Tuesday, July 14, 2020

जीवनातली घडी अशीच राहू दे !!!

जीवनातली घडी अशीच राहू दे !!!


                                      अत्यंत चैतन्यमय आणि जीवन दर्शक निसर्गचित्र!!!

ठायी ठायी भरलेली सजीवता दृष्टीस पडते. निळ्या नभात  पांढुरके ढग विहरताना दिसतात.

नभीच्या सूर्य तेजामुळे पाण्याची वाफ होते. हीच वाफ थंड झाल्याने ढग बनून पुन्हा  धरेवर येते. अव्याहतपणे  हे जलचक्र चालू आहे म्हणूनच पृथ्वीवर सजीवता आहे.

ही चक्राकार गती  खूप काही शिकवते. जेव्हढे देऊ तेव्हढे परत येते... आणि त्यामुळेच जगण्याचा आनंद द्विगुणित होतो....

ह्या चित्रात कड्यावरून कोसळणाऱ्या जलधारा दिसतात, तसेच डोंगरावर उंच उभे वृक्षही. ह्याच वृक्षांची मुळे जमिनीत खोलवर जाऊन पाण्याला धरून ठेवतात आणि हा जलसाठा मग झऱ्याच्या रूपाने वाहू लागतो..

वाहताना जमिनीवरील खाच खळगे भरून पाणी पुढे वाट काढते, कड्यावरून खाली उडी मारून मार्गक्रमणा करत राहते.

जीवनाची गती ही अशीच असावी. कितीही अडचणी आल्या तरी मार्ग काढून पुढील वाटचाल करावी.

किती बरं छान शिकवण मिळते आहे या धबधब्याकडून !

जीवनात साहस ही हवेच !!

 कड्यावरून कोसळल्यावर  जलाशयाची निर्मिती किती आनंददायी...

 पुढचा प्रवास ही तितक्याच आनंदाचा !!

भलेही खाचखळग्यातला असूदे, जीवनदायी असाच आहे...

वाटेतल्या झुडुपाचे जीवन त्याच्या तुषारांमुळेच आहे...

हे झुडूप सुध्दा आपल्या जीवनाचे प्रतीक आहे... 

सृष्टीची सृजनता... 

जीवन जगण्यास आवश्यक बाबींची उपल्ब्धता झाली  जीव मूळ धरते...

प्राप्त परिस्थितीत आनंदाने जगायला शिकवीते ...

जीवन हे असेच राहू दे...

स्वतः आनंदाने जगता जगता दुसऱ्याला आनंदाने जगविणारे....

2 comments:

  1. परममित्र परशुराम कार्निग याचे अभिप्राय!!!

    अशीच जीवनातील घडी राहुदे आणि चालूदे
    नभीच्या ..........जलचक्र चालूदे..
    हो निसर्ग मित्र सतीश,
    अव्याहत पने तुझ्या सायकलच्या
    चक्र चालू दे, भारताचा धरणी चे
    ला॑बी नापू दे. निसर्गा चे चित्रा चे चित्र चित्रित होवु दे, आणि
    सर्व ‌ मित्रा॑चे मन र'जित होवु दे
    अशीच सतीश चक्र चालू राहुदे.
    All the best.
    Good morning🌹😆

    ReplyDelete