Wednesday, July 8, 2020

उपनिषद

उपनिषद
(ज्ञानसाधना पुस्तकालय आणि संतोष कारखानीस यांच्या ब्लॉग मधून संकलित)


 वेदांची मांडणी तीन भागात करता येते.

कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. 

वेदांच्या ज्ञानकांडाचे नाव 'उपनिषद' आहे.

एकूण एकशेबारा उपनिषदे प्रसिद्ध आहेत. 

उपनिषदांत अत्यंत थोड्या शब्दात जीवनाचे सार सांगितले आहे.

ईश्वराचे स्वरूप आनंदमय आहे. हा जीव मुळात ईश्वर असल्याने त्याची सर्व धडपड आनंद मिळविण्यासाठीच असते. 

 हा आनंद अंतर्यामी शोधता येतो. माणसाला  आनंदमय स्वरूपाचा शोध आणि बोध उपनिषदांमुळे होतो.


****************************************************************************


उपनिषद् हे मानसशास्त्राची भाषा बोलतात !

उपनिषद् हे आजच्या काळात सुखी जीवनाचा मूलमंत्र देतात ! 
चिंता मुक्त जीवनासाठी सहाय्यक ठरतात !

समुपदेशक आहेत आपली उपनिषदे ! 

आपण उपनिषदांत सांगितलेली खालील प्रार्थना नेहमी करतो.

ॐ असतो मा सद्गमय ||.

तमसो मा ज्योतिर्गमय ||.

मृत्योर्मा अमृतं गमय ||.

ॐशांति: शांति: शांति: ||.

अर्थात:

 हे ईश्वरा आम्हास;
असत्याकडून सत्याकडे, 

अंधारकडून प्रकाशाकडे, 

मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन जा...

ही प्रार्थना केवळ अध्यात्मिक नसून 

psychological   principal आहेत.

मनाला नकाराकडून होकाराकडे, 

निराशेतून आशेकडे, 

दुःखातून सुखाकडे घेऊन जाण्याची एक
मानसोपचार पद्धती आहे.


******************************

छांदोग्य उपनिषदातील एका श्लोकात 

मोठ्या मनाचा व्हावे...

तापणाऱ्या सूर्याची निंदा करु नये...

बरसणाऱ्या मेघाची निंदा करू नये...

ऋतूची निंदा करू नये...

पशूची निंदा करू नये...

लोकांची निंदा करू नये...

मीच सर्व आहे अशी उपासना करावी...
असे सांगितले आहे.  याचाच अर्थ  सारखी तक्रार करण्यापेक्षा सकारात्मक विचार करावेत, हा आहे.


***********************************************************************


*आपल्याला प्रसन्न व्यक्तिमत्वाची माणसं आवडतात.*

 आपण रडक्या लोकांना, सारखी तक्रार करणाऱ्यांना  टाळू लागतो कारण त्यांचा परिणाम आपल्यावर ही होत असतो.

*प्रसन्न व्यक्तिमत्वाचे धनी असलेले मित्र हवेहवेसे वाटतात ....*

मानवी मनावर एक अस्पष्ट रुपात चिंता, भिती आणि निराशेचे सावट पसरले आहे, हे आपण सर्वत्र पाहतो.

मनाला प्रफुल्लित करण्यासाठी उपनिषदात सांगितलेल्या गोष्टी आणि प्रार्थना अतिशय प्रभावी आहेत, याची जाणीव होते.
  
 मानसिक थकवा घालव्यासाठी उपनिषद् हे अध्यात्मिक आणि वैज्ञानिक साधन आहे.
  
बोटभर दिसणाऱ्या रुईची/मंदार  झाडाची शेंग उघडते,  त्यामधून दुरडीभर म्हाताऱ्या उडत जातात. दिसायला अतिशय लहान दिसणाऱ्या या शेंगेत जसा मोठा साठा असतो तसेच उपनिषदात कमी शब्दामध्ये जीवनाचे संगीत आणि तत्वज्ञान ठासून भरलेले आहे. जसजसे उकलत जावे तसतसे त्याचा आकार वाढत जातो.

अत्तराच्या बाटलीचे तोंड उघडे करताच परिसर दरवळून निघतो तसा या उपनिषदांचा प्रभाव होतो. थेंबभर अत्तर वातावरण सुगंधी करते.  

तसेच आहे हे उपनिषद् ! 

अतिशय कमी शब्दांमध्ये जीवनाचे रहस्य व्यक्त करतात.

उपनिषद ही भारतीय तत्त्वज्ञानाचा व संस्कृतीचा मुळ स्त्रोत आहेत. 

श्रीमद्भगवद्गीता हा महान ग्रंथ या उपनिषदांचा सार आहे !


*************************************************

उपनिषदांमध्ये "दिव्य बालक नचिकेत" याची एक गोष्ट आहे.

पिता प्रसिद्धीसाठी महायज्ञ करतो पण दान स्वरूपात मरतुकड्या आणि भाकड गायींचे दान करतो. 

पुत्र नचिकेत यावर लोभी पित्याला प्रश्न करतो...

 चांगल्या दानाची, श्रेष्ठ दानाची अपेक्षा धरतो.

लोभी  चिडलेला पिता म्हणतो, "तूच त्या योग्य आहेस. जा मी तुझेच यमदेवाला दान केले आहे." 

 हा नचिकेत सदेह यमाकडे पोहोचतो. वेळेच्या आधी आणि सदेह स्वतः होऊन आलेल्या नचिकेतला पाहून यमदेव आश्चर्यचकित होतात. त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला वरदान मागण्यासाठी आग्रह धरतात. नचिकेत मात्र केवळ आत्मज्ञान मागतो !
स्वतःहून सदेह यमाकडे गेलेला बाल नचिकेत ! 

यम हे नाव घेताच माणूस थरारुन जातो, घाबरून जातो. 

नचिकेत जगातील सारे ऐश्वर्य, सुख-समृद्धी, राज्य, वैभव न मागता केवळ आत्मज्ञान मागतो !  

जे आत्मज्ञान माणसाला परमसुख मिळून देणारे आहे ! 

ते आत्मज्ञान यमदेव  त्याला सहज देत नाहीत !

त्याच्यासाठी त्याच्या परीक्षा घेतल्या जातात. 
त्याला प्रलोभने दिली जातात.

पण हा बाल नचिकेत मात्र केवळ आत्मज्ञानासाठी अडून बसतो ! 

मरणाला जिंकणाऱ्या नचिकेताची गोष्ट  कठोपनिषदामध्ये सांगितली आहे.


********************************************************

ॐ सहनाववतु ।

सहनौभुनक्तु ।

सहवीर्यं करवावहै ।

तेजस्विना वधीतमस्तु मां विद्विषावहै ।

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

ही प्रार्थना आपण नेहमी म्हणतो. हा शांतीपाठ उपनिषदामधील आहे... जो आपणा सर्वांना परिचित आहे.

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती आहेत, पण त्यांचा प्रत्यक्ष उगम किंवा मूळ स्रोत  माहीत नसतो.
सध्याच्या काळात वाढलेल्या चिंता आणि धावपळ पाहता मनःशांतीची सर्वांना आवश्यकता आहे. 

*त्यामुळे ही उपनिषदे मनन करावीत, अशी माझी विनंती आहे.*

|| शुभम भवतू || 

 ||  ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥


सतीश जाधव

कलावती आईंच्या ग्रंथातील उतारा.

20 comments:

  1. अप्रतिम, दर्जेदार, सुंदर आकलन, नचिकेताच उदाहरणं एकदम वर्मी आहे.

    ReplyDelete
  2. माझे परममित्र प्रविणकुमार कुलथे यांचे अभिप्राय,

    सतीश सर नमस्कार,

    उपनिषदा बद्दल लिहिलेला लेख अतिशय उतम आहे.
    आपण उपनिषदात नमुद केलेल्या मुद्द्याचा प्रभाव थोड्या प्रमाणात का होइना मी माझ्या प्रत्यक्ष जीवनात थोड्या स्वरुपात का होइना अनुसरण होत असल्याची जाणिव आपण मला आज करुन दिली या बद्दल मि आपले खुप खुप आभार मानतो.

    धन्यवाद !!!

    ReplyDelete
  3. माझे परममित्र सखाराम कुडतरकर यांचे अभिप्राय....

    तू लिहिलेले उपनिषद चे प्रस्तावित तिन्ही भाग एकचित्त होऊन वाचलं...
    खरच उत्तम मांडणी केली आहेस...
    नचिकेत उदाहरण काही तरी वेगळे सांगून जाते...
    मनाला खूप खूप भावले...
    छान आहे...
    चालू ठेव ..

    ReplyDelete
  4. सतिशराव जे पण आपण करतात ते विचारपूर्वक करता.आपणही नचिकेत व्हावे व आम्हाला मार्गदर्शन करावे .असेच ज्ञान आम्हाला देत रहा म्हणजे आम्ही तुमच्या पाठी येऊ����������

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद राजेश भाऊ,

      असेच प्रोत्साहन मिळो.

      Delete
  5. जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांना सांगावे.
    शहाणे करून सोडावे, सकल जना.
    वरील उक्तीप्रमाणे आपले कार्य चालू आहे.
    असेच स्पृहणीय कार्य आपल्या हातून घडो,
    व आमच्यासारख्या अज्ञान बालकांच्या जीवनात
    प्रकाशाचा मार्ग दिसावा. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏🙏

    ReplyDelete
  6. धन्यवाद दोस्ता !!!

    नाव लिहिले असते तर आनंद झाला असता.

    ReplyDelete
  7. मनीष मेस्त्री हिचे अभिप्राय...

    मामा मी वाचले...

    खुप छान आहे, मला पण खुप चांगली माहिती मिळाली. वर कलावती आईंच्या पुस्तकातील उपनिषदाबद्दलचे भाष्य देत आहे.

    ReplyDelete
  8. 🙏🏻🙏🏻🙏🏻

    खूप छान माहिती मिळाली बाबा!!!

    लेख सर्वाना समजेल अशा शब्दात आहे !!!

    उत्तम माहिती मिळाली!!!

    शरयू तावडे.

    ReplyDelete
  9. *उपनिषद* एक मानवी जीवनातील अटळ सत्य.
    ..................................

    मागील शेकडो हजारो वर्षांच्या परंपरेच्या अखंड प्रवाहात असताना अनेक धर्म,संस्कृती,परंपरा,रीती,वंशावळ, संप्रदाय, घराणेशाही,परकीय धर्मांची आक्रमणं, स्वार्थापोटी झालेला सत्तासंघर्ष या अशा अनेक प्रकारच्या घाता-अपघातातून ,आक्रमण-संक्रमानातून आपल्या देशाच्या सत चित जीवन शैलीला नवचैतन्य आणि चालना देणारे आपले ग्रंथ,शास्त्र,पुराणे,वेद, उपनिषद यांचा सखोल आणि शास्त्रशुद्ध व्यासंगी अभ्यास करणारे अनेक योगी,तपी,ऋषी,मुनी,साधू,संत,सज्जन यांचा अवतार या परमपवित्र भारतभूमीत झाला आणि सर्वसामान्य अर्थात जडजीवला या ज्ञानखजिन्याचा सखोल परिचय झाला.त्यातिलाच एक अनमोल रत्न आणि आपल्या प्रगल्भ भारतीय संस्कृतीचा मुकुटमणी म्हणजेच *उपनिषद* मानवी जीवनाला उदात्त आणि व्यापक ठरवून अंतःकरण संकुचितता देशोधडीला लावण्यात उपनिषधांचा वाटा सिंहाचा ठरतो हे अटळ सत्य स्वीकारणं मानवी बुद्धीला क्रमप्राप्तच ठरते.याच अनेक उपनिषधांपैकी एक असणाऱ्या महोपनिषधाच्या चौथ्या अध्यायातील ७१व्या श्लोकातून अखंड मानवजातीला घडलेला व्यापाकतेचा उपदेश माझं-तुझं,आपलं-परकंहा संकुचित भेद विसरून हे विश्व म्हणजेच एक कुटुंब आहे असा सद्व्यापाक विचार करायला भाग पाडतो.
    ..................................
    **अयं निज: परो वेती गणना लघु चेतसां।उदारा चरितानांतू वासूधैव कुटुंबकम्।।*
    .............................

    *हे माझं आहे हे तुझं आहे असं संकुचित चित्ताचे लोक म्हणतात परंतु ज्यांचे मन आणि हृदय विशाल आहे त्यांच्यासाठी हे विश्व एक कुटुंब आहे .नियतीच्या चालक भगवान परमात्म्याच्या नियोजनाचा अंदाज लागणं हे मानवी बुद्धीच्या आकलन शक्तीच्या पलीकडचं आहे हे त्रिवार सत्य आहे.याच उपनिषधांच सार घेऊन कुरुक्षेत्रासारख्या रणांगणात अर्जुनासारख्या एका अभिन्नहृदय भक्ताला विरुद्ध परिस्थितीत शस्त्राच्या ठिकाणी शास्त्राची भाषा सांगणारे भगवान श्रीकृष्ण काही भावसागरात गुरफटलेला जीव नसून ते निष्काम परब्रम्ह आहेत,आणि त्या शस्त्रसंधीच्या ठिकाणी जो अगदी ४७मिनिटांच्या अत्यल्प वेळेत केलेला सधर्म ज्ञानोपदेश आपल्या सारख्या अल्पमतीकांच्या ध्यानात सहज यावा यासाठी त्याच भगवान श्रीकृष्णाने अलंकापुरीत धरलेल्या ज्ञानावताराची उपाय योजना कुणाच्याही सहज लक्षात येण्याजोगी तर नक्कीच नाही त्या उपनिषधांच्या साराचा सारांश तुमच्या आमच्या मायबोलीत सहज स्पष्ट करत असताना ज्ञानदेवांनी म्हणावं
    *हे विश्वची माझे घर।ऐसी मती जायची स्थिर।किंबहुना चराचर। आपणाची झाला।।* अखंड विश्वाला सरसकट सुखसमृद्ध करण्यासाठी हा मूलमंत्र उपनिषधातून गीतेत ,गीतेतून ज्ञानेश्वरीत आणि ज्ञानेश्वरीतून आपना सर्वांच्या अंतःकरणात सामावला आहे सुखाच्या शोधत हिंडणाऱ्या प्रत्येकानं या व्यापक तत्वावर आरूढ व्हावं आणि स्वतः सुख उपभोगून इतरांनाही त्याचा आस्वाद द्यावा. सुख ,सुख,सुख म्हणजे नक्की काय हो ?तर सुख म्हणजे देव.आम्ही देव पाहिला नाही म्हणून सुख पाहिलं नाही आणि सुख पाहिलं नाही म्हणून देव पाहिला नाही. देव पाहण्यासाठी अंगाऱ्या धुपऱ्याची अन मंत्र तंत्राची गरज असेल तर या उपायतून आम्ही जो पाहू ना तो देवच नाही.देव पाहण्यासाठी खरी गरज आहे ती भक्ती या अवस्थेची अन ती काही गंधा-टोपीन प्राप्त होते थोडीच, त्या अवस्थेसाठी गरज आहे ती त्या व्यापक तत्वाची या व्यापक तत्वाच्या स्वीकारणं तो भक्त राग द्वेष अहंकाराच्या बंधनातून मुक्त होतो आणि ज्ञानोक्ती प्रमाणे *तया बंधू कोण काह्याचा।द्वेषीया कवणू तयाचा।मीची विश्व ऐसा जयाचा।बोधू जाहला।।* या महा अवस्थेवर तो आरूढ होतो ..................
    हरेश गगे मुरबाड

    ReplyDelete
  10. धन्यवाद हरेश ....

    महोपनिषदाच्या

    अयं निज: परो वेती गणना लघु चेतसां ।
    उदारा चरितानांतू वासूधैव कुटुंबकम्।।

    या श्लोकातून जीवनाचे सर्व सारच सांगितले आहे.

    आणि ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचे केलेले निरुपण,

    हे विश्वची माझे घर ।
    ऐसी मती जायची स्थिर ।
    किंबहुना चराचर ।
    आपणाची झाला ।।

    म्हणजे आपल्या हृदयातच सर्व चराचर सामावलेले आहे, याचे ज्ञान देते. माऊलींनी सकळजनांवर केलेले उपकार, अपरंपार आहेत.

    या उघडलेल्या ज्ञानाच्या कवाडातून आंपण सुद्धा हृदय विशाल करूया !!!!

    खूप खूप धन्यवाद हरेश. अतिशय छान माहिती दिलीस.

    ReplyDelete
  11. परम मित्र प्रशांत चव्हाण यांचे अभिप्राय.

    Agdi sundar... 👌👌🙏🙏👍

    ReplyDelete
  12. मि उपनिशद कधि वाचलं नाहि.पण तुमचा लेख वाचुन गोडि निर्माण झालि.धन्यवाद !

    ReplyDelete