Friday, May 29, 2020

आझाद पंछी राईड 29.05.2020

29.05.2020

आझाद पंछी राईड

आजची सोलो राईड करोना भयगंडातून मुक्त होण्यासाठी आणि सर्वाना मुक्त करण्यासाठी होती.

वीस मार्च पासून तब्बल 70 दिवस आपण सर्व घरात आहोत. आता एक लक्षात आलंय, पुढील वर्षभर तरी आपल्याला करोनासह जगायचे आहे.

मग आता आपण कसली वाट पाहतोय. सोशल डिस्टनसिंग पाळून आणि सर्व आवश्यक खबरदारी घेऊन आता बाहेर पडावच लागेल.
म्हणूनच 26 आणि 28 मे ला सायकल राईड केल्या. यात एक लक्षात आले, हळूहळू मुंबई पूर्व पदावर येतेय. चेकपोष्टवर पोलीस सुद्धा आता अडवत नाहीत. सध्या फक्त जिल्हा बंदी आहे.

म्हणूनच आजची सोलो राईड लोअर परेल ते जोगेश्वरी, पुढे विक्रोळी लिंक रोड वरून पवई , तेथून विक्रोळी वरून पुन्हा लोअर परेल अशी होती मुंबईतल्या मुंबईत केलेली ही राईड अतिशय सुखरूप आणि आनंददायी ठरली. 
पवईच्या व्हिव पॉईंटवर थांबून निसर्ग भरभरून मनात साठवला. एकांतात 20-25 मिनिटे व्यतीत केली. स्वच्छंदी पक्षी आनंदात गगन विहार करताना पाहणे म्हणजे पर्वणी होती. सकाळच्या सूर्य किरणांनी सोनेरी झालेला पवई तलाव, काळे पांढरे ढग आणि त्यातून परावर्तित होणाऱ्या प्रकाश शलाका स्तिमित होऊन कितीतरी वेळ पाहत होतो.
मी पण पक्षी झालो होतो, स्वच्छंद, बेधुंद, बंधमुक्त, गगनात विहार करणारा *आझाद पंछी*

सतीश जाधव

11 comments:

  1. क्या बात है "आझाद पंछी"।
    एकदम सही !!!!

    Keep it up sir.

    बाकी पंछी भी आ जायेंगे अहिस्ता आहिस्ता।

    सर्व फोटों अतिशय छान.
    वर्णन सुद्दा खूप छान लिहीले आहे!!!!

    सलाम !!!!

    ReplyDelete
  2. सुंदर फोटोग्राफी व डीटेलिंग लिखाण ,तुमच्या अभूतपूर्व उत्साहा ला सलाम साहेब

    ReplyDelete
  3. मस्त! मला पण आता सायकलला फिरायला न्यावसं वाटतंय. ती बिचारी सोशिक आहे पण किती दिवस वाट बघेल. फक्त घरी कुणाला न सांगता गुपचूप निघावे लागेल.

    ReplyDelete
  4. क्या बात है नमिता!!!

    तिच्या मनीचे भाव जाणलेस तू

    ReplyDelete
  5. मामा खरोखर तुम्ही आझाद पंछी आहात. मस्त

    ReplyDelete
  6. लिखाण, फोटोज आणि तुझा अफलातुन उत्साह आणि आत्मविश्वास सर्वकाही अफलातुन. वा वा !

    ReplyDelete
  7. आजचीच गम्मत सांगायचीय.

    बऱ्याच मित्रांचे फोन आले. त्या पवई व्हिव पॉईंट वरून तलावाचे आणि ढगांचे असे चित्र आम्हाला कधीच दिसले नाही.

    मी म्हणालो, कोणतेही चित्र पाहिले मनात तयार होते, नंतर ते प्रत्यक्षात दिसते.

    तेथील पक्षी, झाडे, डोंगर, पाणी सर्व तिथेच आहेत.

    मनातील तारुण्याची सकारात्मकतेची भावना तुम्हाला वेगळ्या विश्वात घेऊन जाते.

    आणि मग सुरू होतो,

    भावभावनांचा लपंडाव,

    तारुण्याच्या प्रांगणात.

    तुमचे वय कितीही असो...

    रममाण होता, निसर्ग संगीतात बालक होऊन...

    विचारांच्या अश्वांना मिळते निसर्गाच्या रथाची साथ....

    आणि ते चौफेर विहारतात आनंदाच्या सागरात.....


    मन तरुण असेल तर...

    जगण्याची आहे नशा…

    म्हणूनच सगळे विसरा

    आणि निसर्गात पाय पसरा ....



    सतीश जाधव

    ReplyDelete