Friday, August 8, 2025

आई... माझं सर्वस्व... दि. ८ ऑगस्ट २०२५

आई... माझं सर्वस्व...८ ऑगस्ट २०२५

वंदन करतो त्या माऊलीला...
जिच्या हातून आयुष्याचा पहिलं घास मिळाला...

जिच्या मांडीवर पहिलं स्वप्न पाहिलं...
जिच्या कुशीत प्रत्येक दुःख विरघळलं…

१९८५ साली तिने या जगाचा निरोप घेतला…
आज चाळीस वर्षे झाली... 

ती प्रत्यक्ष नाही... पण प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारात... तिचा सुगंध... तिचा आशिर्वाद आहे...

आज मी जो काही आहे... तो तिच्या संस्कारांचा... तिच्या त्यागाचा वारसा आहे…  

तुझी आठवण म्हणजे देवांचे पूजन...
तुझी शिकवण म्हणजे आयुष्याचं मार्गदर्शन...

🙏 शिर साष्टांग वंदन आई… 🙏

सतीश जाधव
7977690693

6 comments:

  1. दादा आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही ❤️

    ReplyDelete
  2. नवनीत worlikarAugust 8, 2025 at 8:12 PM

    विनम्र अभिवादन 🙏

    ReplyDelete
  3. હે માઁ તું પરમ્ દૈવતામ 🙏

    માઁ તું શ્રેષ્ઠ છો દેવતાઓ થી પણ 🙏

    માઁ શબ્દ માં જ આખું વિશ્વ સમાયેલું છે.

    માઁ ની વસમી વિદાય જે ન પુરી શકાય એવી ખોટ કહેવાય, સારામાં સારી બનતી સેવા કરી તમોએ, પણ જન્મ અને મરણ બન્ને ભગવાનના હાથમાં છે એમ કહેવાય છે.

    😌 તેમને માન આપી ને એ વસ્તુ સ્વીકારવી તેથી તેજ આ દુઃખ સહન કરવાની શક્તિ આપેજ છે.
    🙏તો પરમ કૃપાળુ પરમાત્મા તમને અને કુટુંબીય જનોને આ દુઃખ સહન કરવાની શક્તિ આપે અને માઁ ના આત્મા ને પરમ મોક્ષ ગતિ પ્રાપ્ત થાય તે પ્રાર્થના.

    🙏🙏🙏
    નિર્મળગૌરી વિઠલજી ઓઝા પરિવાર ના જય સ્વામિનારાયણ જોલાપર/ગોરેગાંવ 🙏

    ReplyDelete
  4. विनम्र अभिवादन

    ReplyDelete
  5. परमप्रिय मातोश्रीचे चरणी साष्टांग दंडवत. अस म्हणतात की, देवाला प्रत्यक्ष भक्तास भेटावयास वेळ नसल्यामुळेच तो आईला आपल्याच जागी पाठवतो. आई म्हणजेच अनंताला व्यापून टाकणारा ईश्वर आहे. त्रिवार वंदन 💐🙏 ता.क.- काय योगायोग आहे ! आमच्याही मातोश्री जाऊन 40 वर्षे पूर्ण झाली. फक्त तारीख वेगळी. 04/03/ 1985 . होळीच्या दोन-तीन दिवस अगोदर. बस्स! आयुष्यातील रंगच उडुन गेले आहेत याची जाणीव झाली. त्याच क्षणापासून आजपर्यंत होळीचा रंग कधीच गालावर लावून दिला नाही , अगदी जवळच्या मित्रांना शुद्धा .😥🙏🙏🙏धोंडू नाना जाधव.

    ReplyDelete
  6. विनम्र अभिवादन,
    मोजक्या शब्दांत फारच छान विश्लेषण.

    ReplyDelete