Tuesday, May 5, 2020

*//प्रकाश बाबुराव सरवदे तळेगावचे अथांग तळे//*

22.06.2019

// प्रकाश बाबुराव सरवदे तळेगावचे अथांग तळे //

काही व्यक्तिमत्व खूपच प्रभावी असतात,  प्रथम भेटीतच भारावून टाकतात.

मुंबई पंढरपूर सायकल सफरीत अशाच एका व्यक्तिमत्वाची भेट झाली. लक्ष्मण नवलेंचे मित्र *प्रकाश बाबुराव सरवदे*

हाडाचा शिक्षक आणि विद्या प्रसारिणी सभा, पुणे यांच्या विविध शाळांमध्ये अध्यापनाची धुरा पस्तीस वर्षे यशस्वीपणे सांभाळून निवृत्त झालेले प्रकाश सरवदे, प्रथम भेटीतच माझे जिवलग मित्र झाले.

काही व्यक्तींना प्रथमतः  भेटल्यावर असे जाणवते की आपण यांना आधीही भेटलेलो आहोत,  का बरे असे होते?

पंढरपुर सायकल वारीमध्ये माझ्यासह लक्ष्मण नवले, अतुल ओझा आणि संतोष शिर्के सामील झाले होते. संतोषचे नुकतेच डोळ्याचे ऑपरेशन झाले होते, तरीही तो माऊलीच्या ओढीने सायकल वारीत सामील झाला होता.

दुपारच्या जेवणाचा मुक्काम तळेगावमधील माझा शाळकरी वर्गमित्र प्रकाशच्या घरी करूया,  हा लक्ष्मण नवलेचा प्रस्ताव आम्ही स्वीकारला. दुपारी बारा वाजता लोणावळ्याला पोहोचलो.  तेथून तळेगावसाठी जोरदार स्प्रिंट मारली. साडेतीन वाजता तळेगावला प्रकाश सरवदेंच्या घरी पोहोचलो. हॉलमध्ये सुदर्शनचक्रधारी श्री कृष्णाची फ्रेम होती.

दुपारच्या जेवणास अंमळ वेळच झाला होता. पण सरवदे गुरुजी आमची वाट पाहत थांबले होते. शांत, धीरोदात्त, हसतमुख व्यक्तिमत्व; सफेत सदरा-लेंग्यात आणखी उठून दिसत होते. शिवाजी महाराजांसारखी दाढी त्यांच्या व्यक्तिमत्वाला भारदस्तपणा आणत होती. घरात शिरताच प्रकाश आणि त्याच्या सौ. त्रिवेणी यांनी सुहास्य वदनाने स्वागत केले.

पंगतीची तयारी झाली. आंम्ही सर्वजण जमिनीवरील सतरंजीवर मांडी घालून बसलो.  प्रकाश भाऊ सुद्धा आमच्या सोबत जेवायला बसले.

सुंदर शाकाहारी बेत  होता. वरण-भात आणि  त्यावर साजूक तूप तसेच पोळ्या,  हिरवे वाटणे बटाटा रस्सेदार आमटी, हिरवी चटणी, लोणचं  आणि गोड पदार्थ म्हणून काजू कतली होती.

  जोरदार भूक लागली होती. जेवणाला सुरुवात करण्याअगोदर *"यज्ञ शिष्टाशिनः सन्तो"*  प्रार्थना झाली. पोटात जठराग्नी सोबत भक्तीरस सुद्धा पाझरला होता. प्रकाशाची पत्नी सौ. त्रिवेणी साक्षात अन्नपूर्णा होती. जेवणाला अप्रतिम चव होती. सायकलिंगचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. या सुंदर शाकाहारी पाहूणचारामुळे मन प्रसन्न झाले.

आता सुरू झाली गप्पांची मैफिल. चौकसपणामुळे प्रकाश भाऊंना विचारले, ' जेवणा अगोदर प्रार्थना का?'   आपल्या रसना उद्विपित करण्यासाठी तसेच जठरातील पाचकरस पाझरण्यासाठी प्रार्थना महत्वाची आहे. प्रथमतः जेवणाचा आस्वाद डोळ्याने, नाकाने, कानाने, त्वचेने आणि जिव्हेने घेणे  अतिशय आवश्यक आहे.  अन्नाचा परिपूर्ण आस्वाद पंचेंद्रियाने आणि मनाने घेतल्यामुळे त्याचे पचन सुफळ संपूर्ण होते. अतिशय अभ्यासपूर्ण आणि  वैज्ञानिक  उत्तर प्रकाशभाऊंनी  दिले होते.

विद्या प्रसारिणी सभा, पुणे यांच्या विविध शाळांमध्ये अध्यापन क्षेत्रात ३५ वर्षांची सेवा त्यांनी दिली आहे.  त्यातील २८ वर्ष मुख्याध्यापक म्हणून  कार्यरत होते. सुविद्य पत्नी सौ त्रिवेणी आणि दोन मुली प्रियांका व मधुरा असा चौकोनी संसार. नुकतेच मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे. प्रकाशभाऊ मे २०१८, मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर स्वाध्याय परिवारासाठी पूर्ण वेळ कार्यरत आहेत.

पांडुरंग शास्त्री आठवले उर्फ दादाजींच्या स्वाध्याय परिवाराचे वरिष्ठ सदस्य आहेत, प्रकाश भाऊ.         त्यांच्या तेजस्वी चेहऱ्यावर सात्विक भाव प्रकर्षाने जाणवत होते.

स्वाध्याय परिवार आणि दादाजींच्या कार्याच्या अनुषंगाने प्रकाश भाऊंशी चर्चा सुरू झाली.

ज्ञान, कर्म आणि भक्ती ही स्वाध्यायची त्रिसुत्री त्यांनी सविस्तरपणे सांगितली.

*मनुष्य गौरव* हा स्वाध्यायचा पाया आहे.  श्रीमद भागवत गीतेतील तत्वज्ञान सर्वांना समजावणे आणि आचरणात आणण्यासाठी दादाजी कार्यरत होते.  त्यांनी स्थापन केलेल्या  तत्वज्ञान विद्यापीठामध्ये सर्वांना प्रवेश आहे. स्वाध्यायचा अर्थ आहे,  स्वतःला जाणणे, स्वतःचे अध्ययन करणे.

प्रकाश भाऊंशी चर्चा करताना, त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींनी मनात पक्के घर केले.

*"भक्ती प्रेमातून हवी भीतीतून नको"*

*परमेश्वराने आपल्याला सर्व काही बहाल केले आहे,  त्यामुळे मंदिरात जाऊन काही मागणे मागण्याऐवजी या जन्मासाठी परमेश्वराला धन्यवाद दिले पाहिजेत* (Thanks Giving To God)

परमेश्वराची भक्ती प्रेममय असायला हवी. काही मागण्यासाठी किंवा भीती पोटी नको. हे तत्व मला पटले.

वडीलधाऱ्यांना  नमस्कार करण्यामुळे त्याचा प्रभाव लहानांवर तर पडतोच तसेच घरातसुद्धा  प्रसन्न आणि शांततामय वातावरण निर्मिती होते. हे विचार तर भन्नाटच.

त्रिकाल संध्या करण्यामुळे वातावरण पवित्र होते.

सकाळी हाताचे दर्शन घेऊन  "कराग्रे वसते लक्ष्मी" .....

दुपारच्या जेवणा अगोदर

  *यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः
भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्* ....
 
आणि रात्री झोपण्या अगोदर
*ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने॥ प्रणत: क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम:॥ ....

या प्रार्थना गृहसौख्य राखतात तसेच मनशांती देतात.

राजीव दीक्षित यांच्या व्याख्यानात ऐकलेली एक गोष्ट प्रकाश भाऊ  गेली कित्येक वर्ष आचरणात आणत आहेत.
ती म्हणजे,  "रोज सकाळी उठल्यावर तोंड न धुता, तोंडात असलेली लाळ डोळ्यांच्या बुबुळाला लावणे". यामुळे आश्चर्याची गोष्ट म्हणजे  त्यांच्या चष्म्याचा नंबर नाहीसा झाला आहे.

मेडिटेशनचा  त्यांनी सहज सोपा अर्थ सांगितला,  "ध्यानधारणा म्हणजे जागृतपणी झोपेचा अनुभव घेणे. मन एकाग्र करणे."

प्रकाश भाऊंच्या चेहऱ्यावरील सुहास्य, सतत सकारात्मक ऊर्जा प्रसारित करत होते.

लक्ष्मण भाऊंनी प्रकाशबद्दल आणखी एक माहिती दिली ती म्हणजे, त्यांनी "पुणे कन्याकुमारी आणि परत पुणे"  सायकलिंग केले आहे. खूप आनंद झाला, हे ऐकून.

आनंदाचा एखादा क्षण जरी जीवनात आला तरी खूप काही साध्य केलं असे समजायचे. हा विचार भावला मनाला.

तसेच आज कोणाचे तोंड पाहिले म्हणून दिवस खराब गेला, असे विचार जर येत असतील तर, देवाचे तोंड पाहावे म्हणजे असे नकारात्मक विचार येणारच नाहीत.

मुलगी प्रियांकाच्या लग्नाचा प्रसंग आठवला तेव्हा तर त्यांना स्वतःचे लग्न सुद्धा आठवले.

त्यांचा अभिनिवेश म्हणजे एखाद्या घटनेचे विश्लेषण करताना  मनात सकारात्मक भाव ठेवणे.  गुंता कोणी केला, यापेक्षा तो कसा सोडवता येईल या कडे लक्ष देणे.

प्रकाशभाऊ,  जनसेवा करतात, कोणतीही अपेक्षा न ठेवता.

त्यांना मान, प्रशंसा, पद, पैसा, अधिकार, मोठेपणा याची कसलीही अपेक्षा नाही.

हाती असलेले काम सचोटीने करणे, हेच त्यांचे धेय्य आहे.

देव सतत मनात हवा,  तरच चुकीच्या गोष्टी करण्याची बुद्धी होणारच नाही,  हे त्यांचे भाष्य मनाला उच्च पातळीवर घेऊन गेले.

पूजेची सक्ती नाही तर परमेश्वराचे रूप  आपल्या चित्तात उतरविणे,  त्यांचे गुण आपल्यात मनात रुजविणे आणि ते आचरणात आणणे; हीच खरी ईश्वर भक्ती आहे, हे तत्वज्ञान भावले.

सद्गुणांचा वापर जीवनात होणे महत्वाचे आहे तसेच त्यातून लोककल्याण होणे सुद्धा आवश्यक आहे. या विचारांनी मन भावविभोर झाले.

जवळपासच्या गावात दादाजींकडून मिळालेले स्वाध्याय तत्वज्ञान सांगणे, हा उपक्रम प्रकाश भाऊ गेली ३५ वर्ष करीत आहेत. कोणतीही अपेक्षा न ठेवता लोकजीवन सुसह्य करणे हा प्रकाशभाऊंचा ध्यास आहे.

पांडुरंग शात्री आठवलेंच्या (दादाजींच्या)  विचारांचा प्रचंड पगडा आहे प्रकाशभाऊंचा जीवनावर आहे.

खरोखर "ते सेफ हँड मध्ये आहेत"

योग्य गुरू मिळाले हे त्याचे परम भाग्य आहे.

जवळपास पस्तीस-चाळीस गावांशी त्यांचा संपर्क आहे.

परमेश्वराची भक्ती कशी करावी याची प्रेरक महिती प्रकाशभाऊ  या गावात देतात.

त्यामुळे शेकडो कुटुंबांचे  जीवन सुखी समाधानी झाले आहे.

प्रकाशभाऊंनी शेवटी अतिशय प्रेरक गोष्ट सांगितली ती म्हणजे, " आपल्या बोलण्यात आणि वागण्यात एकवाक्यता हवी, पारदर्शीपणा हवा "

इतक्यात त्रिवेणी वहिनीने मस्त मसालेदार चहा सुद्धा बनविला. तास-दीड तास कसा गेला ते कळलेच नाही. आता आम्हाला पुणे गाठायचे होते.

सरवदे कुटुंबाला शुभ कामना देऊन सायकलने पुण्याला प्रस्थान केले.

आयुष्य खूपच तोकडे आहे, म्हणूनच आपल्या जीवनाला आश्चर्यकारकरीत्या स्तिमित करणाऱ्या व्यक्तिमत्वांची प्रशंसा करायलाच हवी.

प्रकाशभाऊंचा  जीवनपट खालील चार ओळी अधोरेखित करतोय.

वाट होती खडतर, केला खूप प्रयास !

कष्टांच फळ सोन म्हणून त्याचीच धरली कास !

दिला साऱ्यांना आधार, नाही धरला हव्यास !

उज्वल यशाला तुमच्या, आमचा सलाम खास !

*" प्रकाश सरवदे"* म्हणजे तळेगावाचे अथांग तळे*

एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व माझ्या जीवन सफरीत समाविष्ट झाले होते.

खूप भाग्यवान आहे मी  ! ! !

सतीश विष्णू जाधव

57 comments:

  1. सुंदर ओघवते व्यक्तीचित्रण,अशा व्यक्तींचा सहवास नकळत आपले ही आयुष्य उजळून टाकतो.
    फिरते रहा लिहिते रहा

    ReplyDelete
    Replies
    1. विद्या,

      खूप खूप आभार,

      तुमच्या प्रोत्साहनामुळे लिहिण्याची प्रेरणा प्रचंड उत्सर्जित होते.

      आनंदाच्या वाटेवर प्रकाश सरवदे सारखे, तुमच्या सारखे मित्र, सवंगडी जेव्हा भेटतात तेव्हा आनंदाचे नभ उमड घुमड करीत तृषार्त धरणी वर बरसतात आणि मग वाहू लागतात शब्दांचे ओढे आनंदयात्रींकडे !!!

      पुनःश्च आभार!!!

      Delete
    2. खूपच छान लिखाण अन तेवढ्याच ताकदीचे उत्तुंग व्यक्तीमत्व म्हणजे आमचे सर्व स्वाध्यायींचे लाडके भाऊ म्हणजे भाऊ

      Delete
  2. Very well written by you sir. 🙏

    ReplyDelete
  3. सरवदे भाऊचे जीवन म्हणजे आमच्यासाठी सतत प्रेरणारत्रोत आहेत.

    ReplyDelete
  4. खूपच छान लिखाण अन तेवढ्यात ताकदीचे उत्तुंग व्यक्तीमहत्व आमचे भाऊ
    जय योगेश्वर

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, तुमच्या अभिप्रायाबद्दल

      Delete
  5. आमचे आदर्श व प्रेरणादायी व्यक्तिमत्व 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरं आहे, प्रेरणा स्रोत आहेत भाऊ !!!

      Delete
  6. जल इतके गहिरे
    की न कळे थांग
    हृदयी आहे प्रेमाचं
    हे तळे आहे अथांग

    ReplyDelete
    Replies
    1. या अथांगात, अतिशय पारदर्शकता आहे.

      Delete
  7. जल इतके गहिरे
    की न कळे थांग
    हृदयी आहे प्रेमाचं
    हे तळे आहे अथांग

    नि३

    ReplyDelete
  8. आमचे प्रेरणादायी सरवदे भाऊ यांची कीर्ती ची पावती अतुलनीय आहे, त्यांचा मनुष्य जीवनावरचा अभ्यास खुपच प्रेरणादायी आणि जीवनाला कलाटणी देण्यासारखे आहे. अशा महान व्यक्तिंच्या सानिध्यात आमाला राहावयास मिडत आहे हे आमचे परम भाग्यच आहे

    ReplyDelete
    Replies
    1. सरवदे भाऊ एक आदर्श जीवनप्रवाह आहे, ज्यांच्या सान्निध्यात लोखंडाचे सोने होते.

      Delete
  9. सुंदर आणि निखळ मैत्री म्हणजे सरवदे सर

    ReplyDelete
    Replies
    1. आदर्श व्यक्तिमत्वाची मैत्री जीवन मंगलमय करते.

      Delete
  10. केवळ माझ्याच नाही तर माझ्यासारख्या लाखोंच्या जीवनाला वळण देणारं आणि आदर्श मार्गावरती नेणारं एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे आमचे सर
    जय योगेश्वर

    ReplyDelete
    Replies
    1. जीवनाचा मार्गदर्शक म्हणजेच सुखी माणसाचा सदरा, असे आहेत सरवदे भाऊ

      Delete
  11. श्री सरवदे भाऊंचे जीवन म्हणजे आमच्यासाठी सतत प्रेरणा स्त्रोत आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. त्याचे जीवन हिमालया सारखे उत्तुंग आहे.

      Delete
  12. माझया सारख्या अनेक तरुणांना योग्य मार्गदर्शन करून, त्यांच्या आयुष्याचे टर्निंग पॉईंट आहेत ते. भरकटलेल्या जहाजाला त्याचा योग्य मार्ग दाखवून मार्गस्थ करणारे दीपस्तंभ आहेत. उत्तुंग व्यक्तिमत्व आम्हाला लाभले हे आमचे भाग्यच 🚩🙏🚩

    ReplyDelete
    Replies
    1. उज्ज्वल भवितव्याकडे नेणारी पथदर्शक मशाल आहे, सरवदे भाऊ

      Delete
  13. माझया सारख्या अनेक तरुणांना योग्य मार्गदर्शन करून, त्यांच्या आयुष्याचे टर्निंग पॉईंट आहेत ते. भरकटलेल्या जहाजाला त्याचा योग्य मार्ग दाखवून मार्गस्थ करणारे दीपस्तंभ आहेत. उत्तुंग व्यक्तिमत्व आम्हाला लाभले हे आमचे भाग्यच 🚩🙏🚩

    ReplyDelete
  14. खरोखरच माझ्याही आयुष्यातील एक आदर्श नी प्रेरणा दायी स्थान ग्रेट सर👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. प्रेरणेचे स्फुलिंग जागते ठेवणारे व्यक्तिमत्व !!!

      Delete
  15. आदरणीय सरवदे सर म्हणजे उत्साहाचा मूर्तिमंत झरा. मी खुप भाग्यवान समजतो की सरांचा जास्तीत जास्त सहवास मला लाभला. सरांचा खूप अभिमान वाटतो. पुढील आयुष्यासाठी व वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.

    ReplyDelete
    Replies
    1. मकरंद पांडुरंग गुर्जर

      Delete
    2. सतत कार्यरत असणे आणि दुसऱ्याला कार्यप्रवृत्त करणे हाच सरांनी घेतलेला वसा आहे.

      Delete
  16. सर आम्हाला शाळेत शिकवायला न्हवते पण सरांनी ज्यांना नाही शिकवले तेही तेवढाच आदर त्यांचा करतात अगदी पालक सुद्धा आणि ज्यांना त्याचा सहवास लाभला ते तर धन्य झाले आदरणीय सरवदे सरांना आणि त्यांच्या इतर सामजिक , धार्मिक कार्यास मानाचा मुजरा 👌👌🚩👏👏👏 आपलाच - कु. राजेश रामचंद्र फुणसे (उपसरपंच- देवले मावळ)

    ReplyDelete
    Replies
    1. सरांचा सहवास म्हणजे रातराणीचा सुगंध जो अंतर्मनाच्या गाभाऱ्यात सतत दरवळत राहतो

      Delete
  17. I have completed my graduation. So far have seen so many professors,teachers,principals but Saravde sir is class apart. A class by himself. I am so lucky to complete schooling under his mentorship. Even today his strong set of morals have an enormous influence upon me.

    ReplyDelete
  18. सरांची सर कोणाला येणार नाही...मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला सरांचा सहवास लाभला..जय योगेश्वर.

    ReplyDelete
  19. फारच छान
    शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज चरित्र
    सरांकडून एकणे म्हणजे आपण प्रत्यक्ष त्या काळात गेल्यासारखे वाटते.
    अप्रतिम.

    ReplyDelete
    Replies
    1. सरांचे व्यक्तिमत्व अतिशय भारदस्त आहे.

      Delete
  20. Khup chan amhi aaj je ghadlo gelo te saran mule

    ReplyDelete
    Replies
    1. एक आदर्श मार्गदर्शक, जीवन जगण्याची कला शिकविणारा कर्मयोगी.

      Delete
  21. असे गुरु आम्हाला लाभले. हे माझे भाग्य.

    ReplyDelete
    Replies
    1. गुरू साक्षात परब्रम्ह, तस्मय श्री गुरुवे नमः //

      Delete
  22. सरांसारखे गुरु आणि मार्गदर्शन मिळणे हेच आमचे भाग्य आहे त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत पुढे चालत आहोत

    ReplyDelete
    Replies
    1. पथदर्शक, मार्गदर्शक आणि जीवन घडविणारे गुरू.

      Delete
  23. धन्यवाद!��

    ReplyDelete
  24. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले !!!

    ReplyDelete
  25. भाऊंच्या कार्याला सलाम

    ReplyDelete
  26. खूपच छान, लेख आणि लेखातील नायक आमचे आवडते मोठे भाऊ.

    ReplyDelete
  27. खूपच सुंदर लिखाण आणि त्यावरूनही

    ReplyDelete
  28. खूपच छान लिखाण आणि त्याहूनही छान तुमच्यातील माणसे पारखाण्याचा उत्तम गुण...💐💐👌👌👍

    ReplyDelete