रेषांत उमटले शिवतेज...
दि. ८ ऑगस्ट २०२५
मित्राच्या मुलाने छत्रपती शिवाजी महाराजांचे रेखाचित्र पाठविले... महाराजांचं एव्हढ सुंदर रेखाचित्र पाहून मन उचंबळून आलं… आणि डोळे तिथेच खिळून राहिले...
त्या रेषांमध्ये होतं... एका लहानग्या मनाचं शिव साम्राज्याविषयीचं प्रेम, अभिमान आणि निष्ठा...
रेखाचित्रातल्या त्या डोळ्यांत सिंहाच तेज, कपाळावर स्वराज्याचा संकल्प आणि ओठांवर अदम्य धैर्य होतं...
हिंदू स्वराज्याची बीजं जिजाऊंनी शिवरायांच्या मनात लहानपणीच पेरली... स्वराज्याच्या या विचारांची फळं पिढ्यान्पिढ्या फुलत राहणार आहेत...
रणभूमीत वाऱ्याशी स्पर्धा करणारा... रणनीतीत शत्रुलाही चकवणारा... धाडसात पर्वताशी भिडणारा,.. आणि स्वराज्य सत्यात उतरवणारा राजा... म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज... यांच्या तलवारीत होती सिंहगर्जना...
ज्या काळात भीतीमुळे माणसे घराबाहेर पडायला धजावत नव्हती... त्या अंधाकारमय काळात एक ओजस्वी सिंहतेज उभे राहिले...
आई जिजाऊंच्या संस्कारातून घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी... भवानीमातेसमोर नतमस्तक होऊन मुठभर मावळ्यांच्या निष्ठेच्या जोरावर तलवार उचलली... अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध... आणि हिंदू धर्मरक्षणासाठी...
सिंहगड, पुरंदर, प्रतापगड, राजगड, रायगड… हे किल्ले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाडसाची, शौर्याची आणि दूरदर्शी युद्धनीतीची साक्ष देतात...
रणांगणात वाऱ्यासारखी चपळता... शत्रूच्या छावणीत वाघासारखी भीतीदायक छाया... राजकारणात बुद्धिबळासारखा नेमका डाव... आणि जनतेच्या हृदयात साक्षात दैवतासारखे स्थान…… ते म्हणजे स्वराज्याचे शिल्पकार... छत्रपती शिवाजी महाराज...
शब्द अपुरे आहेत छत्रपतींचे वर्णन करायला... शिवाजी महाराज हे तर मराठी अस्मितेचे तेजस्वी सूर्य आहेत...
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म रक्षणासाठी... तसेच श्रद्धा, संस्कृती, सन्मान वाचवण्यासाठी आणि अन्याया विरुद्ध तलवार चालविली...
ते धर्माभिमानी होते... त्यांनी हिंदू संस्कृतीचं, मंदिरांचं, गोमातेचं आणि संतांच्या परंपरेचं रक्षण केलं... राजधर्माचे पालन केले...
आजही प्रत्येक भारतीयाच्या नसानसांत शिवप्रेमाची धार आहे…
इतिहासाच्या पानांमध्ये महाराज झळकतात... आणि वर्तमानात प्रत्येक मराठी मनात धडधडत राहतात…
छत्रपती शिवाजी महाराजांना शतशः नमन...
सतीश जाधव
7977690693
जय श्रीराम 🙏
ReplyDeleteजय भवानी जय shivaji🚩🚩
ReplyDeleteजय भवानी जय शिवाजी ⚔️
ReplyDeleteकेवळ अप्रतीम, जय शिवराय!
ReplyDelete