाद
DeleteAbhinandan ❤️
ReplyDeleteCongratulations sir
ReplyDeleteप्रिय सतीश सर, ११४ व्या रक्तदानासाठी हार्दिक अभिनंदन.
ReplyDeleteतुमच्या सारखे मार्गदर्शक व मित्र लाभल्याने मी ही ६२ वेळी रक्तदान करू शकलो याचा अभिमान आहे.
धन्यवाद मित्रा...
Delete