शारदाश्रम 1974 बॅच... दोस्तीचा धमाका...स्नेहसंमेलन...
स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने, जागतिक मैत्री दिन रविवार दि. ३ ऑगस्ट रोजी...शारदाश्रम शाळेच्या १९७४ बॅचमधले तब्बल २६ मित्र पुन्हा एकदा एकत्र आले होते... दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील पार्क क्लब मध्ये...
शाळा संपली, वर्ग सुटला, शिक्षण पूर्ण झालं... पण शारदाश्रमी मित्रांची मैत्री... आजही तितकीच ताजी... तितकीच हसरी... आणि तितकीच हृदयात खोलवर रुजलेली आहे... जणूकाही काळाच्या ओघात विखुरलेली पाने पुन्हा एकत्र येऊन आठवणींच्या वहीत जुन्या दिवसांचा सुगंध पेरण्यासाठी जमली होती...
कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत भावनिक ठरली... दिवंगत मित्र संजीव पणशीकर आणि इंग्रजी शिकविणाऱ्या लाडक्या तळवलकर बाई यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली... काही क्षण गप्पांचे सूर शांत झाले... त्यांच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात अलगद जागा करून गेल्या...
नंतर मात्र वातावरणात पुन्हा हलकेच हास्य उमटायला सुरुवात झाली.... कुणाच्या हातात गारगार मोजिटो मॉकटेल... कुणालच्या हातात वाइनचा ग्लास...
कुणी ब्लेंडर प्राइडचा आस्वाद घेत होतं... तर कुणी केवळ गप्पांमधूनच नशा अनुभवत होते... हास्य, किस्से आणि मस्तीचा फुल्ल बार सुरू झाला होता...
विशेष म्हणजे, श्रावण महिना सुरू असतानाही चविष्ट सामिष आणि निरामिष चकण्यांचा मनसोक्त आस्वाद घेत सगळे भान विसरून गेले होते...
कुणाल ठाकूर... विकासने होशिंगने दिलेली परदेशी चॉकलेट वाटत फिरत होता... सर्वांना त्याने बनविलेली होममेड वाइन पिण्याचा आग्रह करत होता... त्याचं प्रेम जणू त्या बाटलीत साठवलेलं होतं... तर प्रमोद दातार स्वादिष्ट मिठाई सर्वांना देत होता...
दिनेश नाडकर्णी... नेहमीच्या बाईक रायडर गँगची ताम्हिणी घाटाची राईड रद्द करून शाळकरी मित्रांच्या भेटीसाठी आला होता.... त्या वळणदार रस्त्यांपेक्षा अधिक साद त्याला बालमित्रांच्या आठवणींनी घातली होती... विशेष म्हणजे... त्याने बारा दिवस पाळलेला श्रावणही आजच्या दिवशी मित्रासाठी सोडला होता... मैत्रीसाठी पहिला घोट घेतला होता... उद्यापासून पुन्हा त्याचा श्रावण सुरू होणार होता...
या स्नेहमेळाव्याचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे जयवंत पवार, नंदन कोलासकर, सुरेश चिकणे, दयानंद आफंडकर, राजन वारंग, उदय जाधव, प्रकाश तर्फे आणि शंकर परब हे मित्र... जवळपास पन्नास वर्षांनी प्रथमच या कार्यक्रमात सर्वांना भेटायला आले होते... या साऱ्यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमात नवचैतन्य फुलवलं होतं...
परदेशात इंजिनियर म्हणून काम केलेल्या जयवंत पवारच्या डोक्यावरच टेंगूळ सांगत होतं... तो बरंच काही उद्योग करत होता... तो म्हणाला हे टेंगूळ म्हणजे १००० GB चे मेमरी कार्ड आहे...
सुरेश चिकणे निवृत्त झाल्यावर प्रचंड फिरतो आहे आणि नवोदित कब्बडी संघाचे व्यवस्थापन पाहतो आहे...
BARC मधून निवृत्त झालेला दयानंद आफंदकर सुद्धा खूप फिरतो आहे... कब्बडीपटू असलेल्या दयानंदाच्या परदेश वाऱ्यासुद्धा खूप झाल्या आहेत आणि नुकताच प्रचंड गर्दीच्या कुंभमेळ्याला सुद्धा जाऊन आला आहे...
राजन वारंग वाऱ्यावर फिरतो आहे... इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे... शाळेतील टेक्निकल विषयामुळे त्याच्या छंदाचे रूपांतर व्यवसायात झाले आहे...
हे जूने मित्र.. आज त्यांची ५१ वर्षानंतर नव्याने ओळख झाली होती...
निशिकांत क्षिरे दररोज दीड तास योगा करतो... आणि फिरण्याची आवड जपली आहे... प्रमोद तर सावलीसारखा त्याच्या सोबत असतो... शाळेच्या एकाच बेंच वरील मित्र म्हणून दोघेही प्रख्यात होते.. बँकेत सुद्धा एकाच सेक्शन मध्ये कार्यरत होते...
शरद पाटील आज खूप खुश होता... सर्व शाळकरी मित्रांना एकत्र आणण्याचा त्याचा ध्यास आज सफल झाला होता... ग्रुप वर भेटण्याची पोस्ट टाकल्यावर शरदने सर्वांना वैयक्तिक फोन केले होते... मेसेज पाठविले होते... त्याच्या मेहनतीला आज फळ आले होते...
सतीश कामेरकर घराला रंग काढण्यात व्यस्त होता... तर विकास होशिंग परदेशात थांबला होता... अजित तोडणकर कोर्ट कचऱ्यात अडकला होता... संजय कोळवणकर युनियनच्या कामात गुंतला होता... त्यांना खूप मिस केले...
विनायक सध्या फोटोग्राफी शिकविण्याचे क्लास घेतो आहे... उद्या त्याचा वाढदिवस आहे... त्याला अँडवान्स मध्ये सर्वांनी शुभेच्छा दिल्या...
नागेश सकाळी तीन वाजता उठल्यावर देवाला प्रार्थना करतो... आणखी मला दोन तास वाढवून देशील काय... सुखी समाधानी जीवन लाभल्याबद्दल परमेश्वराचे तो दररोज आभार मानतो...
अजय हर्डीकरला सर्व मित्रांना भेटून खूप छान वाटत होत... हॅप्पी गो लकी अजयला सर्व मित्रांचा अभिमान आहे...
या वयात सुद्धा मकरंद चव्हाण उर्फ गिरीशची नोकरी सुरू आहे... आणि जिंदगी एन्जॉय करतो आहे...
शारदाश्रमचा उत्कृष्ट टेबल टेनिसपटू उदय जाधव आवर्जून उपस्थित झाला होता... सुधीर पवार आणि उदय ने TT मध्ये अंतर शालेय स्पर्धेत शाळेच प्रतिनिधित्व केलं होत... उदय २०१३ मध्ये बँकेतून निवृत्त होऊन आता क्रेडिट सोसायटी चालवतो आहे... त्याचे काम सुरू आहे... आणि जीवनात खूप समाधानी आहे...
मॅरेथॉनपटू नंदन कोलासकर हा शाळेतील मित्र आहे हे पार्क हॉटेल मध्ये कळले... घाटकोपर ते मुलुंड येथील सर्विस रोडवर धावताना त्याला खूप वेळ पहिलं होते... त्याची नव्याने ओळख झाली... बेस्ट मधून इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून निवृत्त झालेला नंदन काही काळ युनियनचे काम करत होता... आता त्याच्या सक्रिय सहभागामुळे घाटकोपर येथील त्याची इमारत रीडेव्हलप झाली आहे... १५ ऑगस्ट रोजी इमारतीचा ताबा सर्व सदस्यांना मिळणार आहे... केव्हढी मोठी गोष्ट आहे ही... कब्बडी, क्रिकेट, हॉलिबॉल मध्ये त्याने शाळेचे प्रतिनिधित्व केले होते...
व्यावसायिक प्रकाश तर्फे याचे सुइंग मशीनचे भवानी शंकर मार्गावर दुकान आहे... आणि तो लाईफ मस्त मजेत जगतो आहे... त्याचं आयुष्य सुईंग मशीनसारखं झपाझप धावतंय...क्षणोक्षणी मैत्रीची नाती जोडतोय... पुढेच निघालाय, थांबण्याचं नावच नाही...
दिनेश नाडकर्णी एक प्रसन्न व्यक्तिमत्व... बाईक रायडर आणि फिटनेस फ्रीक दिनेशने नुकतीच इंटरसेप्टर बुलेट वरून स्पिती व्हॅली पार केली आहे... अतिशय थ्रिलिंग सफर होती त्याची...
असे हे आगळे वेगळे आणि लाईफ एन्जॉय करणारी व्यक्तिमत्वे... माझे शाळकरी मित्र आहेत याचा खूप अभिमान आहे...
विनायक पुराणिकही पहिल्यांदाच या कार्यक्रमात सहभागी झाला होता... आणि त्याच्या मैत्रीच्या भाष्याने सर्व सुखावले होते... मैत्रीच्या वृक्षाला तजलेदार करणाऱ्या अविस्मरणीय आठवणी आज पुन्हा एकदा मनाच्या पटलावर हळूच उमटल्या होत्या...
शाळेच्या काळाने दिलेले संस्कार, शिक्षकांनी दिलेली शिकवण आणि मिळालेली परिपक्व जीवनदृष्टी... या साऱ्यांचं प्रतिबिंब प्रत्येकाच्या देहबोलीतूनतून स्पष्ट उमटत होती...
कोणी बँकेत अधिकारी... कोणाची व्यवसायात भरारी… कोणी डॉक्टर... कोणी इंजिनियर... कोणी पोलिस अधिकारी.. कोणी CA... तर कोणी शेतकरी झाले होते... पण त्या सर्वांमागे एकच अधोरेखित भावना होती... आम्ही शारदाश्रमी...
त्या दिवशी जुन्या आठवणी नव्याने उमलत होत्या... आणि प्रत्येकाच्या डोळ्यात, आवाजात आणि हसण्यात नकळत खुलत होत्या...
प्रमोद दातार आणि निशिकांत क्षीरे ही जोडगोळी म्हणजे मैत्रीचा मूर्तिमंत नमुना होती... एकाच शाळेत... शारदाश्रमात शिकले... एकाच बँकेत एकच ब्रँच मध्ये नोकरी केली आणि आजही एकमेकांच्या जवळपासच राहतात... दोघांची मैत्री म्हणजे जणू जीवनभराची सहचर्यगाथा होती...
हसत हसत टपल्या मारणारा कैलास... आणि आपल्या गोड हास्याने आपलासा वाटणारा जीवन... हे बंधुद्वय कार्यक्रमात अक्षरशः रंग भरत होते... कैलासच्या मिश्किल चिमट्यांनी सगळ्यांचं हसू थांबत नव्हतं, तर जीवनचं प्रत्येकाला भेटण्यासाठीचं उत्कट प्रेम पाहून सगळ्यांनाच शाळेतील दिवस आठवत होते..
शरद पाटीलच्या हातात कॅमेरा होता आणि तो रंगतदार क्षणांची उजळणी टिपण्यात मग्न होता... त्याच्या कॅमेऱ्यात अनेक आठवणी कायमस्वरूपी जपल्या गेल्या होत्या...
दुसरीकडे प्रकाश परांजपे गप्पा मारण्यात रममाण झाला होता... तर मकरंद चव्हाण आपल्या शब्दांनी... प्रमोद अमृतकर, शरद पाटील आणि सतीश यांच्या आजच्या मित्रभेटीचा कार्यक्रम जुळवून आणल्याचे कौतुक करत होता...
शिरीष देसाईने आज कडकडीत श्रावण पाळला होता... त्याला मित्र भेटीनेच नशा आली होती...
दिलीप काळे म्हणजे अजब रसायन… सर्व काही कळतं... पण न कळल्याचा आविर्भाव करण्यात पटाईत... DSLR कॅमेऱ्याचे बटण दाबायचा पण फोटो यायचा नाही... कारण तो बटण लॉक करायचा... अभिनय असा करायचा की ऑस्करवाल्यांनी त्याला 'काही केलं नाही!" हा आजीवन निर्विकार अभिनय पुरस्कार द्यावा...
कुणालने अलिबागच्या आपल्या बंगल्यावर पुढचं स्नेहसंमेलन ठेवण्याची प्रेमळ ऑफर दिली... तर नागेशने 'जगायचं कसं' या विषयावर मार्मिक भाष्य करत सगळ्यांना अंतर्मुख केलं... विनायक पुराणिकने आपल्या खास शैलीत मित्रांची महती मांडून सर्वांना खुश केलं...
अजय हर्डीकरने मला सायकलवरून घरी येण्याचं आग्रहाचं निमंत्रण दिलं... प्रमोद अमृतकरने अत्यंत संयमितपणे खाण्यापिण्याच्या ऑर्डर सांभाळून कार्यक्रमाचा सोज्वळ व्यवस्थापक ही जबाबदारी पार पाडली... थोडे उशिरा आलेले रामकृष्ण मुतालिक आणि नरेंद्र मोहिते हिरीरीने कार्यक्रमात सामील झाले होते...
तीन तास मैत्रीच्या सूरावटीत हरवलेले हे सारे चेहरे जेव्हा एका फोटोसाठी एकत्र आले... तेव्हा त्या क्षणाने शाळेच्या जुन्या वर्गासारखंच काहीसं भावविश्व उभं केलं होतं...
खानपानाच्या समारोपानंतर जेव्हा गारेगार कुल्फी आली... ती तर गालावर हसू आणि मनात समाधान देऊन गेली...
आजचा दिवस म्हणजे शब्दशः आठवणींचा उत्सव होता... प्रत्येकाने अंतःकरणातून अनुभवला आणि आयुष्यभरासाठी जपून ठेवला... मैत्रीचे धागे अजून घट्ट झाले होते..
सर्वांनी पुन्हा भेटण्यासाठी... असे कार्यक्रम वर्षातून किमान दोन वेळा करण्याचे आश्वासन घेऊन... एकमेकांचा निरोप घेतला...
माणसाच्या आयुष्यात पैसा येतो-जातो… पण मित्रांची संगत म्हणजे एक अमूल्य ठेवा असतो...
शारदाश्रम १९७४ बॅच जय हो... मैत्री अमर राहो...
सतीश जाधव...
7977690693
एक नंबर मित्रा.
ReplyDeleteफारच छान सत्या.
ReplyDeleteKhupach chaan
ReplyDeleteसतीश तुझे लिखाण पण लाजवाब आहे. कालची आपली गळाभेट कधिच विसरण शक्य नाही.. असेच सगळ्या नी हसत खेळत मजेत राहू. सतीश मस्तच.. ❤
ReplyDeleteOld is Gold....😍😍
ReplyDeleteMi pan 1974 batch girls . Amhi 25 janu aahot . Ekda doghancha get together karuya. I remember Nandan. As my husband’s name is Nandan too😄.
ReplyDeleteLove the pics 👌❤️
सतिश, खूप छान मित्रा! इतिवृत्त अप्रतिम! अभिमान वाटतो...
ReplyDeleteप्रदीप मयेकर
शारदाश्रमी 75
अतिशय छान लिखाण मला माझ्या मित्रांची आठवण झाली
ReplyDeleteउत्तम सविस्तर माहिती सतीश.धनयवाद
ReplyDeleteVery nice Bhau
ReplyDeleteKhup chan baba
ReplyDeleteजाधव साहेब आपण जे स्नेह संमेलन आयोजीत केले - आणी जे मित्र ५१ वषाने भेटले या सारखा आनंद नाही आपल्या सर्व वर्ग मित्राना न भेटलेल्या 'अनाहूत ' मित्रा कडून भरपूर . शुभेच्छ|... आपला देसाई अनामिक मित्र .
ReplyDelete